पाचोरा भडगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा, राष्ट्रीय काँग्रेसचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन….
हॅलो जनता, प्रतिनिधी – पाचोरा, भडगाव तालुक्यात झालेल्या वादळी पावसामुळे दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे तात्काळ सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी कॉग्रेस ने केली आहे. मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
पाचोरा, भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मागील वर्षी पडलेल्या दुष्काळाची दमडी देखील शासनाने दिली नाही. इतर तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या आमदारांच्या प्रयत्नमुळे लाखो रुपयांचे दुष्काळाचे अनुदान प्राप्त झाले मात्र पाचोरा – भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याची कामे या सरकारने केली आहे.
पाचोरा भडगाव तालुक्यात दोन दिवसाच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान….
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे खरीप हंगामाचे पिक कापणीवर आले असतांना अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे तात्काळ शेतकऱ्यांच्या बांधावर जाउन नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधित तहसीलदार यांना देण्यात यावे यासाठी कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली येथील उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात शेतकरींचे नुकसान चे पंचनामे करून शासनाला अहवाल देण्यात यावा जेणेकरून तात्काळ ओला दुष्काळ शासनाने जाहीर करावा अशी मागणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांनी तात्काळ पाचोरा – भडगाव तहसीलदार यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. यावेळी कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अमजद पठाण, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष प्रदीप पाटील, जिल्हा सचिव इरफान मनियार, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष शरीफ शेख, एस सी सेल तालुका अध्यक्ष श्रावण गायकवाड, युवक माजी अध्यक्ष संदीप पाटील, शहर उपाध्यक्ष शंकर सोनवणे, फरीद शेख, शेख रशीद, संदीप वाघ आदी उपस्थित होते.
इतर महत्वाच्या बातम्या…
तब्बल ८० हजार शेतकऱ्यांची ई – केवायसी नाही, कापूस सोयाबीन पिकाच्या अर्थ सहाय्यापासून राहणार वंचित….
Jalgaon : समाजाची भरकटलेली दिशा बदलविण्याची ताकद महिलांमध्ये – जयश्री पोफळे