क्रिकेट विश्वावर शोककळा, टीम इंडियाच्या माजी क्रिकेपटूने चौथ्या मजल्यावरून उडी मारून केली आत्महत्या…
हॅलो क्रीडा, प्रतिनिधी – एकीकडे T-20 वर्ल्ड कप सुरू असून मोठा थरार पाहायला मिळत आहे. संपूर्ण क्रिकेट प्रेमींचे नेमका T – 20 विश्वचषक कोण जिंकणार याकडे लक्ष आहे तर दुसरीकडे क्रिकेट वर्तुळातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. टीम इंडियाच्या एका माजी खेळाडूने आपल्या राहत्या घराच्या बाल्कनीमधून त्यांनी उडी मारत आपली जीवनयात्रा संपवली आहे. या खेळाडूच्या मृत्यूनंतर दिग्गज खेळाडू अनिल कुंबळे आणि बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी शोक व्यक्त केला आहे.
डेव्हिड जॉन्सन असं या माजी खेळाडूचं नाव असून चौथ्या मजल्यावरून उडी मारून त्यांनी आत्महत्या केली. डेव्हिड जॉन्सन यांना तीन दिवसांपूर्वीच दवाखान्यामधून डिस्चार्ज देण्यात आला होता. जॉन्सन हे अती तणावात असल्याची माहिती समोर आली आहे. जॉन्सन हे वेगवान गोलंदाज होते, टीम इंडिया आणि कर्नाटक संघासाठी त्यांनी देशांतर्गत क्रिकेट खेळलं आहे.
अशी होती डेव्हिड जॉन्सन यांची क्रिकेट ची कारकीर्द….
डेव्हिड जॉन्सन यांनी टीम इंडियाकडून 1996 साली पदार्पण केलं होतं. टीम इंडियाकडून त्यांनी दोन सामने खेळले होते, यामध्ये त्यांनी एकूण तीन विकेट घेतल्या. टीम इंडियाकडून त्यांना फारशी संधी मिळाली नाही. मात्र कर्नाटक संघाकडून त्यांनी दीर्घकाळ रणजी क्रिकेट खेळले आहे. 39 प्रथम श्रेणी आणि 33 लिस्ट ए सामने खेळले आहेत. 1992 मध्ये त्यांनी देशांतर्गत क्रिकेट खेळायला सुरूवात केली होती. दहा वर्षे त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळलीत. 2002 पर्यंत देशांतर्गत क्रिकेटमध्ये ते सक्रीय होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या –
जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. सदानंद भिसे यांची नियुक्ती
संतप्त जमावाची जामनेर पोलीस स्थानकावर दगडफेक, दगडफेकीत पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
स्तुत्य उपक्रम: विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी २ हजार झाडांच्या बियांचे वाटप