हॅलो सामाजिक

भडगाव येथे संत रविदास महाराज जयंती उत्साहात साजरी..

भडगाव : येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघ भडगाव शहर यांच्या वतीने जगतगुरू संत रविदास महाराज जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. रविवार, दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता संत रविदास महाराज मंदिरात मूर्तीपूजन, आरती व भजन कार्यक्रम पार पडला.

याच दिवशी भडगाव शहरातील सर्व शासकीय कार्यालयांमध्येही संत रविदास महाराज जयंती साजरी करण्यात आली. महादेव गल्ली, टोणगाव व यशवंत नगर परिसरात समाजबांधवांनी एकत्र येत जयंती उत्सवात सहभागी होऊन सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले.

संध्याकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक (पारोळा चौफुली) येथे संत रविदास महाराज यांचे भव्य छोटे स्टेज (मंदिर) उभारण्यात आले होते. येथे संत रविदास महाराजांसह छत्रपती शिवाजी महाराज, गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीआई फुले, महाराणा प्रताप, वीर भगवान एकलव्य आदी महापुरुषांच्या मूर्तींचे पूजन व दर्शन भाविकांनी घेतले.

या जयंती उत्सवप्रसंगी शासकीय अधिकारी, कर्मचारी, नगरअध्यक्ष, नगरसेवक, भारत मुक्ती मोर्चा, एकलव्य संघटना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान, तसेच विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा पुढाकार; विविध मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमास राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हा जळगाव अध्यक्ष ईश्वरलाल अहिरे, भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा, लोकनियुक्त नगराध्यक्षा रेखाताई प्रदीप मालचे, उद्योजक, नगरसेवक, विविध पक्षांचे पदाधिकारी, पत्रकार बांधव तसेच मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रवीण महाजन यांनी केले, तर आभार प्रदर्शन रविभाऊ अहिरे यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रम शांततामय वातावरणात व सामाजिक सलोख्याच्या संदेशासह पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button