डॉ. चंद्रकांत बरेला यांच्या जन आशीर्वाद यात्रेला चोपड्यात उस्फुर्त प्रतिसाद
हॅलो जनता, प्रतिनिधी – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चोपडा तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे स्थानिक भूमिपुत्र डॉ.चंद्रकांत बारेला यांच्या नेतृत्वाखालील जन आशीर्वाद यात्रा काढण्यात आली आहे. या जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून चोपडा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात, प्रत्येक समाजातील घटकांना भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. डॉक्टर चंद्रकांत बारेला यांच्या जन आशीर्वाद यात्रेला नागरिकांचे मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे. चोपडा तालुक्यातील मितावली गावात जन आशीर्वाद यात्रा उत्साहात पार पडली. या यात्रेत मोठ्या संख्येने गावकरी सहभागी झाले होते.
डॉ. बारेला यांनी गावात स्थानिक नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या संवादादरम्यान त्यांनी गावाच्या विकासासाठी पुढील योजनांचा आराखडा कसा असेल या संदर्भात गावकऱ्यांशी चर्चा केली. तसेच असाच आशीर्वाद जनतेने दिला तर प्रामाणिकपणे सामाजिक व राजकीय कर्तव्य निभावण्याचा निर्धार केला.
यात्रेदरम्यान डॉ. बारेला यांनी गावातील श्री मंदिरात श्रद्धापूर्वक दर्शन घेतले. आरतीच्या वेळी त्यांनी सहभागी होत भावपूर्ण आरतीत भाग घेतला आणि ग्रामस्थांसोबत धार्मिक वातावरणाचा अनुभव घेतला. या यात्रेमुळे गावात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक नागरिकांनी डॉ.बारेलां याच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. या प्रसंगी चो.सा.का. माजी चेअमन अतुल नाना ठाकरे, सचिन दादा डाभे, अमोल दादा राजपूत, दीपक दादा पाटील, राहुल दादा पाटील सह गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक व मित्र परीवार उपस्थित होते.
इतर महत्वाच्या बातम्या…
पाचोरा पोलीस निरीक्षकांची तात्काळ बदली करा, भाजप युवा मोर्चाची मागणी…
रावेरमध्ये धनगर समाज आक्रमक, बुऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर धनगर बांधवांचे रस्ता रोको