Silver Rate : चांदीच्या दरात आतापर्यंतची सर्वाधिक वाढ, जाणून घ्या आजचे दर…
हॅलो जनता (जळगाव) चांदीच्या भावात (Silver Rate) एकाच दिवसात १ हजार ४०० रुपयांची वाढ होऊन ती ८७ हजार ४०० रुपये प्रति किलो अशा विक्रमी दरावर पोहचली. चांदीचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक भाव ठरला आहे. सोन्याचे भाव ७३ हजार ८०० रुपये प्रति तोळ्यावर स्थिर आहे. एप्रिलमध्ये चांदीच्या भावात वाढ सुरु झाली होती, नंतर मात्र एप्रिलच्या अखेरीस भाव कमी झाले.
पुन्हा मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते वाढू लागले. त्यात १३ मेपासून तर सातत्याने वाढ होत आहे. यामध्ये ८४ हजार रुपयांवर असलेल्या चांदीच्या भावात १३ मे रोजी ५०० रुपयांची वाढ होऊन ती ८४ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहचली. दुसऱ्या दिवशी १४ रोजी पुन्हा ५०० रुपयांची वाढ होऊन ती ८५ हजार रुपयांवर पोहचली, १५ रोजी याच भावावर स्थिर राहिल्यानंतर १६ रोजी एक हजार रुपयांची वाढ झाली व चांदी ८६ हजार रुपये प्रति किलो अशा उच्चांकी भावावर पोहचली असून हा उच्चांक मागे टाकत आज एक हजार ४०० रुपयांची वाढ होऊन चांदी ८७ हजार ४०० रुपये प्रति किलोवर पोहचली आहे.
Silver Rate : ऐन लग्नसराई मध्ये सोन्या चांदीच्या दरात वाढ सुरू….
गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या आणि चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत असून आज चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे लग्नसराईमध्ये सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांचे बजेट हे कोलमडले आहे तसेच अनेक ठिकाणी नियोजित पैशांमध्ये जितके सोने आणि चांदी काही खर्च करताना दिसत असून मागील वर्षाच्या तुलनेत सोन्या चांदीच्या विक्रीत काही प्रमाणात घट झाल्याची माहिती सुवर्ण व्यावसायिकांनी हॅलो जनता वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.
मोठी बातमी : जळगाव-पुणे विमानसेवा (Jalgaon Airport) होणार सुरू, २४ आणि २६ मे रोजी ट्रायल