पाचोऱ्यात खाजगी बिल्डरांकडून बांधकामासाठी अवैध वाळूचा वापर, तात्काळ कारवाई करा अन्यथा…

हॅलो जनता न्युज, पाचोरा
पाचोरा शहरातील पुनगाव शिवारात अनेक खाजगी बांधकाम व्यासायिकांचे घरांचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामांसाठी बांधकाम व्यवसायिकांकडून सर्रासपणे अवैध वाळूचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाचोरा शहरातील पुनगाव शिवारासह इतर भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू आहेत. मात्र या बांधकामासाठी लागणारी वाळू ही नेमकी कुठून आणली जाते आहे याची माहिती गुलदस्त्यात आहे.
पाचोरा शहरातील पुनगाव शिवारात मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू आहेत. याठिकाणी हजारो ब्रास अवैध वाळू ही पडून आहे. मात्र या वाळूवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याचा प्रकार समोर आला आहे. शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवून स्वतःचे खिशे भरणाऱ्या या बांधकाम व्यावसायिकांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीमुळे परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास
खाजगी बांधकाम व्यावसायिकांकडून सुरू असलेल्या बांधकामांना लागणारी वाळू ही मध्यरात्री वाळू माफियामधून आणली जाते. रात्रीच्या वेळी ट्रॅक्टरच्या माध्यमातून रात्रभर सुरू असणाऱ्या वाहतुकीमुळे परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रासाला तोंड द्यावे लागत आहे. तसेच बेदारकपणे ट्रॅक्टर चालक अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर चालवत असल्याने परिसरातील रस्ते मोठ्या प्रमाणावर खराब झाले असून याचा नाहक त्रास हा या भागातील रहिवाशांना सोसावा लागत आहे. त्यामुळे या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
अन्यथा परिसरातील नागरिकांचा आंदोलनाचा इशारा…
पाचोरा शहरातील पुनगाव शिवारासह इतर परिसरात खाजगी बिल्डरांकडून अनेक काम सुरू असल्यामुळे रात्री अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर हे रस्त्यांवरून प्रचंड वेगाने ये जा करत असतात त्यामुळे रात्रीच्या वेळी आवाजामुळे आम्हाला प्रचंड त्रास होत आहे. या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा या भागातील रहिवाशांनी दिला आहे. त्यामुळे या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांवर आणि बांधकामासाठी अवैध वाळूचा वापर करणाऱ्या खाजगी बिल्डरांवर प्रशासन कारवाई करेल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ब्रेकिंग : छत्रपती संभाजीनगर ते चाळीसगाव (93 किमी) रेल्वे मार्गाच्या अंतिम सर्वेक्षणाला मंजुरी…
ब्रेकिंग : अज्ञात वाहनाने झोपेतच चिरडलेल्या तिघां मजुरांची ओळख पटली…
ब्रेकिंग : राज्यातील ३० टक्के कुटुंबाचे स्वस्त धान्य बंद होणार, हे आहे कारण….