# Hello Janata ## Posts - [साप्ताहिक हॅलो जनता दि. १४ एप्रिल २०२६](https://hellojanata.com/%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%b9%e0%a5%85%e0%a4%b2%e0%a5%8b-%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%a6%e0%a4%bf-%e0%a5%a7%e0%a5%aa/): साप्ताहिक हॅलो जनता दि. १४ एप्रिल २०२६ ____👇   PDF_1776149116587 - [चोपडा ब्रेकिंग : गो तस्करांना मदत करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा अन्यथा, रोहित निकमांचा इशारा..](https://hellojanata.com/%e0%a4%9a%e0%a5%8b%e0%a4%aa%e0%a4%a1%e0%a4%be-%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97-%e0%a4%97%e0%a5%8b-%e0%a4%a4%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%be/): हॅलो जनता न्यूज, चोपडा – तालुक्यात गावठी गायींचे बळजबरीने उद्ध्वस्तीकरण, गोरक्षकांवर हल्ले व धमक्यांच्या घटनांमुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पणन महासंघाचे उपाध्यक्ष व भाजप महाराष्ट्र राज्य सहकार आघाडीचे सह-संयोजक रोहित निकम यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी व चोपडा शहर पोलिस स्टेशनला प्रत्यक्ष भेट देऊन निवेदन सादर केले. यावेळी गोरक्षकांना त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही. हा संपूर्ण गंभीर प्रकार मुख्यमंत्री महोदयांच्या समक्ष मांडणार असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले… चोपडा ब्रेकिंग: यांची होती उपस्थिती… यावेळी भाजप गटनेते गजेंद्र जैस्वाल, शरद पाटील, अनिल वानखेडे, सागर नेवे, जिग्नेश कंखरे, संग्राम परदेशी, श्याम सोनार, मनीष गुजराथी, हरीश माळी, प्रेम घोगरे, विशाल भावसार, मनोहर बडगुजर, अशोक … - [जळगावात विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन मेळावा; JEE, NEET व MHT-CET तयारीबाबत तज्ज्ञांचे मोफत मार्गदर्शन](https://hellojanata.com/%e0%a4%9c%e0%a4%b3%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a4%be/): हॅलो जनता न्यूज, जळगाव : विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी करिअर मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. याच उद्देशाने विद्यापीठ पाठशाळे अंतर्गत फिजिक्स वाला अकादमी तर्फे जळगाव शहरातील भैयासाहेब धंदे सभागृह, ला.ना. स्कूल कॅम्पस येथे करिअर कौन्सलिंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. Aagaz – The Beginning of Your Success Story या उपक्रमांतर्गत जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी JEE, NEET आणि MHT-CET या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसंदर्भात विशेष मार्गदर्शन मेळावा आज दि. १२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात तज्ज्ञांकडून विद्यार्थ्यांना योग्य अभ्यास पद्धती, करिअर निवड, तसेच स्पर्धा परीक्षांसाठी नियोजन कसे करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. या … - [युद्ध विराम : युद्धाचा या गोष्टींवर परिणाम, सोने महागले तर...](https://hellojanata.com/%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae-%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%97/): हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी – जागतिक स्तरावर युद्धविरामाच्या घोषणेनंतर गुंतवणूकदारांचा विश्वास वाढल्याने आणि कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाल्यामुळे बुधवारी भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. या सकारात्मक वातावरणाचा परिणाम म्हणून मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक जवळपास चार टक्क्यांनी वाढत बंद झाले. युद्ध विराम: सेन्सेक्स-निफ्टीत मोठी उसळी सलग पाचव्या दिवशी तेजी कायम ठेवत BSE Sensex २,९४६.३२ अंकांनी म्हणजेच ३.९५ टक्क्यांनी वाढून ७७,५६२.९० अंकांवर बंद झाला. तर Nifty 50 ८७३.७० अंकांनी म्हणजेच ३.७८ टक्क्यांनी वाढत २३,९९७.३५ अंकांवर स्थिरावला. जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत, परदेशी गुंतवणूकदारांची खरेदी आणि तेलाच्या किमतींमध्ये झालेली घसरण यामुळे बाजारात खरेदीचा जोर वाढल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. … - [भडगाव : ऑनलाईन नोंदणीसाठी शेतकऱ्यांची २४ तासांपासून रांग; शेतकऱ्याला आली भोवळ.](https://hellojanata.com/%e0%a4%ad%e0%a4%a1%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%91%e0%a4%a8%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%a8-%e0%a4%a8%e0%a5%8b%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%a3%e0%a5%80%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80/): भडगाव प्रतिनिधी यशकुमार पाटील  हॅलो जनता न्यूज, : एकीकडे देश डिजिटल युगात झपाट्याने प्रगती करत असताना, दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात शेतकऱ्यांना आपले धान्य विकण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र समोर आले आहे. भडगाव शेतकी संघाच्या भोंगळ नियोजनामुळे ज्वारी खरेदीसाठी टोकन मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना तब्बल २४ तासांहून अधिक काळ रांगेत उभे राहावे लागले. भडगाव तालुक्यातील विविध गावांमधून शेतकरी ज्वारी विक्रीसाठी शेतकी संघाच्या कार्यालयात आले होते. मात्र टोकन वितरणाची प्रक्रिया व्यवस्थित न झाल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली. ऑनलाइन नोंदणी करून ज्वारी विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहून टोकन घ्यावे लागत असल्याने सकाळपासूनच लांबच लांब रांगा लागल्या. भर उन्हात उभे राहून तासन्तास … - [एचपीव्ही लसीकरणात जळगाव जिल्हा राज्यात प्रथम.](https://hellojanata.com/%e0%a4%8f%e0%a4%9a%e0%a4%aa%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%80-%e0%a4%b2%e0%a4%b8%e0%a5%80%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%9c%e0%a4%b3%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5/): जळगाव प्रतिनिधी  जळगाव : गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरला आळा घालण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या एचपीव्ही लसीकरण मोहिमेत जळगाव जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या प्रभावी नियोजनासह जनजागृतीमुळे मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार २९३ मुलींना एचपीव्ही लस देण्यात आली असून, राज्यात जळगाव आघाडीवर आहे. ठाणे जिल्हा (१ हजार ९९९) दुसऱ्या, तर नागपूर जिल्हा (१ हजार २३४) तिसऱ्या क्रमांकावर आहे. गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचे वाढते प्रमाण लक्षात घेता केंद्र व राज्य शासनाने ही मोहीम सुरू केली आहे. मात्र, लसीबाबत नागरिकांमध्ये असलेल्या संभ्रमामुळे अनेक ठिकाणी प्रतिसाद कमी मिळत आहे. यावर उपाय म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी … - [पाचोऱ्यात भरडधान्य ऑनलाईन खरेदी गैरव्यवहाराची शक्यता : व्यापारी तुपाशी तर शेतकरी उपाशी...](https://hellojanata.com/%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8b%e0%a4%b1%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%ad%e0%a4%b0%e0%a4%a1%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%91%e0%a4%a8%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%88/): हॅलो जनता न्यूज, पाचोरा : आजपासून भरड धान्य खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला सुरवात झाली