हॅलो सामाजिक

भडगावात आमदार सत्यजित तांबे यांच्या निधीतून शाळा-महाविद्यालयांना डिजिटल पोडियम वाटप

भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील 

भडगाव : नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार  सत्यजित सुधीर तांबे यांच्या स्थानिक विकास निधीतून भडगाव शहर व तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयांना अद्यावत व उपयुक्त असे पोडियम (डिजिटल डायस) वाटप करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत सौ. सुमनताई गिरधर पाटील माध्यमिक विद्यालय, लाडकुबाई विद्या मंदिर, आदर्श कन्या महाविद्यालय, बाल विकास विद्या मंदिर, अग्लो उर्दू हायस्कूल भडगाव तसेच तालुक्यातील इतर महाविद्यालयांना हे डिजिटल पोडियम वितरित करण्यात आले. शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर वाढावा, विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा मिळाव्यात आणि अध्यापन अधिक परिणामकारक व्हावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी भाऊसाहेब वर्पे, नामदेव कांडलकर, सिताराम पारदत्त, भूषण पवार, जयहिंद लोकचळवळ समन्वयक अशुतोष पाटील, वी.आर. महाजन सर, पत्रकार निलेश महाले, पत्रकार यशकुमार पाटील, चेतन सोनवणे, तुषार देशमुख, इनुस खान यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

उपस्थितांनी आमदार सत्यजित तांबे यांच्या या शैक्षणिक उपक्रमाचे कौतुक करत शिक्षणासाठी सातत्याने होत असलेल्या योगदानाबद्दल आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button