विधानसभा २०२४हॅलो राजकारण

भुसावळच्या आमदारांचे शेतकऱ्यांप्रती उदासीन धोरण, भुसावळ तालुक्यातील अनेक गावे पोकरा योजनेपासून वंचित

हॅलो जनता न्युज (भुसावळ)

शासनाच्या योजनांचा योग्य वापर केल्यास, तसेच योजना गरजू लाभार्थीपर्यंत पोहोचली तरच फायदा होतोच; मात्र गरजू शेतकऱ्यांचा विचार न करता अंमलबजावणी केली तर त्याचा नाहक फटका बसतो. याचा अनुभव पंचायत समितीच्या वराडसिम – सुनसगाव परिसरात पाहायला मिळत आहे. या परिसरातील एकही गाव पोकरा योजनेत बसलेले नाही. नुकतीच पोकरा योजना टप्पा २ राबविण्यासाठी गावांची निवड झाली आहे. मात्र यात भुसावळ तालुक्यातील अनेक गावांचा समावेश करण्यात आलेला नाही त्यामुळे याचा फटका त्या भागातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसणार आहे. पोकरा योजनेमुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी शासनाकडून प्रोत्साहनपर अनुदान मिळत असते मात्र या योजनेत गावाचा समावेश नसल्यास या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही.

त्या भुसावळ तालुक्यातील खेडी बुद्रुक, कन्हाळे बुद्रुक, कन्हाळे खुर्द, कुन्हा पानाचे, भिलमळी, मांडवादिगर, किन्ही, खंडाळे, मोंढाळे, शिंदी, आचेगाव, पिंपळगाव अशा बारा गावांचा समावेश करण्यात आला आहे. भुसावळकडून जामनेरकडे जाणाऱ्या जामनेर रोडच्या पश्चिमेकडील एकही गाव या यादीत नाही. त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थ विचारात पडले आहेत.

या योजनांबाबत माहिती घेतली असता या परिसरातील काही गावांमध्ये शासनाची मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, सामाजिक वनीकरण, लघुपाटबंधारे (स्थानिक स्तर) भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा यांच्या मार्फत पाणलोट विकास योजना राबविण्यात आली होती.

जलसंधारण विभागाच्या पाणलोट विकास योजनेंतर्गत एक कार्यकारिणी स्थापन करण्यात आली होती व योजना राबविण्यास सुरुवात झाली होती; मात्र योजना बंद करण्यात आल्याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती कळविली नाही. या पाणलोट योजनेचा फटका वराडसिम सूनसगाव परिसरातील गावांना बसला आहे. याला भुसावळचे विद्यमान आमदार संजय सावकारे यांचे शेतकऱ्यांप्रती उदासीन धोरण जबाबदार असल्याची चर्चा सध्या या गावांमध्ये सुरू आहे.

इतर महत्वाच्या बातम्या.  

Big Breaking : जामनेरात दिलीप खोडपे ऐवजी माजी मंत्री गुलाबराव देवकर रिंगणात…

3 हजार कोटींचा विकास कुठे आणि कुणाचा, अमोल शिंदे यांचा विद्यमान आमदारांना सवाल

ब्रेकिंग : विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणीची चांदी, कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मिळतेय 200 ते 400 रुपये मजुरी….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button