बोदवड कृषी विभागात अधिकारी कर्मचाऱ्यांचा “आवो जावो घर तुम्हारा”, हैराण शेतकऱ्याने व्हिडिओ करत केली कारवाईची मागणी…
हॅलो जनता न्युज, बोदवड –
रब्बी हंगामाला सुरुवात झाली असून कृषी विभागात शेतकऱ्यांना अनेक कामे पडत असतात मात्र बोदवड तालुक्याला प्रभारी तालुका कृषी अधिकारी असल्याने शेतकऱ्यांचे काम वेळेवर होत नसून अधिकारी व कर्मचारी हे वेळेवर येत नसल्याने शेतकऱ्यांच्या कामांचा खोळंबा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. रब्बी हंगामाला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना शेतात अनेक कामे असतात मात्र काम सोडून कृषी कार्यालयात आपल्या समस्या घेऊन शेतकरी आल्यानंतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसल्याने तासंतास शेतकऱ्यांना आपल्या कामासाठी वाट पाहावी लागत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असून त्यांची काम वेळेवर होत नसल्याचे समोर आले आहे.
बोदवड तालुका कृषी कार्यालयात बायोमेट्रिक मशीन नसल्याने कर्मचारी केव्हाही येतात व केव्हाही जात असल्याचे व्हिडिओ पुरावे शेतकऱ्यांनी स्वतः व्हिडिओ शूटिंग करून हॅलो जनता न्युज ला पाठवले आहेत. त्यामुळे दांडी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी बोदवड तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
या संदर्भात शेतकऱ्यांनी कार्यालयात उपस्थित कर्मचाऱ्याला विचारपूस केली असता त्याने शेतकऱ्यांना उडवा उडविची उत्तरे दिल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कुणाचा धाक नसल्याचे समोर आले आहे. मात्र दुसरीकडे शेतकऱ्यांना वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत असून बाहेर गावावरून येणारे शेतकऱ्यांना सकाळपासून कार्यालयात ताटकळत बसावे लागत आहे.
कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची शेतकऱ्यांची मागणी
कृषी विभाग ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा विभाग असून या कार्यालयात कर्मचारी वेळेवर हजर राहत नसल्याने या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे व बायोमेट्रिक हजेरी बसवण्यात यावे, तालुका कृषी कार्यालयात खालील पदे रिक्त आहेत. तालुका कृषी अधिकारी (१)एक कृषी अधिकारी ऑफिस (१)एक मंडळ अधिकारी (१)एक कृषी सहाय्यक(४) चार कृषी पर्यवेक्षक ऑफिस(१) एक शिपाई एक चालक (१)एक असे एकूण दहा पदे रिक्त असल्यामुळे ही बरे तात्काळ भरावी आणि जे कर्मचारी आपल्या कर्तव्यात कसूर करत आहेत त्यांच्या कठोर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…
ब्रेकिंग : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, जमीन मोजणीच्या शुल्कात वाढ….