शिष्यवृत्ती परीक्षेत आदर्श कन्या विद्यालयाचे घवघवीत यश

हॅलो जनता प्रतिनिधी : (यशकुमार पाटील)
भडगाव : येथील महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श कन्या विद्यालयाच्या इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवी फेब्रुवारी 2025 च्या शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेत कु. खुशी दिनेश पाटील, कु. जानवी राजेंद्र सोनवणे आणि कु. धनश्री अरुण शिरसाठ यांनी यश मिळवून शाळेची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे.

या यशस्वी विद्यार्थिनींचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे भडगाव तालुकाध्यक्ष निलेश महाले, पत्रकार अशुतोषकुमार पाटील, पत्रकार भरत चव्हाण यांच्या हस्ते विद्यार्थिनींना प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले.
https://youtu.be/CTo7QcnHnQ0?si=YgbsVwxzCiXUDRGT
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सुरेश रोकडे, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वी विद्यार्थिनींचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र सोनवणे यांनी केले.
विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल पालक, शिक्षक आणि शिक्षणप्रेमी नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.




