संतप्त जमावाची जामनेर पोलीस स्थानकावर दगडफेक, दगडफेकीत पोलीस कर्मचारी गंभीर जखमी

हॅलो जनता, जामनेर – सहा वर्षाची चिमुकली घरात एकटी असल्याचे पाहून तसेच तुला खाऊ घेऊन देतो, असे आमिष दाखवत गावा शेजारीच असलेल्या शेतात नेत तिचा निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना जामनेर तालुक्यातील केकतनिंभोरा शिवारातील चिचखेडे बुद्रुक गावाजवळ दि. ११ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली होती. घटना घडल्यापासून संशयित आरोपी सुभाष उमाजी भील (वय ३५) हा फरार होता. आरोपी सापडत नसल्यामुळे पोलीस अधीक्षकांनी एलसीबीकडे तपास वर्ग केल्यानंतर अवघ्या अर्ध्यातासात संशयिताला भुसावळमधून ताब्यात घेण्यात आले आहे.
या आरोपीला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळतात जामनेर पोलीस स्थानकासमोर 300 ते 400 नागरिकांचा जमाव जमला होता. या संतप्त जमावाने पोलिसांकडे त्या आरोपीला जमावाच्या स्वाधीन करण्याची मागणी केली होती मात्र मागणी मान्य न झाल्यामुळे या नागरिकांनी पोलीस स्थानकासमोरील रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करत जाळपोळ सुरू केली. मात्र पोलिसांनी जमावाला शांतता ठेवण्याचे आवाहन केल्यानंतर संतप्त जमावाने जामनेर पोलीस स्थानकावर दगडफेक करायला सुरुवात केली. त्या दगडफेकी मध्ये काही पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची देखील माहिती समोर आली आहे.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त हा जामनेर शहरात तैनात करण्यात आला असून जामनेर शहरात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या..
स्तुत्य उपक्रम: विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी २ हजार झाडांच्या बियांचे वाटप
सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ, चांदीची ७०० ने तर, सोन्यात ४०० रुपयांनी भाववाढ