ब्रेकिंग : अपक्ष उमेदवार सचिन सोमवंशी जरांगे पाटलांच्या भेटीला..
हॅलो जनता न्यूज, पाचोरा –
विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर पाचोरा भडगाव मतदार संघात राजकीय घडमोडी वेगाने घडू लागल्या आहेत. पाचोरा भडगाव मतदार संघात महायुतीकडून शिंदे सेनेचे किशोर पाटील, महाविकास आघाडी कडून ठाकरे सेनेच्या वैशाली सूर्यवंशी, भाजपचे अपक्ष उमेदवार अमोल शिंदे, राष्ट्रवादीचे अपक्ष उमेदवार दिलीप वाघ आणि काँग्रेसचे अपक्ष सचिन सोमवंशी निवडणुकीच्या रिंगणात आहे.
पाचोरा भडगाव मतदार संघाची जागा ही काँग्रेसला मिळावी म्हणून सचिन सोमवंशी यांनी खूप प्रयत्न केले होते. मात्र महाविकास आघाडी कडून ही जागा ठाकरे सेनेला सुटली असून ठाकरे सेनेकडून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून वैशाली सूर्यवंशी यांना उमेदवारी देण्यात आले आहे. त्यामुळे सचिन सोमवंशी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
उद्या माघार घेण्याची शेवटची तारीख असल्याने मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सचिन सोमवंशी हे जरांगेच्या भेटीला गेलेले आहेत. मराठा समाजाच्या निघालेल्या मोर्चात सचिन सोमवंशी यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. त्यामुळे त्यांना जरांगेंची साथ मिळण्याची शक्यता आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या….
अंजली फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम, गरिबांची दिवाळी केली गोड…
ब्रेकिंग : पाचोरा विधानसभेत पाथरवट समाज महासंघाचा आमदार किशोर पाटील यांना जाहीर पाठिंबा…..
आईसाठी लेकी मैदानात, वैशाली सूर्यवंशी यांच्या दोन्ही मुली निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय…