अमित शहांच्या ‘त्या’ शब्दाने चाळीसगाव भाजपच्या कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित
हॅलो जनता न्युज, चाळीसगाव –
चाळीसगाव विधानसभा मतदार संघात भाजपा महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाण यांच्या प्रचार सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तुम्हीं मंगेश चव्हाण यांना निवडून द्या. त्यांना मोठी जबाबदारी देण्याचा मी शब्द देतो,असे वक्तव्य केले होते. त्यामुळे चाळीसगाव भाजपच्या कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून मंगेश चव्हाण यांना मंत्रीपद मिळावे म्हणून थेट महादेवाला साकडे घातले आहे.
नव्या सरकारचा शपथविधी ५ डिसेंबर रोजी होणार आहे. भाजप, शिंदेसेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादीने संभाव्य मंत्र्यांची यादी तयार केली आहे. मात्र भाजप हायकमांडने हिरवा कंदील दाखवल्यावरच त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल. संभाव्य मंत्र्यांचे रेकॉर्डबुक दिल्लीत मागवण्यात आले असून केंद्रीय मंत्री अमित शाह या सर्व आमदारांच्या चारित्र्याची व कामाची तपासणी करतील. या परीक्षेत जे पास होतील त्यांनाच मंत्रिमंडळात स्थान मिळेल, असे भाजपकडून सांगण्यात आले आहे.
त्यामुळे अमित शहा यांनी चाळीसगावातील सभेत मंगेश चव्हाण यांच्या विकासकामांचे केलेले कौतुक आणि त्यांना निवडून दया, भाजप मंगेश चव्हाण यांना मोठा माणूस करेल, या शब्दांमुळे चाळीसगाव भाजपच्या कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
चाळीसगाव विधानसभा मतदार संघात भाजपा महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाण हे 86 हजार मतांनी निवडून आले आहेत. त्यांना मंत्रिपद मिळावे म्हणून चाळीसगाव येथे महादेव मंदिरात भाजपा कार्यकर्ते संजय कापसे व कार्यकर्त्यांनी पूजा करून महादेवाला साकडे घातले. यावेळी संजय कापसे, व जय बाबाजी भक्त परिवरचे नारायण कुमावत, मधुकर गुंजाळ, भूषण शिंगटे आदी उपस्थीत होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ब्रेकिंग : एकनाथ शिंदे घेणार उपमुख्यमंत्रीपद, त्यासोबत मिळणार “ही” महत्वाची खाती…
Mahayuti sarkar : महायुतीचा मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला, कोणत्या पक्षाला मिळणार किती मंत्रिपदे…