हॅलो राजकारणहॅलो सामाजिक

पाचोऱ्यात गणेशोत्सवाचा जल्लोष, आमदार किशोर पाटील यांचे बाप्पाला साकडे.

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात यंदाच्या गणेशोत्सवात आमदार किशोर आप्पा पाटील यांचे चिरंजीव सुमित किशोर पाटील यांनी उज्जैन येथील महाकाल मंदिराच्या प्रतिकृतीचा अत्यंत देखणा व आकर्षक देखावा उभारला होता. दरवर्षी वेगवेगळ्या नामांकित तीर्थक्षेत्रांचे देखावे तयार करण्याची परंपरा असल्याने पाचोऱ्यातील गणेश मंडळांमध्ये उत्साहाचे वातावरण असते. या देखाव्याला शहरातील भाविकांनी मोठ्या संख्येने भेट देत महादेव व गणरायाचे दर्शन घेतले.

पाचोरा आमदार किशोर पाटील
पाचोऱ्यात गणेशोत्सवाचा जल्लोष, आमदार किशोर पाटील यांचे बाप्पाला साकडे.

गणेश विसर्जनाच्या दिवशी पाचोरा शहरात मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात निरोप समारंभ पार पडला. यावेळी आमदार किशोर पाटील, प्रांताधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार विजय बनसोडे, पोलिस निरीक्षक राहुल पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक आरती करून बाप्पाला निरोप देण्यात आला. आरती दरम्यान वातावरणात “गणपती बाप्पा मोरया” या घोषणांचा जयघोष होत होता.

या प्रसंगी आमदार किशोर पाटील यांनी गणरायाच्या चरणी साकडे घालत म्हटले की, “सर्व जनतेला सुख, शांती व समृद्धी लाभो. शेतकऱ्यांवर आलेले अस्मानी संकट दूर होवो, शेतकऱ्यांची पिके भरघोस येवोत व त्यांचे जीवन सुखी होवो”.

गणेशोत्सवाच्या या पारंपरिक उत्सवात शहरातील नागरिक, महिला, युवक, तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि भक्तीगीतांच्या स्वरांनी संपूर्ण पाचोरा शहर दुमदुमून गेले.

इतर महत्वाच्या बातम्या…

अवैध वाळू वाहतूक : डंपरखाली चिरडून तरुणाचा मृत्यू; चालक पोलिसांच्या ताब्यात

यावल शहर हादरले – सहा वर्षीय मुलाचा दुष्कर्मानंतर खून, मृतदेह पोत्यात आढळला

💥 ब्रेकिंग : ११ वर्षात पहिल्यांदा डाग लागला, उद्घाटन कार्यक्रमात आमदारांनी व्यक्त केली खंत…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button