असून या शासकीय ज्वारी व मका खरेदी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. प्रत्यक्ष नोंदणी सुरू असली तरी व्यापाऱ्यांना नोंदणीसाठी प्राधान्य देण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. यामुळे खऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होण्याची भीती निर्माण झाली आहे. याबाबत स्थानिक शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे गंभीर तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनेक शेतकरी ज्वारी व मका विक्रीसाठी नोंदणी करत असताना काही जण प्रत्यक्षात पीक न घेता फक्त 7/12 उताऱ्यावर पीक दाखवून शासनाची दिशाभूल करत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे शासकीय खरेदी प्रक्रियेची पारदर्शकता … - ["या" ताखेपासून भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीला होणार सुरुवात, राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांची माहिती..](https://hellojanata.com/%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%96%e0%a5%87%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%ad%e0%a4%b0%e0%a4%a1%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%96%e0%a4%b0/): हॅलो जनता न्यूज, जळगाव : किमान आधारभूत किंमत (MSP) खरेदी योजनेअंतर्गत रब्बी पणन हंगाम २०२५–२६ साठी जिल्ह्यात भरडधान्य खरेदी प्रक्रियेला गती देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला हमीभाव मिळावा आणि खरेदी प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडावी, यासाठी प्रशासनाकडून ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया उद्यापासून सुरू करण्यात आल्याची माहिती राज्य पणन महासंघाचे राज्य उपाध्यक्ष रोहित निकम यांनी दिली आहे. जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील १८ उपअभिकर्ता संस्थांना भरडधान्य खरेदीसाठी मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात खरेदी प्रक्रिया अधिक संगठित आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात येणार आहे. शेतकरी नोंदणीसाठी ०१ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ हा कालावधी निश्चित करण्यात आला असून, या कालावधीत … - [ऐनपूर महाविद्यालयात १२० तासांची कौशल्य विकास कार्यशाळा; विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद](https://hellojanata.com/%e0%a4%90%e0%a4%a8%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a5%a7%e0%a5%a8%e0%a5%a6/): ऐनपूर : कौशल्य विकास आणि श्रमसंस्काराच्या माध्यमातून जबाबदार नागरिक घडविण्याच्या उद्देशाने जे.पी. टेक फाऊंडेशन, जळगाव, महिला व बालकल्याण विभाग आणि पंचायत समिती, रावेर यांच्या संयुक्त विद्यमाने येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयातील समान संधी केंद्रात १२० तासांची कौशल्य विकास कार्यशाळा सुरू आहे. कार्यशाळेचे दहा दिवस पूर्ण झाल्यानिमित्त प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींनी आत्मसात केलेल्या कौशल्यांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. या प्रसंगी जे.पी. टेक फाऊंडेशनचे अध्यक्ष जयंत पाटील, ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन श्रीराम पाटील, उपाध्यक्ष रामदास महाजन, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने तसेच पंचायत समिती रावेरचे गटविकास अधिकारी विनोद मेढे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात लोहपुरुष सरदार वल्लभभाई … - [जागतिक महिला दिनी भडगाव येथे HPV लसीकरणाचा शुभारंभ.](https://hellojanata.com/%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a4%a1%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%af/): भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील भडगाव : महिलांमध्ये वाढत्या प्रमाणात आढळणाऱ्या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने HPV लसीकरण मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्च रोजी ग्रामीण रुग्णालय, भडगाव येथे या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात प्रथम लाभार्थी म्हणून कु. दिक्षा तांबटकर हिला HPV लस देण्यात आली. पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांची कार्यक्रमास विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भडगाव नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा रेखाताई मालचे या होत्या. यावेळी नगरसेवक सचिन चोरडिया, इमरान सय्यद, राहुल ठाकरे, अतुलसिंह परदेशी, नगरसेविका वैशालीताई विशाल पाटील, रंजनाबाई अनिल वाघ तसेच सामाजिक कार्यकर्ते जहांगीर मालचे उपस्थित … - [दोन मुलांना वाचवताना युवक व महिलेचा बुडून मृत्यू; भडगाव शहरात शोककळा.](https://hellojanata.com/%e0%a4%a6%e0%a5%8b%e0%a4%a8-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%b5%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%b5/): भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील  भडगाव : शहरातील गिरणा नदी पात्रात दोन लहान मुलांना वाचवताना एका युवकासह महिलेचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी (दि. ८) दुपारी १२ वाजेच्या सुमारास आझाद चौक ते पेठ भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाजवळ घडली. या दुर्दैवी घटनेमुळे भडगाव शहरात हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गिरणा नदी पात्रातील डोहाजवळ दोन लहान मुले पाण्याच्या कडेला खेळत असताना अचानक त्यांचा पाय घसरून ती पाण्यात पडली. त्यावेळी जवळच भांडी धुण्यासाठी आलेल्या काफिया शरीफ पिंजारी (वय १६) यांनी हे दृश्य पाहताच मुलांना वाचवण्यासाठी तत्काळ पाण्यात उडी घेतली. मात्र पाण्याची खोली जास्त असल्याने त्या स्वतःच बुडू … - [भडगावच्या खालची पेठ येथे वारकरी अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन](https://hellojanata.com/%e0%a4%ad%e0%a4%a1%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%96%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a5%87%e0%a4%a0-%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%a5%e0%a5%87/): भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील भडगाव : शहरातील खालची पेठ येथे वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार संत तुकाराम महाराज बीज च्या पर्वकाळात वारकरी अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहाची सुरुवात फाल्गुन पौर्णिमा ५ मार्च २०२६, गुरुवार रोजी होणार असून समारोप १२ मार्च २०२६, गुरुवार रोजी होणार आहे. यंदा या कीर्तन सप्ताहाचे १० वे वर्ष असल्याने भक्तांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळत आहे. या सप्ताहात दररोज सकाळी ५ ते ६ काकडा आरती, संध्याकाळी ६ वाजता हरिपाठ तर रात्री ९ ते ११ या वेळेत कीर्तन सेवा होणार आहे. या सप्ताहात विविध भागातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली … - [भडगाव तहसीलसमोर ग्रामस्थांचे लाक्षणिक उपोषण; १५ व्या वित्त आयोगातील कामांची चौकशीची मागणी](https://hellojanata.com/%e0%a4%ad%e0%a4%a1%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%a4%e0%a4%b9%e0%a4%b8%e0%a5%80%e0%a4%b2%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b0-%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5/): भडगाव : तालुक्यातील वडगाव नालबंदी येथील ग्रामस्थांनी विविध संघटनांच्या पाठिंब्याने भडगाव तहसील कार्यालयाच्या आवारात एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करत २०२१ ते २०२५ या कालावधीत ग्रामपंचायत मार्फत १५ व्या वित्त आयोगातून झालेल्या कामांची सखोल चौकशी करण्याची ठाम मागणी केली आहे. ग्रामस्थांच्या मते, संबंधित कालावधीत ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात आलेल्या विविध कामांमध्ये अनियमितता झाल्याचा संशय आहे. बेकायदेशीर शिपाई भरती, हौद दुरुस्ती, भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकाम, भूमिगत गटारी बांधणी, शाळा दुरुस्ती व शौचालय कामे, अंगणवाडी डिजिटल करणे व साहित्य खरेदी, घनकचरा दूत नियुक्ती तसेच आय.