Jalgaon Crime : लाच घेताना तलाठ्याला एसीबीने पकडले रंगेहाथ
हॅलो जनता न्युज, जळगाव
जळगाव (Jalgaon Crime) जिल्ह्यातील कुसुंबा गावात एका तलाठीने नागरिकांकडून ७/१२ उतारा आणि स्लॅब रजिस्टरमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी लाच मागितली होती. या प्रकरणी एका नागरिकाने लाप्रवि जळगाव येथे तक्रार दिल्यानंतर, लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचून ३ हजार रुपये लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने आपले आणि आपल्या भावाचे नाव ७/१२ उताऱ्यावर आणि स्लॅब रजिस्टरवर नोंदवण्यासाठी कुसुंबा तलाठीकडे अर्ज दिला होता. तलाठी नितीन शेषराव भोई यांनी या कामासाठी ५ हजार रुपये लाच मागितली होती. तडजोड करून लाच ३ हजार रुपयांवर आली. तथापि, तक्रारदाराने ही बाब मान्य न करता लाप्रवि जळगाव येथे तक्रार केली.
लाप्रविच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करून तलाठीच्या कार्यालयात सापळा उभारला. पथकाने तलाठ्याला ३ हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडले. या कामगिरीमध्ये एसीबीचे उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक सुरेश पाटील, बाळू मराठे आणि अमोल सूर्यवंशी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
आपल्याला कोणत्याही सरकारी अधिकारी कडून लाचेची मागणी होत असल्यास, कृपया खालील पत्त्यावर त्वरित संपर्क करा:
लाप्रवि जळगाव, अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव
दूरध्वनी क्रं. 0257-2235477
मोबाईल क्रं. 9702433131
टोल फ्री क्रं. 1064
जळगावमधील पत्रकारांसाठी ‘नवी गृहनिर्माण सोसायटी’ काढण्यासाठी मदत करणार – मंत्री गुलाबराव पाटील
C P Radhakrishnan : राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा जळगाव जिल्हा दौरा
C P Radhakrishnan : राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा जळगाव जिल्हा दौरा