जळगावात वाळू माफिया सुसाट, भर वस्तीतून डंपरच्या माध्यमातून वाळू वाहतूक सुरू.
हॅलो जनता, प्रतिनिधी – जळगाव शहरातून अवैध वाळू वाहतूक सुरू असून वाळू माफिया सुसाट झाल्याचे पाहायला मिळत आहे. शहरातील अनेक भागातून अशा पद्धतीने वाळू वाहतूक सुरू आहे की, जसे या वाळू माफियांवर कोणाचेच नियंत्रण नाही त्यांना प्रशासनाकडून खुली सुट मिळाली असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.
जळगाव शहरातील जुना खेडी रोड लगत मोठी वस्ती आहे. मात्र रात्री १० वाजेपासून सर्रास डंपर आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने वाळू माफियांच्या माध्यमातून अवैध वाळू वाहतूक सुरू आहे. रात्रभर या डंपर आणि ट्रॅक्टरच्या माध्यमातून सुरू असलेल्या वाळू वाहतुकीमुळे या भागातील नागरिकांना रात्रभर त्रास होत आहे. अनेकदा या नागरिकांनी या बाबतीत अनेक तक्रारी केल्या आहेत मात्र त्यांच्या तक्रारींची कोणतीच दखल घेतली जात नसल्याचे देखील नागरिकांचे म्हणणे आहे.
नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत देखील अवैध वाळू चोरीचा विषय समोर आला होता मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी सुरेक्षेच कारण देत विषय पुढे नेल्याचे पाहायला मिळाले होते. जर प्रशासन हतबल झाले असेल तर नागरिकांनी कुणाकडे दाद मागावी असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या बेदारकपणे चालणारे डंपर आणि ट्रॅक्टर च्या माध्यमातून जेव्हा अपघात होतो कुणा निष्पाप जीव जातो त्या वेळी प्रशासनाला जाग येते आणि त्यावेळी मात्र थातुर मातुर कारवाई करत वेळ मारून नेण्याचे प्रकार हे महसूल प्रशासनाकडून सुरू असतात. त्यामुळे लवकरच या भागातील नागरिक एकत्र येवून वाळू माफियांना अभय देणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचे देखील सांगितले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उद्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर…
Jalgaon : इनर व्हील क्लब जळगाव तर्फे जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त महिलांमध्ये जनजागृती
Jalgaon : जळगाव जिल्हा क्रीडा संकुलाची दुरावस्था, मनसे आक्रमक