डी.बी.आय. बँकेच्या खात्यातील एस.आर. फंडातून खरेदी केलेल्या साहित्याची चौकशी करावी, अशी प्रमुख मागणी उपोषणकर्त्यांनी केली. विविध संघटनांचा जाहीर पाठिंबा या आंदोलनाला … - [महिला सुरक्षा, बंधुता आणि सौहार्दाचा संदेश देणारी होळी ; गुढे गावाचा आदर्श उपक्रम](https://hellojanata.com/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be-%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a5%81%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf/): भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील  गुढे/भडगाव : होळी सण म्हणजे वाईट प्रवृत्तींचा नाश आणि चांगल्या संस्कारांचा विजय, असा संदेश देत गुढे गावातील गिरणाई गणेश मित्र मंडळ तर्फे यावर्षी “वाईट विचारांचे दहन होळी” हा सामाजिक उपक्रम उत्साहात व जागरूकतेच्या वातावरणात पार पडला. पारंपरिक होळी दहनाला सामाजिक आशयाची जोड देत मंडळाने समाजातील अपप्रवृत्ती आणि घातक कृत्यांविरोधात ठाम भूमिका मांडली. कार्यक्रमाच्या प्रारंभी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विधिवत पूजन करून उपस्थित ग्रामस्थांना उपक्रमामागील उद्देश स्पष्ट केले. समाजात वाढत चाललेल्या गो तस्करी, बलात्कार, लव्ह जिहाद आणि दहशतवाद यांसारख्या विकृत व धोकादायक प्रवृत्तींचा निषेध व्यक्त करत या विचारांचे प्रतीकात्मक दहन करण्यात आले. यावेळी मंडळातील सदस्यांनी शांतता, बंधुता, महिला … - [आधारच्या नव्या ‘उदय’ लोगोचे निर्माते अरुण गोकुल यांची विशेष भेट](https://hellojanata.com/%e0%a4%86%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%89%e0%a4%a6%e0%a4%af-%e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%97/): भडगाव : आधार कार्डच्या नव्या ‘उदय’ लोगोचे निर्माते अरुण गोकुल यांची भडगाव फर्स्ट समन्वयक अशुत्तोषकुमार पाटील व कमलेश सोनवणे यांनी विशेष भेट घेतली. या भेटीदरम्यान सामाजिक उपक्रम, युवा सक्षमीकरण तसेच डिजिटल ओळख व्यवस्थेतील बदलांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमावेळी Unique Identification Authority of India अंतर्गत कार्यरत त्रिस्सुर जिल्हा युवा अधिकारी बेन्सी मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. युवा नेतृत्व, नवकल्पना आणि राष्ट्रीय ओळख प्रणालीच्या बळकटीकरणाबाबत सकारात्मक संवाद साधण्यात आला. ‘उदय’ हा लोगो नवभारताच्या प्रगतीचे प्रतीक मानला जात असून डिजिटल भारताच्या वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा म्हणून त्याकडे पाहिले जाते. या भेटीमुळे युवा कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त होत असून सामाजिक व राष्ट्रीय स्तरावर … - [ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांची पाचोरा येथील "मे मुरलीधर अभिमान सराफ अँड सन्स पिंपळगावकर" सुवर्णपेढीला भेट](https://hellojanata.com/%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%be-20/): हॅलो जनता न्यूज, पाचोरा – येथे आयोजित शारदीय व्याख्यानमाला कार्यक्रमानिमित्त ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. आपल्या प्रभावी वक्तृत्व, स्पष्ट भूमिका आणि तंत्रज्ञान विषयातील सखोल ज्ञानासाठी ओळखले जाणारे डॉ. निरगुडकर हे पूर्वी Zee 24 Taas या वृत्तवाहिनीचे संपादक होते. सध्या ते भारत सरकारच्या एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे स्वतंत्र संचालक म्हणून कार्यरत आहेत. पाचोरा दौऱ्यादरम्यान डॉ. निरगुडकर यांनी “मे मुरलीधर अभिमान सराफ अँड सन्स पिंपळगावकर” या सुवर्णपेढीला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी सुवर्णपेढीतील विविध दागिन्यांची पाहणी करून त्यांच्या डिझाइन्स, गुणवत्ता आणि व्यवस्थापनाबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. पाचोरा सारख्या शहरात इतके भव्य आणि आधुनिक दालन पाहून त्यांनी आश्चर्य … - [🚨 ब्रेकिंग: शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर सकारात्मक चर्चा - बन्सीलाल पाटील](https://hellojanata.com/%f0%9f%9a%a8-%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%80/): हॅलो जनता न्यूज, पाचोरा – केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे पाचोरा तालुक्याच्या दौऱ्यावर असताना तालुक्यातील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष, पाचोरा पंचायत समितीचे माजी सभापती बन्सीलाल पाटील यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांची विविध प्रश्न मांडत त्यावर तात्काळ तोडगा काढण्याची मागणी केली. यात वेरूळी, पहाण आणि खेडगाव (न.व.) परिसरातील शेतकरी बांधवांनी शेती पंपासाठी अपुऱ्या व अनियमित विजेच्या पुरवठ्याबाबत गंभीर समस्या मांडल्या. वारंवार खंडित होणारी वीज, कमी दाबाचा पुरवठा आणि ठराविक वेळेत वीज न मिळाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या समस्येमुळे आर्थिक ताण वाढत असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. तसेच वडगाव टेक रेल्वे मोरीजवळील क्रॉसिंग संदर्भातही नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त … - [🚨 ब्रेकिंग: देशाचे नाक कापणाऱ्या काँग्रेसचा जाहीर निषेध, देशाची माफी मागावी - जितेंद्र जैन..](https://hellojanata.com/%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%81%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b8-3/): हॅलो जनता न्यूज, पाचोरा — देशात तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) विषयक भारताची भूमिका जगासमोर मांडण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या India AI Impact Summit दरम्यान राजधानीतील भारत मंडपम येथे गोंधळाची घटना घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर Indian Youth Congress च्या काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून कार्यक्रमात व्यत्यय आणल्याचा दावा करण्यात येत असून, या प्रकारावर शिवसेना आणि युवासेनेने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. युवासेना जिल्हाप्रमुख जितेंद्र जैन यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले की, “भारत जागतिक पातळीवर तंत्रवैभव सादर करत असताना अशा प्रकारचा गोंधळ घालणे हे देशहिताला बाधा आणणारे आहे. विरोध असणे हा लोकशाही हक्क आहे; मात्र तो सैद्धांतिक आणि शांततामय पद्धतीने … - [🚨 ब्रेकिंग: गाळण गावात झालेल्या विकास कामात कोणताही भ्रष्ट्राचार नाही, प्रत्यक्ष कामे दाखविण्यास तयार - सरपंच राजेंद्र सावंत...](https://hellojanata.com/%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%a3/): हॅलो जनता न्यूज, पाचोरा – तालुक्यातील गाळण गावात १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून झालेल्या विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या संदर्भात गावातील सुज्ञ नागरिकांनी जळगाव