जागतिक महिला दिनी भडगाव येथे HPV लसीकरणाचा शुभारंभ.

भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील
या कार्यक्रमात प्रथम लाभार्थी म्हणून कु. दिक्षा तांबटकर हिला HPV लस देण्यात आली. पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांची कार्यक्रमास विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भडगाव नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा रेखाताई मालचे या होत्या.
यावेळी नगरसेवक सचिन चोरडिया, इमरान सय्यद, राहुल ठाकरे, अतुलसिंह परदेशी, नगरसेविका वैशालीताई विशाल पाटील, रंजनाबाई अनिल वाघ तसेच सामाजिक कार्यकर्ते जहांगीर मालचे उपस्थित होते. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंकज जाधव, भडगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. समाधान वाघ, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अंजली भेंडारकर, गिरडचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत शेळके यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, आरोग्य सेवक-सेविका, गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.
तसेच गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, हा आजार प्रामुख्याने ह्युमन पॅपिलोमा विषाणूच्या संसर्गामुळे होतो. या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी गार्डासिल-४ ही लस दिली जात असून पात्र मुलींनी ही लस घेऊन आरोग्य विभागास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ग्रामीण रुग्णालय व भडगाव तालुका आरोग्य विभागातील महिला अधिकारी, कर्मचारी, गटप्रवर्तक आणि आशा स्वयंसेविकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पिंपरखेडचे आरोग्य निरीक्षक संजय सोनार कळवाडीकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन गिरडचे आरोग्य निरीक्षक भरत गोसावी यांनी केले.



