सेवानिवृत्त चालक अमृत पाटील यांचा स्त्युत उपक्रम, गावातील स्मशानभूमीत केले वृक्षारोपण
हॅलो जनता, प्रतिनिधी – एस टी महामंडळाच्या पाचोरा आगाराचे सेवानिवृत्त चालक श्री अमृत दोधू पाटील उर्फ (बाळू अण्णा) यांनी आपल्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमानिमित्ताने पाचोरा तालुक्यातील जळगाव या त्यांच्या मूळ गावी स्मशानभूमीमध्ये वृक्षारोपण केले आहे. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, एसटी महामंडळाच्या पाचोरा आकाराचे सेवानिवृत्त चालक अमृत पाटील हे महिन्याभरापूर्वी एसटी महामंडळाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले होते गेल्या अनेक वर्षांपासून एसटी महामंडळात चालक या पदावर उत्कृष्ट कामगिरी बजावत त्यांनी आपली सेवा यशस्वीपणे पूर्ण केली.
मात्र आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून उर्वरित आयुष्यात समाजसेवा करण्याचा निश्चय त्यांनी केला आणि याच माध्यमातून पाचोरा तालुक्यातील जळगाव या त्यांच्या मूळ गावी स्मशानभूमीमध्ये वृक्षारोपण करून हे झाडे पूर्णपणे जगवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे त्याच पद्धतीने अजून असे समाज उपयोगी उपक्रम राबवण्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…
चोपडा : १२ वर्षीय मुलीवर शेतात अत्याचार करत दगडाने ठेचून खून, संतापजनक प्रकाराने खळबळ
चांगली विकास कामे केल्याने गावाने केली आमदारांची लाडू तुला, कुठे घडला हा प्रकार….