जिल्हा परिषद यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून सखोल व निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, गावात १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून विविध विकासकामे पूर्ण झाल्याचे दाखविण्यात आले आहे. मात्र, ‘मेरी ग्रामपंचायत’ अ‍ॅपवरील माहितीची पडताळणी केली असता अनेक कामांची लोकेशन गावात दर्शवली जात नसल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले आहे. काही कामे प्रत्यक्षात गावात झालेलीच नसून ती कुठेही दिसून येत नसल्याचा गंभीर आरोपही करण्यात … - [🚨 ब्रेकिंग: गाळण ग्रामपंचायतीत लाखोंचा भ्रष्ट्राचार, गावकऱ्यांची तक्रार... अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा](https://hellojanata.com/%f0%9f%9a%a8-%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%a3/): हॅलो जनता न्यूज, पाचोरा – तालुक्यातील गाळण गावात १५ व्या वित्त आयोगांतर्गत झालेल्या विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. या संदर्भात गाळण येथील सुज्ञ नागरिकांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून सखोल व निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, गावात १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून विविध विकासकामे झाल्याचे दाखविण्यात आले आहे. मात्र, ‘मेरी ग्रामपंचायत’ अ‍ॅपवरील माहिती तपासली असता अनेक कामांची लोकेशन गावात दर्शवली जात नसल्याचे समोर आले आहे. काही कामे प्रत्यक्षात गावात झालेलीच नसून ती कुठेही निदर्शनास येत नसल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. भडगाव शिवजयंती मिरवणूक … - [जेईई मेन्समध्ये यश संजय सोनार यांचे घवघवीत यश](https://hellojanata.com/%e0%a4%9c%e0%a5%87%e0%a4%88%e0%a4%88-%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%af%e0%a4%b6-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%af-%e0%a4%b8/): भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील  भडगाव : इंजिनीअरिंग प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी जेईई मेन्स सत्र–१ परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला असून भडगाव येथील लाडकूबाई माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी चि. यश संजय सोनार याने ९४.८९ पर्सेंटाईल मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. यश हा पिंपरखेड येथील आरोग्य निरीक्षक तसेच जुनी पेन्शन संघटनेच्या आरोग्य विभागाचे राज्यप्रमुख संजय सोनार कळवाडीकर यांचा सुपुत्र आहे. इयत्ता दहावीमध्ये ९०.२० टक्के गुण मिळवल्यानंतर यशने पुढील शिक्षणासाठी नाशिक येथील सुप्रसिद्ध नारायण क्लासेस येथे प्रवेश घेतला होता. आपल्या यशाबद्दल बोलताना यशने सांगितले की, नियमित अभ्यास, वेळेचे योग्य नियोजन आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे हे यश मिळवणे शक्य झाले. “सततचा सराव … - [भडगावात ‘श्री चक्रधर चषक’ खुल्या प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन](https://hellojanata.com/%e0%a4%ad%e0%a4%a1%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%9a%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a7%e0%a4%b0-%e0%a4%9a%e0%a4%b7%e0%a4%95/): भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील  भडगाव : शहरातील खालची पेठ येथे श्री चक्रधर स्वामी मित्र मंडळ यांच्या वतीने शिवजयंतीच्या पर्वकाळानिमित्त ‘श्री चक्रधर चषक’ खुल्या प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेच्या निमित्ताने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून क्रिकेटप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली असून प्रथम बक्षीस रु. २१,०००, द्वितीय बक्षीस रु. १५,००० तर तृतीय बक्षीस रु. ११,००० असे जाहीर करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन मंगळवार, दि. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता झाले. आयोजकांनी स्पर्धेचे नियम व अटी जाहीर करत सर्व सामने शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने खेळविण्यात येणार … - [महिंदळे येथील काळीची वस्ती शाळेचे चारही विद्यार्थी घेता आहेत गोठ्याचे शिक्षण.](https://hellojanata.com/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%b3%e0%a5%87-%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%a5%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%8d/): भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील  भडगाव : तालुक्यातील महिंदळे गावातील काळीची वस्ती येथील जिल्हा परिषद आदिवासी वस्तीची शाळा ठरते चार विद्यार्थ्यांसाठी गोठ्याचे शिक्षण देणारी आदर्श शाळा ही शाळा आदिवासी विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्य घडवण्यासाठी हिचे काही वर्षांपूर्वी जिल्हा परिषद यांच्याकडून शासनाचा लाखो रुपयांचा निधी विविध योजना आदिवासी विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोचवण्यासाठी एक छोटासा प्रयत्न शासनाच्या माध्यमातून करण्यात आला होता. परंतु सध्या या शाळेची अवस्था दयनीय दुर्लक्षित झालेली आहे. भडगाव पंचायत समिती गटशिक्षण अधिकारी रावसाहेब पाटील, शालेय पोषण आहार अधीक्षक गणेश भास्कर पाटील, या गटाचे केंद्रप्रमुख अशोक खेडकर, यांच्या आशीर्वादाने या आदिवासी विद्यार्थ्यांना गोठ्याचे शिक्षण घेण्यास भाग पडत असल्याचा आरोप आदिवासी युवा सेना … - [आंतरराज्य युवा विनिमय कार्यक्रम २०२६ साठी भडगांवच्या अशुतोषकुमार पाटील यांची निवड...](https://hellojanata.com/%e0%a4%86%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%af-%e0%a4%95%e0%a4%be/): भडगाव : केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाच्या मेरा भारत युवा केंद्र या राष्ट्रीय स्तरावरील प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या आंतरराज्य युवा विनिमय कार्यक्रम २०२६ साठी जळगाव जिल्ह्यातून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे अशुतोषकुमार पाटील यांची निवड करण्यात आली आहे. केरळ दौऱ्यासाठी जळगावातील ९ युवकांची निवड, मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव विशेष बाब म्हणजे त्यांच्या सोबत जळगाव जिल्ह्यातील आणखी आठ युवकांची देखील निवड झाली असून, एकूण ९ युवकांचा गट या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. निवड झालेला हा युवकांचा समूह २२ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ या कालावधीत केरळ राज्याच्या दौऱ्यावर जाणार असून, हा दौरा कमलेश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या … - [रोकडा फार्म शाळेत विद्यार्थ्यांचा कलाविष्कार; कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद](https://hellojanata.com/%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%a1%e0%a4%be-%e0%a4%ab%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%87%e0%a4%a4-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/): भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील भडगाव : रोकडा फार्म येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देणारा कलाविष्कार कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित छावा गीते, देशभक्तीपर नृत्य, लावणी, रिमिक्स नृत्य, अहिराणी गीते तसेच समाजप्रबोधनपर नाटिका यांसारख्या विविध सादरीकरणांनी उपस्थितांची दाद मिळवली. कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील, शापोआ अधिक्षक गणेश पाटील, केंद्रप्रमुख अशोक खेडकर यांच्यासह गावचे सरपंच, उपसरपंच दिनेश परदेशी, युवराज सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षणप्रेमी व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी योगेश शिंपी यांनी गावात प्रथमच आयोजित सांस्कृतिक उपक्रमाचे कौतुक करत शाळेला डिजिटल करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले. आमदार किशोर आप्पा पाटील यांचे सुपुत्र व शिवसेना … - [देशमुख महाविद्यालयात वक्तृत्वाचा जल्लोष](https://hellojanata.com/%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%96-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%b5%e0%a4%95%e0%a5%8d/): भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील भडगाव : येथील सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, भडगाव येथे “स्व. आबासो. मधुकर सदाशिव जकातदार (वकील) व स्व. वत्सलाबाई मधुकर जकातदार स्मृतिकरंडक विद्यापीठस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा – २०२६” उत्साहात संपन्न झाली. मूळजी जेठा महाविद्यालय, जळगावच्या संघाने यंदाचा स्मृतिकरंडक पटकावत मानाचा तुरा रोवला. स्पर्धेतील वैयक्तिक गटात शेठ मुरलीधरजी मानसिंगका महाविद्यालय, पाचोरा येथील गायत्री क्षीरसागर हिने प्रथम पारितोषिक मिळवले. द्वितीय क्रमांक अमोल पाटील (कबचौ उमवि, जळगाव), तृतीय क्रमांक ऐश्वर्या पाटील (मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव) यांना प्राप्त झाला. उत्तेजनार्थ पारितोषिके चेतन भदाणे (मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव) व प्रिया पवार (डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय, धुळे) … - [महिंदळे ग्रामस्थांचे तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय उपोषण](https://hellojanata.com/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%b3%e0%a5%87-%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%a4%e0%a4%b9%e0%a4%b8/): भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील भडगाव : तालुक्यातील महिंदळे गावातील विविध विकास कामांमधील कथित अनियमिततेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी भडगाव तहसील कार्यालयाच्या आवारात एकदिवसीय उपोषण आंदोलन केले. जल जीवन मिशन अंतर्गत राबविण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेची चौकशी, बसस्टॉप परिसरात बसविण्यात आलेल्या ॲक्वा यंत्रणेची तपासणी तसेच शेत पाणंद रस्त्यांच्या कामांबाबत सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, सन २०२२-२३ मध्ये जल जीवन मिशन अंतर्गत गावात पाईपलाईन टाकण्यात आली. मात्र सदर काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने गावात आजही नियमित पाणीपुरवठा होत नसल्याचा आरोप करण्यात आला. अंदाजपत्रकानुसार काम न होता केवळ कागदोपत्री कामे पूर्ण दाखविण्यात आल्याची तक्रारही यावेळी करण्यात आली. तसेच … - [देशमुख महाविद्यालयात डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्त प्रबोधन व्याख्यान](https://hellojanata.com/%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%96-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%a1%e0%a5%89/): भडगाव : पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, भडगाव आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती द्वारा संचलित जे. डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालय, दर्यापूर, जि. अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने स्वतंत्र भारताचे प्रथम कृषिमंत्री शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्त प्रबोधन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. डी. एम. मराठे होते. डॉ. पंजाबराव देशमुख हे आधुनिक भगीरथ – डॉ. विनोद कोकणे डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी कृषी, शिक्षण, कायदा, समाजसुधारणा, धर्मसुधारणा अशा अनेकविध क्षेत्रांमध्ये भरीव कार्य केले. गोरगरीब बहुजन शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण घेता यावे … - [भडगावच्या एरंडोल–पारोळा मार्गावर वाहतूक ठप्प](https://hellojanata.com/%e0%a4%ad%e0%a4%a1%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%8f%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a5%8b%e0%a4%b2-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%b3%e0%a4%be/): गिरणा पुलावर ट्रॅक्टर पंक्चर; दोन तास वाहनांची प्रचंड कोंडी भडगाव : गिरणा नदीवरील पुलावर शुक्रवारी सायंकाळी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्राॅलीचे टायर अचानक पंक्चर झाल्याने भडगाव कडून एरंडोल व पारोळ्याकडे जाणारा मुख्य संपर्क मार्ग पूर्णतः ठप्प झाला. या प्रकारामुळे तब्बल दोन तासांहून अधिक काळ वाहनांची लांबच लांब रांग लागली. मुख्य रस्त्यातच ट्रॅक्टर अडकून पडल्याने दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली. सुरतळकडे जाणाऱ्या लक्झरी बस, तीन ते चार खासगी बस, अवजड वाहने तसेच शेकडो दुचाकीस्वार रस्त्यावर अडकून पडले. काही दुचाकीस्वारांना वाहतुकीच्या कोंडीतून जीव मुठीत घेऊन मार्ग काढावा लागला. हा रस्ता एरंडोल, पारोळा व कोळगावकडे जाणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून पुलावरील मोठे खड्डे … - [आदिवासी मुलांचे भविष्य अंधारात ; शाळा बनली गोठा](https://hellojanata.com/%e0%a4%86%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%ad%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%85/): हॅलो जनता प्रतिनिधी   भडगाव : तालुक्यातील महिंदळे गावातील काळीची वस्ती या आदिवासी दुर्गम भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची अवस्था अत्यंत दयनीय बनली असून, शिक्षण विभागाच्या हलगर्जी कारभारामुळे ही शाळा शिक्षण केंद्र न राहता जणू गुरांचा गोठाच बनल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. राज्य शासनाकडून जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जात असताना, या शाळेकडे मात्र प्रशासनाने पूर्णतः पाठ फिरवल्याचे दिसून येते. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी असलेली ही शाळा आज गैरवापराचे जिवंत उदाहरण ठरत आहे. महिंदळे (काळीची वस्ती) येथील शाळेत वर्गखोलीत गुरांचे साहित्य, किचन रूममध्ये चारा ; कागदोपत्री १२ तर प्रत्यक्षात ४ विद्यार्थी हजर सदर शाळेतील एक वर्गखोली गुरांच्या … - [भडगावात आमदार सत्यजित तांबे यांच्या निधीतून शाळा-महाविद्यालयांना डिजिटल पोडियम वाटप](https://hellojanata.com/%e0%a4%ad%e0%a4%a1%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%86%e0%a4%ae%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%a4-%e0%a4%a4%e0%a4%be/): भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील  भडगाव : नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार  सत्यजित सुधीर तांबे यांच्या स्थानिक विकास निधीतून भडगाव शहर व तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयांना अद्यावत व उपयुक्त असे पोडियम (डिजिटल डायस) वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत सौ. सुमनताई गिरधर पाटील माध्यमिक विद्यालय, लाडकुबाई विद्या मंदिर, आदर्श कन्या महाविद्यालय, बाल विकास विद्या मंदिर, अग्लो उर्दू हायस्कूल भडगाव तसेच तालुक्यातील इतर महाविद्यालयांना हे डिजिटल पोडियम वितरित करण्यात