⁠हॅलो क्राईम

जामनेर बालिका अत्याचार आणि खून प्रकरणतील आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची 10 पथके रवाना

हॅलो जनता प्रतिनिधी – जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील बालिकेवर एका नराधमाने अत्याचार करून तीच निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेने महाराष्ट्रासह जळगाव जिल्हा हादरला आहे. जामनेर तालुक्यातील केकतनिंभोरा शिवारातील चिंचखेडा गावठाण हद्दीत राहणाऱ्या ६ वर्षीय मुलीवर त्याच भागातील नराधमाने अत्याचार करून तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

आई वडील शेतात कामाला गेले असताना त्या नराधमाने खावूचे आमिष दाखवून केळीच्या बागेत नेत अत्याचार करत अत्याचाराची माहिती कुणाला कळू नये म्हणून पुरावे नष्ट करण्यासाठी बालिकेचा निर्घृण खून केला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटना स्थळी दाखल झाले असून सदर बालिकेचा मृतदेह जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

सदर घटने संदर्भात जामनेर पोलीस स्थानकात कलम 302, 363, 201 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपी हा फरार असून आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी तब्बल दहा पथक तयार केले असून आजूबाजूच्या परिसरासह इतर ठिकाणी शोध घेणे सुरू आहे. लवकरच संशयित आरोपीस अटक करण्यात येणार असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी दिली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या..

अखेर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षक पदी या अधिकाऱ्याची वर्णी…

रावेर तालुक्याला चौथ्यांदा वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा, कोकणच्या धर्तीवर पॅकेज जाहीर करण्याची साळवे यांची मागणी….

जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ यांनी केली नुकसानग्रस्त शेताची पाहणी

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button