रावेरमध्ये धनगर समाज आक्रमक, बुऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर धनगर बांधवांचे रस्ता रोको

हॅलो जनता, रावेर – राज्यात मराठा ओबीसी समाधानानंतर आता आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला आहे. धनगर समाजाला एसटीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला असून धनगर समाजाकडून जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात धनगर समाजाच्या नेत्यांसह नागरिक मोठ्या संख्येने महिला, लहान मुले सहभागी झाले होते. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांना जोडणाऱ्या बुऱ्हाणपूर अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आले. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. तसेच शेळ्या-मेंढ्यासह धनगर समाज बांधव रस्त्यावर उतरत रावेर शहरातून रावेर तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेळ्या मेंढ्या घेऊन महिला लहान मुले सहभागी झाले होते.
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे ही गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाजाची मागणी आहे आणि सरकारनेही लवकरात लवकर पूर्ण करावी, राज्यात याच मागणीसाठी विविध ठिकाणी धनगर समाजाच्या बांधवांचे आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत धनगर समाजाच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत धनगर समाज शांत बसणार नाही
– संदीप साळवे
इतर महत्वाच्या बातम्या…
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव
मेंढपाळ कुटुंबातील ११ वर्षीय मुलाला सर्पदंश, संदीप सावळे यांच्या तत्काळ मदतीने वाचले प्राण