भडगावात ‘श्री चक्रधर चषक’ खुल्या प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील
स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली असून प्रथम बक्षीस रु. २१,०००, द्वितीय बक्षीस रु. १५,००० तर तृतीय बक्षीस रु. ११,००० असे जाहीर करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन मंगळवार, दि. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता झाले.
क्रिकेटच्या माध्यमातून युवकांमध्ये क्रीडा भावना, एकात्मता आणि आरोग्यदायी स्पर्धात्मकता वाढीस लागेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. स्पर्धेमुळे शहरातील क्रिडा वातावरणाला चालना मिळणार असल्याची भावना क्रिकेटप्रेमींनी व्यक्त केली.
भडगाव तालुक्यातील तब्बल सोळा संघांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. अंपायर म्हणून तात्या भाऊ पवार, नाना पाटील, गणेश मोरे व दिपक पवार काम पाहणार आहेत. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी निलेश पाटील, कुणाल पाटील, प्रविण (सोनू) पाटील, रावसाहेब पवार, सुमित मालचे, अरुण पिंपळे यांच्यासह श्री चक्रधर स्वामी मित्र मंडळाच्या सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.




