भडगाव येथे पत्रकार दिनानिमित्त बक्षीस वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न.

भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील

या कार्यक्रमात भडगाव शहरातील उद्योजक कदीर खान हाजी जोरावर खान तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील युवासेना प्रमुख श्रेयस संजय कासार यांना ‘गिरणा नवरत्न पुरस्कार’ सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यासह परिसरातील पर्यावरण, सहकार, सामाजिक, प्रशासकीय, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय व प्रबोधनात्मक कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.पत्रकार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला व रंगभरण स्पर्धेत उत्तीर्ण शालेय विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याबरोबरच सामाजिक जाणीव वृद्धिंगत करण्याचा उद्देश या उपक्रमामागे असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या समारंभाला भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा, तालुका कृषी अधिकारी दीपक ठाकूर, वैद्यकीय अधिकारी समाधान वाघ, नायब तहसीलदार अनिल भामरे, सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे राजेंद्र निकम यांच्यासह भडगाव नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षा रेखा मालचे यांचे पती प्रदीप (जहांगीर) मालचे तसेच नगरसेवक विजयकुमार भोसले, अतुलसिंह परदेशी, अलीम शहा (छोटे सरकार), इम्रानअली सय्यद, शशीकांत येवले, सचिन चोरडिया, यांच्यासह अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते निलेश मालपूरे, समाजसेवक जाकीर कुरेशी, शेतकी संघ सोसायटी संचालक प्रभाकर पाटील, माऊली फाउंडेशन संचालिका संगीता जाधव, महिला दक्षता समितीचे अध्यक्ष योजना ताई पाटील, जुनी पेन्शन योजना कार्यकर्ते संजय सोनार, आबा चौधरी, आनंदसिंग राजपूत, विजय पाटील, शाहीर परशुराम सूर्यवंशी, चर्मकार संघाचे तालुकाध्यक्ष रवी अहिरे उपस्थित होते.
ग्रामीण भागातील सकारात्मक कार्य, सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. माउली फाउंडेशनच्या वतीने संगिता जाधव, उद्योजक दिलीप शेंडे, धैर्य कॉम्प्युटेकचे संचालक महेंद्र अहिरराव, अंबिका कृषी सेवा केंद्राचे संचालक संजय पाटील, इंदुमती ट्रेडर्सचे संचालक नाना चौधरी यांनी सर्व विद्यार्थ्यांना भेटवस्तू दिल्या.
कार्यक्रमास अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ जळगाव जिल्हाध्यक्ष भानुदास महाजन, जिल्हा कोषाध्यक्ष डॉ. बी. बी. भोसले, भडगाव तालुकाध्यक्ष निलेश महाले, तालुका सचिव यशकुमार पाटील, यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व भडगाव तालुक्यातील पत्रकार बांधव व स्पर्धेत सहभागी विद्यार्थी संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण महाजन यांनी केले तर तालुका सचिव यशकुमार पाटील यांनी आभार मानले.




