हॅलो राजकारण

पाचोरा शहरात महाविकास आघाडीचे उद्या जोडे मारो आंदोलन

हॅलो जनता, पाचोरा – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबना च्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे उद्या पाचोरा शहरात आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. मालवण येथील राजकोट किल्लावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा आठ महिन्यात पडला तर त्यावेळी जी विटंबना झाली या विरोधात महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत.

याचाच एक भाग म्हणून उद्या दि २ रोजी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे वतीने ‘जोडो मारो -‘ आंदोलन करण्यात येणार आहे. दि. २ रोजी पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी १० :३० वाजता आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनाच्या नियोजनासाठी येथील शासकीय विश्रामगृहात बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी कॉग्रेस चे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, उबाठा सेनेचे तालुका अध्यक्ष शरद पाटील, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे शहर अध्यक्ष अजहर खान, विधानसभा संघटक नितीन तावडे उबाठा सेनेचे शेतकरी सेना जिल्हा प्रमुख अरुण पाटील, माजी उपजिल्हा प्रमुख अभय पाटील, शहर प्रमुख अनिल सांवत, युवा सेना तालुका प्रमुख शशी पाटील, मनोज चौधरी, ज्ञानेश्वर चौधरी, अभिषेक खंडेलवाल, निखिल सोनवणे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष कल्पेश येवले आदी उपस्थित होते.

इतर महत्वाच्या बातम्या…

बांगलादेशात हिंदुंवर अत्याचार सुरूच, समोर आली धक्कादायक माहिती….

चाळीसगावात महाविकास आघाडीच्या वतीने प्रतिकात्मक अंतयात्रा काढून सरकारचा निषेध

धरणगावात विद्यार्थी सेना शाखेच्या फलकाचे जी. प. सदस्य प्रताप पाटील यांच्या हस्ते उद्घाटन, विद्यार्थ्यांनी बांधले शिवबंधन

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button