मागासवर्गीय कर्मचारी महासंघाची नवीन कार्यकारिणी जाहीर, अरुण सपकाळे यांची कार्याध्यक्षपदी फेरनिवड

हॅलो जनता न्यूज, जळगाव (प्रतिनिधी) – नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या मागासवर्गीय कर्मचारी महासंघाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये कार्याध्यक्षपदी अरुण सपकाळे यांची फेरनिवड करण्यात आली असून, त्यांच्या नेतृत्वावरील विश्वास पुनश्च अधोरेखित करण्यात आला आहे. तसेच, कोषाध्यक्षपदी राजू रतन सोनवणे यांचीही फेरनिवड करण्यात आली आहे. सह सचिवपदी जयंत सोनवणे व सुभाष पवार यांची निवड झाली आहे. कार्यकारिणी सदस्य म्हणून विठ्ठल धनगर, विकास बिऱ्हाडे आणि निता शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या निवडीमुळे संघटनेच्या कार्यात नवी ऊर्जा संचारेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांचे विविध क्षेत्रांतून अभिनंदन होत आहे.
इतर महत्वाच्या बातमी…
💥ब्रेकिंग : क्रिकेट विश्वात खळबळ, या भारतीय क्रिकेटरला होणार दहा वर्षाचा कारावास….
💥ब्रेकिंग : उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णकांत पिंगळे यांची बदली