Raver Crime : जानोरी जंगलात सावदा पोलिसांची धडक कारवाई: चार गावठी दारू भट्ट्या उद्ध्वस्त
हॅलो जनता, रावेर
जळगाव जिल्ह्यातील रावेर (Raver Crime) तालुक्यातील सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आदिवासी भागातील जानोरी जंगलात अवैध गावठी दारू भट्ट्यांवर धडक कारवाई करण्यात आली.
सावदा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तब्बल पाच तास जंगलात शोधमोहीम राबवून चार अवैध गावठी दारू भट्ट्या उद्ध्वस्त केल्या. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सावदा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी सांगितले की, अशा अवैध दारू उत्पादन व विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई सतत सुरूच राहणार आहे.
ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार करण्यात आली. यात सहाय्यक फौजदार खोडपे, पोलीस नाईक बाविस्कर, सैंदाणे, तडवी आणि पोलीस कॉन्स्टेबल जोशी यांचा समावेश होता.