Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांची मुख्यमंत्र्यांवर टिका, ईडी चौकशीची मागणी

हॅलो जनता न्युज, मुंबई :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुलीने दहावीची परीक्षा दिली नाही, म्हणून ते सागर बंगल्यावरून वर्षावर गेलेले नाहीत, असे सांगितले जात असले तरी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या हक्कासाठी त्यांनी गादीवर बसविले असल्याचे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी म्हटले आहे. “आमच्या हक्काचे आरक्षण तुम्ही आम्हाला देत नाहीत. महाराष्ट्राच्या मुलीत त्यांना त्यांची मुलगी दिसत नाही का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
काही दिवसांपूर्वी कराड येथील व्हिडीओ पाहताना अशोक मोहिते यांच्यावर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना घडली. यावर जरांगे पाटील म्हणाले, “हे थांबणार नाही, याची सर्व जबाबदारी मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांची आहे.” तसेच, धनंजय मुंडे यांची टोळी एक कलंक असून ते जेलमधील आरोपींशी संपर्कात आहेत, असा संशय त्यांनी व्यक्त केला. “इतकी संपत्ती सापडलीय, त्यामुळे ईडीने त्यांची चौकशी करावी,” अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली.
जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी 302 प्रकरणांविषयी विचारले की, “जो पकडला गेला त्याच्यावर 302 दाखल आहे का? त्याला डोक्यात मुंग्या आल्यात तर दवाखान्यात ठेवले, मग महादेव मुंडेला का नाही ठेवले?” असा सवालही त्यांनी केला. “त्या जातीची एक पत होती, पण आता मान घालून जगावं लागतं,” असे त्यांनी सांगितले.
“धनंजय मुंडे कडे चाटेने मोबाईल ठेवला आहे. तो नाशिकला ठेवला आणि फोन लावला, मग त्यांना आरोपी का नाही केलं?” असा देखील प्रश्न जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. त्यांनी हे देखील म्हटले की, “धनंजय मुंडे सांगत आहे की लोक त्याच्या सोबत आहेत, पण ती जप्त प्रॉपर्टी त्याची नाही. त्यामुळे ईडीने चौकशी करायला हवी.”
“त्याच डॉक्टरची चौकशी का केली नाही? अनेक जण बाहेर आहेत, मग तुम्ही कोणाला धरले?” असाही सवाल जरांगे पाटील यांनी केला. “फडणवीस यांना आनंदाची गादी आमच्यामुळे मिळाली आहे,” असं सांगून त्यांनी यापुढे येणाऱ्या चार्जशिटमध्ये सर्व गोष्टींचं उघडकीस येणं अपेक्षित आहे, असं त्यांनी म्हटले. “तो पुरावा नष्ट करत आहे,” असाही आरोप त्यांनी केला. “हे खंडणी मागणारे सर्व चार्जशिटमध्ये आले पाहिजेत, आणि या सर्वांची ईडीची चौकशी होणं आवश्यक आहे,” अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे.
India Vs England : भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला वनडे सामना सुरू ; भारतासमोर 249 धावांचं आव्हान !
Raver : शेतकऱ्याच्या दुचाकीच्या डिक्कीतून ३ लाखांची चोरी ; गुन्हा दाखल !
जळगावमध्ये बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक ; १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल