भडगाव नगरपरिषद विविध समित्यांच्या सभापती व सदस्यांची नियुक्ती जाहीर.

भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील
भडगाव : नगरपरिषदेत नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सहभागातून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विषय समित्यांची स्थापना करण्यात आली असून, त्या समित्यांवर सभापती व सदस्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. या नियुक्त्यांमुळे नगरपरिषद प्रशासनाला गती मिळणार असून विकासकामांना दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
स्थायी समिती सदस्य म्हणून लखीचंद प्रकाश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बांधकाम समिती सभापती : फकीर नगमाबी अलीमशाह
सदस्य : विजयकुमार रायभान भोसले, देवाजी अहीरे, युवराज पाटील, जितेंद्र विठ्ठल पाटील.
शिक्षण समिती सभापती : अतुलसिंह भिकनसिंह परदेशी
सदस्य : देवाजी बापू अहीरे, ज्योती जितेंद्र पाटील, योगिता शशिकांत येवले, अमोल नाना पाटील.
आरोग्य समिती सभापती : सय्यद इम्रानअली शहादतअली
सदस्य : शेख खलील शेख अजीज, विजयकुमार रायभान भोसले, डॉ. प्रमोद हेमराज पाटील, सचिन विनोदकुमार चोरडिया
पाणीपुरवठा समिती सभापती : राजेंद्र महादु पाटील
सदस्य : अनुजम बेग मिर्झा, वैशाली संतोष महाजन, करूणा सुनिल देशमुख, अंजनाबाई हिंम्मत भिल
नियोजन समिती सभापती : डॉ. विजयकुमार नानासाहेब देशमुख
सदस्य : राहुल राजेंद्र ठाकरे, योगिता शशिकांत येवले, रावसाहेब पाटील, अमोल नाना पाटील
महिला व बालकल्याण समिती सभापती : समिक्षा लखीचंद पाटील
सदस्य : कल्पनाबाई जगन भोई, रंजनाबाई अनिल वाघ, वैशाली विशाल पाटील, किरणताई अतुल पाटील, अंजनाबाई हिंम्मत भिल्ल
नगरपरिषदेच्या या विविध समित्यांद्वारे शहरातील पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, बांधकाम, नियोजन तसेच महिला व बालकल्याण या क्षेत्रात प्रभावी कामकाज होईल, असा विश्वास नगरपरिषद प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.




