हॅलो सामाजिक
भडगावच्या खालची पेठ येथे वारकरी अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन

भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील
या सप्ताहात दररोज सकाळी ५ ते ६ काकडा आरती, संध्याकाळी ६ वाजता हरिपाठ तर रात्री ९ ते ११ या वेळेत कीर्तन सेवा होणार आहे. या सप्ताहात विविध भागातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली आहे.

तसेच ११ मार्च रोजी पालखी सोहळा तर १२ मार्च रोजी काल्याचे कीर्तन व महाप्रसाद असा कार्यक्रम होणार आहे. या धार्मिक सोहळ्यासाठी परिसरातील वारकरी, भाविक आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
या सप्ताहाचे आयोजन सर्व साधक, वारकरी व ग्रामस्थ मंडळ, खालची पेठ भडगाव यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे.




