हॅलो क्राईम
Bhusawal Crime : भुसावळमध्ये १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण, गुन्हा दाखल !
हॅलो जनता न्युज, भुसावळ :
भुसावळ (Bhusawal Crime) शहरातील एका भागात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा ३१ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता अज्ञात व्यक्तीने फूस लावून अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शनिवारी, १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ (Bhusawal Crime) शहरातील एका भागात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शुक्रवारी ३१ जानेवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास पिडीत मुलगी ही घरी एकटी असतांना अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत तिला फूस लावून पळविले. हा प्रकार तिच्या नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर तिच्या पालकांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार शनिवारी १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यत अज्ञात व्यक्तीविरोधात अपहणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ हे करीत आहे.
Shevga farming : शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग ; शेवगाच्या पाल्याची पावडर थेट अमेरिकेत निर्यात
Gautam Gambhir : टीम इंडियात फूट आणि तणाव ? ; गौतम गंभीरने दिले स्पष्टीकरण
Union Budget 2025 : अर्थसंकल्पात 12 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांसाठी खुशखबर !