हॅलो सामाजिक

आधारच्या नव्या ‘उदय’ लोगोचे निर्माते अरुण गोकुल यांची विशेष भेट

भडगाव : आधार कार्डच्या नव्या ‘उदय’ लोगोचे निर्माते अरुण गोकुल यांची भडगाव फर्स्ट समन्वयक अशुत्तोषकुमार पाटील व कमलेश सोनवणे यांनी विशेष भेट घेतली. या भेटीदरम्यान सामाजिक उपक्रम, युवा सक्षमीकरण तसेच डिजिटल ओळख व्यवस्थेतील बदलांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमावेळी Unique Identification Authority of India अंतर्गत कार्यरत त्रिस्सुर जिल्हा युवा अधिकारी बेन्सी मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. युवा नेतृत्व, नवकल्पना आणि राष्ट्रीय ओळख प्रणालीच्या बळकटीकरणाबाबत सकारात्मक संवाद साधण्यात आला.

‘उदय’ हा लोगो नवभारताच्या प्रगतीचे प्रतीक मानला जात असून डिजिटल भारताच्या वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा म्हणून त्याकडे पाहिले जाते. या भेटीमुळे युवा कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त होत असून सामाजिक व राष्ट्रीय स्तरावर कार्य करण्यासाठी नवचैतन्य निर्माण झाल्याचे मत उपस्थितांनी मांडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button