चाळीसगावात महाविकास आघाडीच्या वतीने प्रतिकात्मक अंतयात्रा काढून सरकारचा निषेध
हॅलो जनता, प्रतिनिधी – मालवण मध्ये राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा झालेल्या अपमान आणि आज महायुती सरकारने राज्यात अनेक ठिकाणी केलेल्या आंदोलनाच्या निषेधार्थ जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे महाविकास आघाडीच्या माध्यमातून सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी टरबूज फोडून महायुती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला.
चाळीसगाव शहरातून वाजत गाजत ही अंत्ययात्रा काढत सरकारचा निषेध करण्यात आला. यात मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. आज पर्यंत कोणत्या सरकारच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा अशा पद्धतीने अपमान झालेला नसून हे पाप लपवण्यासाठी महायुतीच्या माध्यमातून जागोजागी आंदोलन सुरू आहेत. त्यांच्या अंगावर आलं त्यामुळे तो दोष ठेकेदारावर घातल्याचा आरोप ठाकरेंच्या सेनेचे नेते माजी खासदार उन्मेष पाटील यांनी केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पाचोरा येथील अधिवेशनात राकेश सुतार सन्मानित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागितली छत्रपती शिवाजी महाराजांची जाहीर माफी, म्हणाले….