आले. शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर वाढावा, विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा मिळाव्यात आणि अध्यापन अधिक परिणामकारक व्हावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी भाऊसाहेब वर्पे, नामदेव कांडलकर, सिताराम पारदत्त, भूषण पवार, जयहिंद लोकचळवळ … - [भडगाव येथे संत रविदास महाराज जयंती उत्साहात साजरी..](https://hellojanata.com/%e0%a4%ad%e0%a4%a1%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%a5%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%a4-%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be/): भडगाव : येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघ भडगाव शहर यांच्या वतीने जगतगुरू संत रविदास महाराज जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. रविवार, दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता संत रविदास महाराज मंदिरात मूर्तीपूजन, आरती व भजन कार्यक्रम पार पडला. याच दिवशी भडगाव शहरातील सर्व शासकीय कार्यालयांमध्येही संत रविदास महाराज जयंती साजरी करण्यात आली. महादेव गल्ली, टोणगाव व यशवंत नगर परिसरात समाजबांधवांनी एकत्र येत जयंती उत्सवात सहभागी होऊन सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले. संध्याकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक (पारोळा चौफुली) येथे संत रविदास महाराज यांचे भव्य छोटे स्टेज (मंदिर) उभारण्यात आले होते. येथे संत रविदास महाराजांसह छत्रपती … - [अवैध गौणखनिज वाहतुकीला लगाम.](https://hellojanata.com/%e0%a4%85%e0%a4%b5%e0%a5%88%e0%a4%a7-%e0%a4%97%e0%a5%8c%e0%a4%a3%e0%a4%96%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%9c-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%95%e0%a5%80%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%b2/): वाक गावाजवळ महसूल विभागाची मध्यरात्री धडक कारवाई : डम्पर जप्त भडगाव : तालुक्यात अवैध गौणखनिज वाहतुकीविरोधात महसूल प्रशासनाने कडक भूमिका घेत मध्यरात्री धडक कारवाई केली. मौजे वाक, ता. भडगाव परिसरात अवैधरीत्या गौणखनिज वाहतूक करणारा एक डम्पर महसूल पथकाने जप्त केला आहे. ही कारवाई भडगावच्या तहसीलदार शितल सोलाट यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २९ जानेवारी २०२६ रोजी रात्री करण्यात आली. जप्त करण्यात आलेला डम्पर क्रमांक एम.एच. १५ एच.डब्ल्यू. ८६९९ हा ज्ञानेश्वर केसनोर (रा. मनमाड) यांच्या मालकीचा असून, तो कोणतेही वैध परवाने अथवा अधिकृत कागदपत्रांशिवाय गौणखनिज वाहतूक करत असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. नायब तहसीलदार सुधीर सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली. पथकात ग्राम … - [शालेय वयातच ज्वेलरी डिझाईनचे कौशल्य; आदर्श कन्या विद्यालयात रोजगाराभिमुख कार्यशाळा](https://hellojanata.com/%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%af-%e0%a4%b5%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%9a-%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%a1%e0%a4%bf%e0%a4%9d%e0%a4%be/): भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील भडगाव : महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी ज्वेलरी डिझाईन क्षेत्रातील रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उघडणारी कार्यशाळा उत्साहात पार पडली. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे भडगाव तालुका अध्यक्ष तथा दैनिक नवराष्ट्र व नवभारतचे पत्रकार निलेश बापूराव महाले यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. कार्यशाळेत मेकॅनिकल इंजिनिअर (नाशिक) श्रीमती कृणाली दिनेश देशमुख यांनी ज्वेलरी डिझाईन व्यवसायातील भविष्यातील संधी, आवश्यक कच्चा माल, बाजारपेठेची माहिती देत प्रत्यक्ष डिझाईन प्रात्यक्षिके सादर केली. विद्यार्थिनी शालेय वयातच कौशल्य आत्मसात करून स्वावलंबी व्हाव्यात, या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद शाळा जालिंदरनगर (ता. खेड, … - [उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात, बारामती विमानतळाजवळ झाला अपघात.](https://hellojanata.com/%e0%a4%89%e0%a4%aa%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%96%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%85%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%a4-%e0%a4%aa%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0/): बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाला अपघात झाला आहे. बारामतीत लँडिंगदरम्यान हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या विमानात काही जण असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान विमानात अजित पवार होते का ? कुठलाही दुजोरा मिळाला नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात अजित पवार गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार आज सकाळी मुंबईहून विशेष विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. बारामतीत जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार … - [🚨 ब्रेकिंग : गोसावी समाजाच्या निवेदनाची आमदारांकडून तत्काळ दखल...](https://hellojanata.com/%f0%9f%9a%a8-%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97-%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a5%80/): हॅलो जनता न्यूज, पाचोरा (गजानन गिरी) – पाचोरा येथील दशनाम गोसावी समाजाच्या स्मशानभूमीच्या जागेची दुरुस्ती, स्वच्छता तसेच इतर उपयोगी व्यवस्था करण्यासंदर्भात आज पाचोरा तालुका दशनाम गोसावी समाजाच्या वतीने पाचोरा भडगाव विधानसभेचे आमदार किशोर पाटील यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. गोसावी समाजाने निवेदन दिल्यानंतर त्याची तात्काळ दखल घेऊन आमदार किशोर पाटील यांनी तात्काळ पाचोरा नगर पालिकाचे मुख्याअधिकारी मंगेश देवरे यांच्याशी फोनवर संवाद साधून, गोसावी समाजाचे स्मशान भूमीची जी काही समस्या आणि अडचणी असतील त्या ताबडतोब मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. तसेच स्मशान भूमीच्या कामासंदर्भात काहीही अडचणी किंवा समस्या असेल त्या पूर्णपणे मार्गी लावण्याचे आश्वासन गोसावी समाज बांधवाना दिले. त्यास अनुसरू मुख्य … - [आई - बाप उमगले... अश्रूंचे बांध फुटले !](https://hellojanata.com/%e0%a4%86%e0%a4%88-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%aa-%e0%a4%89%e0%a4%ae%e0%a4%97%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%85%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%82%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%82/): हंकारेचा भावनिक संवाद : शाब्दिक हुंकाराने अंतर्मनात पेटली माणुसकीची ठिणगी हॅल्लो जनता प्रतिनिधी : यशकुमार पाटील  भडगाव : मोबाईल आणि सोशल मीडियाच्या वावटळात आई -बापालाच बाजूला सारलेल्या मुला मुलींना आज आई-बाप अन् त्यांच्या कष्टाची जाणीव झाली‌. भडगाव पोलीस स्टेशन व महिला दामिनी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “माझी मुलगी माझा अभिमान” या कार्यक्रमात प्रा. वसंत हंकारे यांचे प्रभावी व्याख्यान झाले. मुलींचे शिक्षण, आत्मसन्मान, सुरक्षितता आणि पालकांची भूमिका यावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. “मुलगी म्हणजे ओझे नसून कुटुंबाचा अभिमान आहे,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. त्यांच्या