पोलीस अधीक्षकांसह जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी धरला ठेका, जळगाव पोलीस दलाच्या क्रीडा स्पर्धेची उत्साहात सांगता
हॅलो जनता न्युज, जळगाव –
जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या क्रीडा स्पर्धेची आज उत्साहात सांगता झाली. यावेळी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्यासह जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गाण्यांवर ठेका धरल्याचे दिसून आले. दि. २ ते ५ डिसेंबरच्या कालावधीत जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्यात. या स्पर्धेत कुस्ती, बॉक्सिंग,जुडो, खो-खो, वेट लिफ्टिंगसह इतर खेळात पोलीस दलातील १२६ खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
पोलीस मुख्यालयाच्या टीमने सर्वाधारण चॅम्पियनशिप पटकावली आहे. आज सायंकाळी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर एका दिमाखदार कार्यक्रमात या स्पर्धेच बक्षीस वितरण सोहळा पार पडला. बक्षीस वितरण सोहळा पार पडल्यानंतर पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्यासह जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गाण्यांवर ठेका धरला.
ब्रेकिंग : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, जमीन मोजणीच्या शुल्कात वाढ….
कंडारी आरोग्य उपकेंद्राअंतर्गत राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेस प्रारंभ
अमित शहांच्या ‘त्या’ शब्दाने चाळीसगाव भाजपच्या कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित