पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागितली छत्रपती शिवाजी महाराजांची जाहीर माफी, म्हणाले….
हॅलो जनता, जळगाव – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून पालघर मधील वाढवण बंदराच्या भुमिपुजनाचा सोहळा नुकताच पार पडला. यावेळी गेल्या आठवड्यात सिंधुदुर्गामध्ये जे घडले, माझ्यासाठी आणि माझ्या सहकाऱ्यांनी शिवाजी महाराज फक्त नाव नाही तर आमच्यासाठी शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहे. मी आज नमन करून, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागतो, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीरपणे माफी मागितली.
नेमके काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
भाषणाच्या सुरुवातीलाच नरेंद्र मोदी यांनी शिवरायांची माफी मागितली. “सिंधुदुर्गात जे झाले. ते माझ्यासाठी शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही. ते आमच्यासाठी शिवाजी महाराज हे फक्त राजा महाराज, राजपुरुष नाहीत. आमच्यासाठी शिवाजी महाराज आराध्य दैवत आहे. मी आज डोकं झुकवून माझ्या आराध्यदैवतेला चरणावर मस्तक ठेवून माफी मागतो. आमचे संस्कार वेगळे आहेत”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पुढे ते असे ही म्हणाले, आमचे संस्कार वेगळे आहे. आम्ही ते लोक नाही, भारताचे सुपुत्र वीर सावरकर यांना शिवीगाळ करत असतात. त्यांच्यावर टीका करत असतात. सावरकर यांच्यावर नको त्या शब्दांत टीका करतात, पण माफी मागत नाही. कोर्टात जातात. तरी त्यांना पश्चाताप होत नाही’ मी इथे आल्यावर शिवाजी महाराजांच्या चरणावर डोकं टेकवून माफी मागत आहे. जे लोक शिवाजी महाराजांना अराध्य दैवत मानतात त्यांच्या काळजाला ठेच लागली आहे. अशा आराध्य दैवतेचे पूजा करणाऱ्यांची मी माफी मागतो. आमच्यासाठी अराध्य दैवतेपेक्षा काहीच मोठं नाही”, अशी भावना मोदींनी व्यक्त केली.
इतर महत्त्वाच्या बातम्या..
धक्कादायक : सावद्यात अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांनी केला अत्याचार..
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा पाचोऱ्यात बेमुदत संप, आमदार किशोर पाटील यांनी घेतली कर्मचाऱ्यांची भेट
जामनेर मध्ये पुन्हा एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधमाला अटक करत गुन्हा दखल….