हॅलो जनता न्युजच्या बातमीचा इम्पॅक्ट : मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेवर कारवाई, बजावली कारणे दाखवा नोटीस

हॅलो जनता, जळगाव – जिल्हा परिषदेमार्फत पाणी नमुने गोळा करण्याकरिता उच्च प्रतीचा दर्जा असलेले बाटल्यांचे वितरण केले असूनही भूजल सर्वेक्षण विभागाच्या जिल्हा पाणी गुणवत्ता प्रयोगशाळेत मद्याच्या बाटलीमध्ये दूषित पाण्याचे नमुने प्राप्त असल्याची बातमी हॅलो जनता या वृत्तवाहिनीने प्रकाशित केली होती. या बातमीची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकीत यांनी तात्काळ वरिष्ठ भू वैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जिल्हा परिषदे मार्फत एप्रिल महिन्यातच पाणी नमुने घेण्याकरिता पाणी नमुन्यासाठी योग्य उच्च प्रतिचा दर्जा असलेले बाटल्याचे वितरण करण्यात आलेले होते. यात 1 लिटर ची बाटली रासायनिक तपासणी साठी एकूण 3 हजार 341 तर 250 मि. ली लिटर ची बाटली जैविक तपासणी साठी एकूण 6 हजार 682 बाटली असे भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या जिल्हा प्रयोगशाळेत वितरीत करण्यात आले होते. तसेच मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या आदेशान्वये त्यांना सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना वितरण करणे बाबत सूचना देण्यात आल्या होत्या. तथापि अद्यापही मद्याच्या बाटलीत पाणी नमुने प्राप्त झाल्याने गंभीर दखल जिल्हा परिषद प्रशासनातर्फे घेण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या..
अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर विधानसभेच्या निवडणुकीत एकत्र येणार?, या नेत्याने केले वक्तव्य