⁠हॅलो रोजगार

आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती; ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्जाची मुदत..

हॅलो जनता न्यूज, जळगाव – एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल, जि. जळगाव अंतर्गत विविध शासकीय आश्रमशाळांमधील प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम) व माध्यमिक शिक्षक पदे तात्पुरत्या स्वरूपात बाह्यस्त्रोताद्वारे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था, नाशिक तसेच मे. महाराष्ट्र विकास ग्रुप, नाशिक या संस्थांमार्फत उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

तरी प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम) D.Ed & TET-2/CTET-(Compulsory) (Manithi Medium) & TAIT Score. व माध्यमिक शिक्षक (शैक्षणिक पात्रता:-BA/BSC (Specialized Subject-English/Math/Physics/Chemistry/Biology) & B.Ed (Compulsory) & TAIT Score ही शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.

इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक २० ऑक्टोबर २०२५ ते दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत https://sesmitd.com/ या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज सादर करावेत. भरतीसाठी वैजापूर, देवाझिरी, विष्णापुर, कृष्णापुर (ता. चोपडा), वाघझिरा, मालोद, डोंगरकठोरा (ता. यावल), लालमाती (ता. रावेर), जोंधनखोदा (ता. मुक्ताईनगर), वलठाण (ता. चाळीसगाव), पिंगळवाडा, दहीवद (ता. अमळनेर), चांदसर (ता. धरणगाव), सोनबर्डी (ता. एरंडोल) व सार्वे (ता. पाचोरा) या आश्रमशाळांमध्ये प्राथमिक शिक्षक मराठी 24 पदे तर माध्यमिक शिक्षक 2 पदांसाठी ही भरती होणार आहे.

उमेदवारांनी संस्थेच्या अटी व शर्तीप्रमाणे अर्ज सादर करावेत असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, यावल यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या…

🛑ब्रेकिंग: छत्तीसगड मध्ये गुन्हा पाचोरा पोलिसांची अटक, नेमके काय आहे प्रकरण…

🛑ब्रेकिंग: टोणगाव शिवारातील वृक्षतोडीवर कादिर खान यांचा खुलासा, “सर्व परवानग्या कायदेशीरपणे घेतल्या”

महिंदळे येथील सुदाम परदेशी यांची नाशिकच्या अप्पर जिल्हाधिकारीपदी नियुक्ती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button