ब्रेकिंग : भाजप महाराष्ट्रात “इतक्या” जागांवर लढणार, दिल्लीत सर्व काही ठरलं…
हॅलो जनता, प्रतिनिधी (मुंबई)
विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर जागा वाटपा संदर्भात प्रत्येक पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर खलबते सुरू आहेत. भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीच्या दिल्लीत झालेल्या बैठकीत विधानसभेच्या ११० जागांवरील उमेदवारांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामध्ये पुण्यातील शिवाजीनगर, पर्वती, कोथरूड, पुणे कँटोन्मेंट; तसेच खडकवासला येथील विद्यमान आमदारांना संधी देण्यात येणार असल्याचे समोर आले असून दरम्यान, कसबा आणि वडगाव शेरी या मतदारसंघांच्या उमेदवारीबाबत बैठकीत चर्चा झडली असली, तरी त्यावर अद्याप निर्णय झाला नसल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.
भाजपकडून या विधानसभा निवडणुकीत १५० पेक्षा अधिक जागा लढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यातील ११० जागांवरील उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आले असून, ही यादी शक्य येत्या शनिवारी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दिल्ली येथे कोअर कमिटीची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, वनमंत्री सुधीर मनगुंटीवार, ज्येष्ठ नेते आशिष शेलार आदी नेते उपस्थित होते.
शनिवारी भाजपची पहिली यादी जाहीर होणार…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कोर कमिटीची बैठक संपन्न झाल्यानंतर जवळपास ११० जागांवर उमेदवार निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच ४० जागांवर देखील चर्चा सुरू आहे. येत्या शनिवारी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…
ब्रेकिंग : रावेर यावल विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून अमोल जावळे यांना उमेदवारी निश्चित…
पाचोरा रोटरी तर्फे प्राथमिक शाळेला शैक्षणिक साधन सुविधा भेट
Central Railway : मध्य रेल्वेच्या १० कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापकांचा संरक्षा पुरस्कार