हॅलो शिक्षण

जळगावात विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन मेळावा; JEE, NEET व MHT-CET तयारीबाबत तज्ज्ञांचे मोफत मार्गदर्शन

हॅलो जनता न्यूज, जळगाव : विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी करिअर मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. याच उद्देशाने विद्यापीठ पाठशाळे अंतर्गत फिजिक्स वाला अकादमी तर्फे जळगाव शहरातील भैयासाहेब धंदे सभागृह, ला.ना. स्कूल कॅम्पस येथे करिअर कौन्सलिंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

जळगाव Aagaz – The Beginning of Your Success Story
जळगाव Aagaz – The Beginning of Your Success Story

Aagaz – The Beginning of Your Success Story या उपक्रमांतर्गत जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी JEE, NEET आणि MHT-CET या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसंदर्भात विशेष मार्गदर्शन मेळावा आज दि. १२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात तज्ज्ञांकडून विद्यार्थ्यांना योग्य अभ्यास पद्धती, करिअर निवड, तसेच स्पर्धा परीक्षांसाठी नियोजन कसे करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.

या मेळाव्यात विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांनाही मार्गदर्शन करण्यात येणार असून स्पर्धा परीक्षांच्या तयारीदरम्यान पालकांची भूमिका काय असावी, याबाबतही माहिती दिली जाणार आहे. जळगाव शहरात Physics Wallah Acadamy तर्फे पहिल्यांदाच असा निःशुल्क करिअर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

जळगाव करियर मार्गदर्शन melva
जळगाव करियर मार्गदर्शन मेळावा

या कार्यक्रमाचे उद्घाटन जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते होणार आहे. या निमित्ताने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी योग्य दिशा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तरी जळगाव जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी या करिअर मार्गदर्शन मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या…

युद्ध विराम : युद्धाचा या गोष्टींवर परिणाम, सोने महागले तर…

भडगाव : ऑनलाईन नोंदणीसाठी शेतकऱ्यांची २४ तासांपासून रांग; शेतकऱ्याला आली भोवळ.

पाचोऱ्यात भरडधान्य ऑनलाईन खरेदी गैरव्यवहाराची शक्यता : व्यापारी तुपाशी तर शेतकरी उपाशी…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button