हॅलो शिक्षण

रोकडा फार्म शाळेत विद्यार्थ्यांचा कलाविष्कार; कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील

भडगाव : रोकडा फार्म येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देणारा कलाविष्कार कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित छावा गीते, देशभक्तीपर नृत्य, लावणी, रिमिक्स नृत्य, अहिराणी गीते तसेच समाजप्रबोधनपर नाटिका यांसारख्या विविध सादरीकरणांनी उपस्थितांची दाद मिळवली.

कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील, शापोआ अधिक्षक गणेश पाटील, केंद्रप्रमुख अशोक खेडकर यांच्यासह गावचे सरपंच, उपसरपंच दिनेश परदेशी, युवराज सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षणप्रेमी व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी योगेश शिंपी यांनी गावात प्रथमच आयोजित सांस्कृतिक उपक्रमाचे कौतुक करत शाळेला डिजिटल करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले. आमदार किशोर आप्पा पाटील यांचे सुपुत्र व शिवसेना युवानेते सुमित पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत शाळेला आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश देशमुख यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षिका दिपाली देशमुख, पल्लवी मोरे, सुनिता परदेशी, यशराज निकम, राजेंद्र पाटील (पाचोरा) तसेच गावातील सखी सावित्री ग्रुप, जय बजरंग मित्र मंडळ व नवनाथ मित्र मंडळ यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button