Big Breaking : जामनेरात दिलीप खोडपे ऐवजी माजी मंत्री गुलाबराव देवकर रिंगणात…
हॅलो जनता, (मुंबई) प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत शरद पवार कुणाला मैदानात उतरवणार? कोणत्या मतदारसंघात कुणाला उमेदवारी दिली जाणार? चर्चा होत आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाची संभाव्य उमेदवार यादी जाहीर झाली असून जामनेर मधून मंत्री गिरीश महाजन यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर आव्हान देणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून माहिती समोर आली असून याची जोरदार चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.
विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. दोन्ही आघाड्यांचं जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. अशातच कोणत्या मतदारसंघातून कोण निवडणूक लढणार? याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांची संभाव्य यादी हॅलो जनता न्युज च्या हाती लागली आहे. कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोण निवडणूक लढवणार? याची संभाव्य यादी समोर आली आहे. यात बारामतीतून कोण उमेदवार असणार हे स्पष्ट झालेलं नाही. पण इतर जागांवरील उमेदवारांची नावं समोर आली आहेत. 40 हून जास्त जागांवर शरद पवार कुणाला उमेदवारी देणार? याची संभाव्य यादी मात्र समोर आली असून इतर जागांवर अजून चर्चा सुरू आहे. लवकरच हा तिढा देखील सुटणार आहे.
मात्र या यादीत जळगाव जिल्ह्यातील दोन मतदारसंघात उमेदवार जाहीर करण्यात आले असून जामनेर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे नेते माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे नाव फायनल झाल्याचे समोर आले आहे.
नुकत्याच भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात गेलेल्या दिलीप खोडपे यांना जामनेर विधानसभा मतदारसंघातून मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात उमेदवारी मिळेल अशी जोरदार चर्चा सुरू होती. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जामनेर मध्ये येऊन गेले त्यावेळी त्यांनी स्वतः दिलीप खोडपे यांची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र संभाव्य यादीत जामनेर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…
3 हजार कोटींचा विकास कुठे आणि कुणाचा, अमोल शिंदे यांचा विद्यमान आमदारांना सवाल
Chimanrao Patil : पारोळा येथे आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते महायुतीच्या रिपोर्ट कार्ड प्रकाशन