या संवादातून बाहेर पडलेल्या भावनिक हुंकाराने मुलांसह उपस्थित सर्वांनाच आई-बाप उमगले अन् आपोआप अश्रूंचे बांध … - [भडगाव नगरपरिषद विविध समित्यांच्या सभापती व सदस्यांची नियुक्ती जाहीर.](https://hellojanata.com/%e0%a4%ad%e0%a4%a1%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%a8%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a4%a6-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a7-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%bf/): भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील  भडगाव : नगरपरिषदेत नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सहभागातून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विषय समित्यांची स्थापना करण्यात आली असून, त्या समित्यांवर सभापती व सदस्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. या नियुक्त्यांमुळे नगरपरिषद प्रशासनाला गती मिळणार असून विकासकामांना दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्थायी समिती सदस्य म्हणून लखीचंद प्रकाश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बांधकाम समिती सभापती : फकीर नगमाबी अलीमशाह सदस्य : विजयकुमार रायभान भोसले, देवाजी अहीरे, युवराज पाटील, जितेंद्र विठ्ठल पाटील. शिक्षण समिती सभापती : अतुलसिंह भिकनसिंह परदेशी सदस्य : देवाजी बापू अहीरे, ज्योती जितेंद्र पाटील, योगिता शशिकांत येवले, अमोल नाना पाटील. आरोग्य … - [🛑 ब्रेकिंग : आखातवाडे येथील जयकुमार राजपूत यांची CRPF मध्ये निवड, शिवसेनेतर्फे सत्कार](https://hellojanata.com/%f0%9f%9b%91-%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97-crpf/): हॅलो जनता न्यूज, पाचोरा – आखातवाडे येथील स्वामी विवेकानंद अभ्यासिकेतील नवतरुण युवक जयकुमार रविंद्रसिंग राजपूत यांची केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मध्ये यशस्वी निवड झाल्याची आनंददायी बातमी समोर आली आहे. कठोर परिश्रम, सातत्य आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी हे उल्लेखनीय यश संपादन केले असून त्यांच्या या यशामुळे आखातवाडे गावासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या यशाबद्दल माजी जि. प. सदस्य तथा शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब (जिभू) पाटील यांच्या हस्ते जयकुमार राजपूत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना रावसाहेब पाटील यांनी जयकुमार यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत ही निवड परिसरातील तरुणांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील … - [🛑ब्रेकिंग: जळगावात महानगरपालिका निवडणुकीत महायुतीचा डंका, दणदणीत विजय](https://hellojanata.com/%f0%9f%9b%91%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97-%e0%a4%9c%e0%a4%b3%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a4/): हॅलो जनता न्यूज, जळगाव – महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला घवघवीत यश मिळाले असून या विजयामागे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळणारे आमदार मंगेश चव्हाण व शहराचे आमदार राजुमामा भोळे यांच्या माध्यमातून करण्यात आलेले अचूक नियोजन निर्णायक ठरले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव महापालिका निवडणुकीची जबाबदारी आमदार मंगेश चव्हाण आणि आमदार सुरेश भोळे यांच्याकडे सोपवली होती. यापूर्वी जिल्हा दूध संघात सत्तांतर घडवत भाजपाची सत्ता प्रस्थापित करणे तसेच जिल्हा बँक नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत मिळवून दिलेले यश, या पार्श्वभूमीवर त्यांच्या संघटन कौशल्यावर विश्वास ठेवून … - [🚨 जळगाव ब्रेकिंग : प्रभाग १३ चा कायापालट करणे हे आपले पहिले ध्येय - प्रफुल्ल देवकर](https://hellojanata.com/%f0%9f%9a%a8%e0%a4%9c%e0%a4%b3%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5-2/): हॅलो जनता न्यूज, जळगाव – महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, प्रभाग १३ मधील महायुतीचे उमेदवार प्रफुल्ल गुलाबराव देवकर.. नितीन सपके आणि सुरेखा तायडे यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेऊन आता कॉर्नर बैठकांवर भर दिला आहे. त्यामुळे थेट मतदारांशी त्यांना थेट संवाद साधता येत आहे. मतदारांचे प्रश्न तसेच अडचणी त्यांना जाणून घेता येत आहेत. प्रभाग क्रमांक १३ मध्ये महायुतीने आपली संपूर्ण ताकद लावली असून, उमेदवार प्रफुल्ल देवकर, नितीन सपके आणि सुरेखा तायडे यांनी प्रचाराचा दुसरा टप्पा यशस्वीपणे गाठला आहे. घरोघरी गाठी भेटी घेतल्यानंतर आता तिघांनी कॉर्नर बैठका घेऊन मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला आहे. कॉर्नर सभेतून माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा जनतेशी संवाद, बैठकांना … - [🚨 ब्रेकिंग : ॲड.अविनाश सुतार यांची स्वीकृत नगरसेवक पदी निवड माजी आमदार दिलीप वाघ यांच्या हस्ते सत्कार](https://hellojanata.com/%f0%9f%9a%a8-%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97-%e0%a5%b2%e0%a4%a1-%e0%a4%85%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b6/): हॅलो जनता न्यूज, पाचोरा  – पाचोरा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासह स्वीकृत नगरसेवक पदासाठी आज अधिकृत घोषणा करण्यात आली. या घोषणेनुसार भारतीय जनता पक्षाचे ॲड. अविनाश देविदास सुतार यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे पाचोरा नगरपरिषदेतील भाजपच्या संघटनात्मक बळाला अधिक मजबुती मिळाल्याचे चित्र आहे. नगरपरिषदेत आज झालेल्या विशेष बैठकीत उपनगराध्यक्ष तसेच स्वीकृत सदस्यांची निवड प्रक्रिया पार पडली. या बैठकीला नगराध्यक्षांसह नगरपरिषदेतील भाजपाचे गटनेते सुरज वाघ, नगरसेविका कविता पाटील, कविता हटकर, अमरीन देशमुख, नगरसेवक राहुल गायकवाड, गोपाल वासवाणी यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. बैठकीत एकमताने ॲड. अविनाश सुतार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या निवडीबद्दल माजी आमदार दिलीप … - [रोटरी क्लबच्या जळगाव ग्रीनसिटीला चार्टर प्रदान, संस्थापक अध्यक्षा धनश्री ठाकरे व नूतन पदाधिकाऱ्यांनी स्वीकारली सूत्रे](https://hellojanata.com/%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%9f%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a4%ac/): हॅलो जनता न्यूज, जळगाव – रोटरी क्लबची शंभर टक्के पोलिओ निर्मूलन ही प्राथमिकता असून सेवाभावी कार्यांद्वारे समाजाच्या गरजा पूर्ण करतांना रोटरी क्लब ऑफ जळगाव ग्रीनसिटी सुद्धा स्वच्छ पाणी,शिक्षण आणि आरोग्य यासारख्या प्रमुख क्षेत्रात मूल्याधिष्टीत काम करेल,असा विश्वास रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे प्रांतपाल ज्ञानेश्वर शेवाळे यांनी व्यक्त केला. मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे आज शनिवार,१० जानेवारी रोजी येथे नव्याने अकरावा क्लब म्हणून स्थापन झालेल्या रोटरी क्लब ऑफ जळगाव ग्रीनसिटीच्या संस्थापक अध्यक्षा कु.