भडगाव डॉक्टर असोसिएशनच्या गणरायाला सातव्या दिवशी मोठ्या उत्साहाने निरोप.

हॅलो जनता प्रतिनिधी : यशकुमार पाटील भडगांव
भडगाव : भडगाव डॉक्टर असोसिएशनच्या वतीने प्रथमच सात दिवसीय गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सात दिवस भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात विविध उपक्रमांनी गणेशोत्सव साजरा करण्यात आला. सातव्या दिवशी ढोल-ताशांच्या गजरात, गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात गणरायाला निरोप देण्यात आला.

या सात दिवसीय गणेशोत्सवाच्या कालावधीत व्याख्यानमालेसह विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. डॉक्टर असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत हा उत्सव यशस्वी केला.
विशेष म्हणजे महिला डॉक्टरांच्या टीमनेही गणेशोत्सवातील विविध उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. त्यांच्या सक्रिय सहभागामुळे उत्सवाला वेगळीच रंगत आली. डॉक्टरांच्या व्यावसायिक जबाबदाऱ्यांसोबतच सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्येही एकत्रित सहभागाचे दर्शन यावेळी घडले.
सातव्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉक्टर असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य तसेच महिला डॉक्टर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ढोल-ताशांचा गजर, गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला. भक्तिभावपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप देण्यात आला.
सात दिवसांच्या या गणेशोत्सवातून एकजुटीचा, सामाजिक बांधिलकीचा आणि सेवाभावाचा संदेश देत भडगाव डॉक्टर असोसिएशनने प्रथमच आयोजित केलेला गणेशोत्सव उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न केला.




