विद्यार्थी स्नेहसंमेलन : २१ वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले विद्यार्थी — शालेय आठवणींना दिला उजाळा

हॅलो जनता न्यूज, म्हसावद | शहादा तालुक्यातील म्हसावद येथील कुबेर हायस्कूल येथे अविस्मरणीय क्षणांचा सोहळा अनुभवायला मिळाला. सन १९९९ ते २००४ दरम्यान या विद्यालयात शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल २१ वर्षांनंतर एकत्र येत आपल्या शालेय आठवणींना उजाळा दिला. जुन्या आठवणींना उजाळा देताना अनेकांचे डोळे पाणावले होते.
या माजी विद्यार्थी स्नेहसंमेलनाला विद्यालयाचे माजी प्राचार्य ईश्वर पाटील अध्यक्षस्थानी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य मनोज पाटील, उपप्राचार्य पी.जी. देसले तसेच माजी प्राचार्य यू.बी. पाटील, एम.एन. पाटील, आर.जी. पाटील, आर.आर. पाटील, बी.बी. पाटील, ए.सी. पाटील, पी.एल. न्हावी, आर.डी. पाटील, एम.एम. पाटील, एन.डी. बागले, वी.डी. सूर्यवंशी, ए.आर. पाटील, बी.आर. कोकणी, व्ही.एम. बोरदे, सौ. एस.आर. पाटील, सौ. एस.आर. पटेल आदी मान्यवर उपस्थित होते. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमधून छगन भाईजी पाटील, ब्रिजलाल पाटील, पांगा पटले आणि राजू खेडकर हेही या प्रसंगी उपस्थित होते.
या स्नेहसंमेलनात ५५ माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये ५० पुरुष विद्यार्थी आणि ८ महिला विद्यार्थीनी तर ५ विद्यार्थी आपल्या परिवारासह उपस्थित होते. सर्वांनी आपला परिचय देत सध्या ते कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहेत याची माहिती शिक्षकांना दिली. अनेकांनी आपल्या यशाचे श्रेय शिक्षकांना देत भावनिक शब्दांत कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमात मलकापूर पोलीस दलात कार्यरत स.पो.नी. हेमराज कोळी आणि २००४ च्या बॅचचे पोलिस कॉन्स्टेबल सचिन तावडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या यशाचा उल्लेख होताच उपस्थितांकडून टाळ्यांचा कडकडाट झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसंत कुलकर्णी यांनी केले, सूत्रसंचालन अशोक बागले यांनी तर आभार प्रदर्शन उपसरपंच सचिन बेदमुथा, निलेश भामरे आणि मोनिका पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी *वसंत कुलकर्णी, सचिन बेदमुथा, निलेश भामरे, स्वप्नील पाटील, पंकज पटेल, ज्ञानेश्वर खेडकर, नितीन जैन, पंकज पाटील, उमेश ईशी, मोनिका पाटील, मनिषा पाटील, प्रणिता मराठे, निलेश खैरनार, अमरदीप मोरे, मगन सूर्यवंशी, संदीप पाटील, फिरोज शहा, संतोष जगदाळे राधे श्याम खोंडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या शेवटी गतमाजी शिक्षक व विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा देत सर्वांनी पुन्हा भेटण्याचा संकल्प व्यक्त केला. शालेय आठवणींनी भारावलेल्या या स्नेहसंमेलनाने सर्वांच्या मनात एकच भावना जागवली — “शाळा संपली, पण आपलेपणा अजूनही तसाच आहे…”
इतर महत्वाच्या बातम्या…
🚨 ब्रेकिंग: नदीत वाहून गेलेल्या भावाचा मृतदेह तब्बल २० दिवसांनी सापडला, तिरडीवरच शेवटची भाऊबीज
🚨 ब्रेकिंग : ग्रामीण भागातही स्टार्टअप्सचा नवा युगारंभ, मंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा
🚨 ब्रेकिंग : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण…



