श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा

हॅलो जनता, न्यूज :
श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सैनिक किशोरभाऊ ढाकणे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून शौय यात्रा कंपनीचे संचालक नामदेव दामू वाघ उपस्थित होते. या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष पन्नालाल वंजारी, सचिव अशोक लाडवंजारी, संचालक वासुदेव सानप, सुरेश लाड, अरुण चाटे, अशोक वाघ, भानुदास नाईक, विजय वाघ, भगवान लाडवंजारी, संतोष चाटे, संचालिका संध्याताई नाईक, छाया वाघ, आम्रपाली हिरोळे, सचिन इखे, मोहित नाईक, गजानन वंजारी, चेतन सैंदाणे, योगेश कोचुरे आणि राम माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दिवाकर जोशी सर, तसेच प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ईश्वरी वंजारी मॅडम उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली, जे प्रमुख अतिथी नामदेवभाऊ दामू वाघ यांच्या हस्ते पार पडले. विद्यालयातील इयत्ता 1 ते 10 वी विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या महत्त्वाबद्दल माहिती दिली आणि देशभक्तीपर नृत्यगीत तसेच गीत सादर केली. भाषणात विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाची माहिती दिली. अश्फाक तडवी, नदीम, रमजान तडवी आणि बेबी जाधव यांचा सहभाग होता. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष किशोरभाऊ ढाकणे यांनी प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो याविषयी माहिती दिली. कार्यक्रमात प्रमुख अतिथींनी विद्यालयास मदत जाहीर केली. किशोरभाऊ ढाकणे आणि नामदेव दामू वाघ (संचालक, शौय यात्रा कंपनी) यांनी 11,000 रुपये मदतीची घोषणा केली. प्रमुख अतिथी सचिन इखे यांनीही विद्यालयासाठी मदत जाहीर केली.
कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक प्रमुख दिनेश पाटील सर यांनी केले, तर सूत्रसंचालन प्राथमिक विद्यालयाच्या शिक्षिका सविता ठोसर मॅडम यांनी केले. यावेळी अशोक लाड वंजारी यांनी बिस्किटांचे वितरण केले, तसेच तुलसी जेली कंपनीतर्फे चॉकलेटचे वितरण करण्यात आले. मुकेश टेन्ट हाऊसने सहकार्य केले, ज्यामुळे कार्यक्रमाची व्यवस्था सुरळीत होऊ शकली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आभार अतुल चाटे सर यांनी मानले.
तायक्वांडोपटू पुष्पक रमेश महाजन “गुणवंत खेळाडू पुरस्कार” ने सन्मानित
ब्रेकिंग : ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती बिघडली, खोकल्याचा त्रास वाढला…
“उच्च शिक्षणात नवीन बदलांची नांदी ठरेल यूजीसी मसुदा – 2025” -अभिजित भांडारकर