ब्रेकिंग : विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणीची चांदी, कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मिळतेय 200 ते 400 रुपये मजुरी….
हॅलो जनता, प्रतिनिधी (पाचोरा)
निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांकडून मतदारसंघात प्रचाराला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. मतदारांना प्रलोभन देण्यासाठी अनेक कार्यक्रम हे विविध मतदार संघात आयोजित करण्यात येत आहे. मात्र कामधंद्याचे दिवस सुरू असल्याने या कार्यक्रमांना गर्दी जमवण्याचे आव्हान इच्छुक उमेदवारांसमोर उभे ठाकले आहे. त्यामुळे गर्दी जमवण्यासाठी पैसे देऊन महिला कार्यक्रमाला बोलावल्या जात असल्याचा सर्रास प्रकार हा पाचोरा भडगाव मतदार संघासह जळगाव जिल्ह्यातील इतर मतदारसंघात सुरू आहे.
विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पाचोरा भडगाव मतदार संघात इच्छुक उमेदवारांकडून महिलांसाठी विविध कार्यक्रम, समाजाचे मेळावे असे भरमसाठ कार्यक्रम सुरू आहेत. या कार्यक्रमांमध्ये सर्वाधिक गर्दी नेमकी कुणाकडे हे दाखवण्यासाठी इच्छुक उमेदवाराकडून जास्तीत जास्त महिला कार्यक्रमासाठी उपस्थित केल्या जात आहेत. शेतात कामे सुरू असल्याने महिला या कामाला जात आहेत त्यामुळे परिणामी या राजकीय कार्यक्रमाला गर्दी होत नसल्याचे पाहायला मिळत आहे.
त्यामुळे पाचोरा शहरात चक्क काही महिला या शहरात आणि ग्रामीण भागात फिरत ज्या महिला दिसतील त्यांना कार्यक्रमाला आणि प्रचार फेऱ्यांना येण्यासाठी चक्क 200 ते 400 रुपयांचे प्रलोभने देत असल्याचे समोर आले आहे. महायुती सरकारकडून अगोदरच महिलांसाठी अनेक योजना राबविल्या जात असल्याने महिला या मालामाल झाल्याचा पाहायला मिळत आहे. त्यातच प्रचार फेरी आणि कार्यक्रमात हजेरी लावल्यामुळे 200 ते 400 रुपये रोज मिळत असल्याने महिलांची विधानसभा निवडणुकीत चांदी झाल्याची चर्चा सध्या पाचोरा भडगाव मतदार संघात सुरू आहे.
आज काही महिला या पाचोरा शहरात फिरत होत्या. एका इच्छुक उमेदवाराच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 200 ते 400 रुपये रोज देवू कार्यक्रमाला या असा आग्रह महिलांना करत होत्या. हा प्रकार स्वतः आमच्या हॅलो जनता च्या प्रतिनिधीच्या लक्षात आला आणि त्यांनी याचे वृत्तांकन केलं.
इतर महत्वाच्या बातम्या…
Chimanrao Patil : पारोळा येथे आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते महायुतीच्या रिपोर्ट कार्ड प्रकाशन