पर्यावरण दिनानिमित्त एन.एस.एस व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत २ हजार सीड बॉल चे रोपण….
हॅलो जनता (जळगाव) – औद्योगीक प्रशिक्षण संस्था जळगाव व राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत पर्यावरण दिनानिमित्त २ हजार सीडबॉल चे रोपण करण्यात आले. महत्वाचे म्हणजे हे सीडबॉल स्वतः राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी बनवले होते. तसेच वृक्षरोपण व वृक्ष लागवडीसाठी खड्डे पण खोदण्यात आले.
हरित शहर सुंदर शहर हे बोधवाक्य घेऊन यावर्षी जास्तीत जास्त वृक्ष रोपण करण्याचा स्वयंसेवकांना संकल्प देण्यात आला असून सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे प्राचार्य श्री. एस. एम. पाटील व उपप्राचार्य राजश्री पाटील तसेच गट निदेशक श्री नितीन चौधरी, श्री एस आर बोरोले यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राष्टीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी श्री रमेश सपकाळ, संदीप उगले, शिल्प निदेशक नियाज तडवी, फारूक तडवी, संस्थेतील सर्व कर्मचारी बांधव एन एस एस स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.
इतर महत्त्वाच्या बातम्या…
Suicide : लग्नाला विरोध, प्रेमी युगुलाने केली धावत्या रेल्वेखाली आत्महत्या…..
What’s App : व्हाटसअॅप स्टेट्स ने चोरीला गेलेला बैल सापडला, सोशल मीडियाचा शेतकऱ्याला झाला फायदा
Weather update : महाराष्ट्रातील मान्सून सक्रिय, या जिल्ह्यात होणार जोरदार पाऊस…