अखिल भारतीय साहित्य संमेलनात कवी राम जाधव यांच्या कवितेची निवड..

हॅल्लो जनता (यशकुमार पाटील)
भडगाव : पिंपरखेड येथील माध्यमिक आदिवासी आश्रमशाळेतील माध्यमिक शिक्षक कवी राम सखाराम जाधव यांची सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आम्ही लोक आदिवासी या कवितेची कविकट्टा या व्यासपीठवर निवड झाली असून दि. ३ जानेवारी २०२६ ला सत्र क्र.११ मध्ये दुपारी १२ ते ०१ या वेळेत कविताचे सादरीकरण होणार आहे.
कवी राम जाधव सर हे आदिवासी बोलीभाषा व बंजारा बोलीभाषेचे अभ्यासक आहेत.आदिवासी बालकांमध्ये राहून त्यांनी पारंपरिक, मौखिक, लोकगीते जमवून त्यांनी त्या गीतांचा मराठी या प्रमाण बोलीभाषेत काव्यात्मक अनुवाद केला आहे.
आदिवासी बोलीभाषेतील गीतांच्या माध्यमातून त्यांनी आदिवासी विद्यार्थींना चार ते पाच वेळा आकाशवाणी जळगांव केंद्रावरून गायन व प्रसारण करण्यासाठी सुसंधी उपलब्ध करून दिलेली आहेत.
कवी राम जाधव सर यांच्या कवितांचे आकाशवाणी जळगांव केंद्रावरून अनेक वेळा गायन प्रकट वाचन व प्रसारण झालेले आहेत. आई मला जन्म घेऊ दे ही बालनाटिका जाधव सरांनी बालकांसाठी लिहून विद्यार्थी यांना आकाशवाणी जळगांव केंद्रावरून प्रसारण करण्यासाठी सुसंधी उपलब्ध करून दिलेली आहे. त्या सोबतच कवी राम जाधव सरांचे तुमच्या कवितेचे प्रेरणास्रोत आणि आजतागायत झालेली वाटचाल ही प्रकट मुलाखात देखील आकाशवाणी जळगांव केंद्रावरून प्रसाररीत झालेली आहे.
राम जाधव यांच्या कविता विविध साहित्य संमेलन किशोर, शिक्षण संक्रमण या शैक्षणिक मासिक तसेच विविध दिवाळी अंक व वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या आहेत. राम जाधव सरांचे आदिवासी बोलीभाषा व काव्यात्मक अनुवाद हा पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर असून ते विविध पुरस्काराने सम्मानित झाले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेच्या सचिव सनेर मॅडम, माध्यमिक मुख्याध्यापक ए.ए.पाटील सर, प्राथमिक मुख्याध्यापक के.आर. पाटिल सर शाळेतील सर्वच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कवी राम जाधव सरांचे विशेष अभिनंदन केले आहे.