धनश्री विवेक ठाकरे यांना कॉलर,पिन व चार्टर प्रांतपाल ज्ञानेश्वर शेवाळे यांच्या शुभहस्ते सुपूर्द झाले. यावेळी व्यासपीठावर सहप्रांतपाल सचिन जेठवाणी,रोटरी रॉयल्सच्या आयपीपी वर्षा रंगलानी,सचिव गणेश वर्मा,स्नेहा ज्ञानचंदानी,प्रांतपालांचे प्रतिनिधी पयोड बेहेडे यांची … - [भडगाव शेतकरी सहकारी संघाच्या चेअरमनपदी राजेंद्र परदेशी, व्हाईस चेअरमनपदी हिरामण पाटोळे यांची बिनविरोध निवड.](https://hellojanata.com/%e0%a4%ad%e0%a4%a1%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%b9%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%98%e0%a4%be/): भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील  भडगाव : शेतकरी सहकारी संघाच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी दिनांक ९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता निवड प्रक्रिया पार पडली. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा अध्याशी अधिकारी महेश कासार यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची विशेष सभा घेण्यात आली. या सभेत संघाच्या चेअरमनपदी राजेंद्र लालचंद परदेशी यांची, तर व्हाईस चेअरमनपदी हिरामण सुखदेव पाटोळे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज प्राप्त झाल्याने निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडली. यापूर्वी चेअरमनपदाचा भैय्यासाहेब पाटील व व्हाईस चेअरमनपदाचा देविदास माळी यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्यामुळे ही दोन्ही पदे रिक्त झाली होती. त्या रिक्त जागांसाठीच सदर निवड … - [भडगाव शहरात मुस्लिम समाजाचा संदल मोठ्या उत्साहात साजरा](https://hellojanata.com/%e0%a4%ad%e0%a4%a1%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%b6%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%ae-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9c/): भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील  भडगाव : शहरात गेल्या ५०६ वर्षांपासून अखंड सुरू असलेली संदलची परंपरा यंदाही मोठ्या धार्मिक श्रद्धा, सामाजिक सलोखा आणि उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. ही परंपरा जपण्याचे कार्य हजरत दादा गुलाब अली शहा फाउंडेशनच्या माध्यमातून सातत्याने सुरू असून, यावर्षीही शहरात भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभला. या निमित्ताने भडगाव शहरातील नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष रेखाताई प्रदीप मालचे, उपनगराध्यक्ष राजेंद्र पाटील, गटनेते लकीचंद पाटील यांच्यासह नगरसेवक विजयकुमार देशमुख, सय्यद इमरान अली, अतुल परदेशी, विजयकुमार भोसले, देवाजी हरी, शेख खलील, राहुल ठाकरे, मिर्झा अंजुम, समीक्षा पाटील, रंजनाबाई वाघ, करुणा देशमुख, किरण पाटील, योगिता येवले, वैशाली पाटील, ज्योती पाटील, कल्पनाबाई भोई, वैशाली … - [🚨 ब्रेकिंग : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जळगाव दौरा रद्द; गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत रोड शो](https://hellojanata.com/%e0%a4%8f%e0%a4%95%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a5/): हॅलो जनता न्यूज, जळगाव प्रतिनिधी – जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज जळगाव शहरात उपमुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांचा भव्य रोड शो आयोजित करण्यात आला होता. शिवसेना (शिंदे गट)च्या उमेदवारांसाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात होता. मात्र काही अपरिहार्य कारणांमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जळगाव दौरा अचानक रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या दौऱ्यासाठी शहरात मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली होती. रोड शोच्या मार्गावर ठिकठिकाणी स्वागत कमानी, बॅनर्स, झेंडे लावण्यात आले होते. कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत होता. मात्र दौरा रद्द झाल्याची माहिती मिळताच काहीशी नाराजी व्यक्त होत असतानाच शिवसेनेने प्रचारात कोणताही खंड पडू दिला नाही. … - [भडगाव येथे पत्रकार दिनानिमित्त बक्षीस वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न.](https://hellojanata.com/%e0%a4%ad%e0%a4%a1%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%a5%e0%a5%87-%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a8/): भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील भडगाव : अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ, भडगाव तालुका यांच्या वतीने दि. ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त चित्रकला व रंगभरण स्पर्धेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व बक्षीस वितरण तसेच मान्यवरांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात भडगाव शहरातील उद्योजक कदीर खान हाजी जोरावर खान तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील युवासेना प्रमुख श्रेयस संजय कासार यांना ‘गिरणा नवरत्न पुरस्कार’ सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यासह परिसरातील पर्यावरण, सहकार, सामाजिक, प्रशासकीय, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय व प्रबोधनात्मक कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.पत्रकार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला व रंगभरण स्पर्धेत … - [🚨 ब्रेकिंग : जळगाव महापालिका निवडणूक, प्रभाग क्रमांक ११ चे उमेदवार निता सांगोळे यांना समाजबांधवांचा उत्स्फूर्त पाठिंबा](https://hellojanata.com/%f0%9f%9a%a8-%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97-%e0%a4%9c%e0%a4%b3%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%bf/): हॅलो जनता न्यूज, जळगाव – महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रभाग क्रमांक ११ हरीविठ्ठल नगर परिसरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रभागातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून निता सांगोळे तर अपक्ष उमेदवार म्हणून संजय शिरसाठ हे मतदारांसमोर आहेत. या दोन्ही उमेदवारांच्या प्रचार रॅलीचा शुभारंभ हरीविठ्ठल नगर परिसरातून करण्यात आला. प्रचार रॅलीदरम्यान नागरिकांनी आणि समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. परिसरात ढोल-ताशांच्या गजरात, घोषणा देत प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. या प्रसंगी बोलताना समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते प्रमोद रुले यांनी समाजबांधवांना एक महत्त्वाचे आवाहन केले. “प्रभाग क्रमांक ११ मधून आपल्या समाजाचे उमेदवार निवडणूक लढवत … - [🚨 ब्रेकिंग : शहीद सीआरपीएफ जवान अनिल बोरसे यांच्यावर खेडगाव नंदीचे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार](https://hellojanata.com/%f0%9f%9a%a8-%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97-%e0%a4%b6%e0%a4%b9%e0%a5%80%e0%a4%a6/): हॅलो जनता न्यूज, पाचोरा प्रतिनिधी – दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे येथील सुपुत्र आणि केंद्रीय राखीव पोलीस दलातील (CRPF) जवान अनिल हेमराज बोरसे (वय ४१) यांना सेवा बजावत असताना वीरमरण आले. पुणे येथील सीआरपीएफ कॅम्पमध्ये जनरल ड्युटीवर कार्यरत असताना ही दुर्दैवी घटना घडली. त्यांच्या निधनाची बातमी समजताच खेडगाव नंदीचेसह पाचोरा तालुक्यावर शोककळा पसरली. शहीद जवान अनिल बोरसे यांचे पार्थिव आज त्यांच्या मूळ गावी खेडगाव नंदीचे येथे आणण्यात आले. गावात पोहोचताच शोकाकुल वातावरणात नागरिकांनी अश्रूंनी निरोप दिला. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील, प्रशासकीय अधिकारी, पोलीस दलाचे … - [🚨 ब्रेकिंग : जळगावमध्ये माघार घेण्यासाठी उमेदवारांचे अपहरण अन् दबाव... संजय राऊत यांचा आरोप](https://hellojanata.com/%f0%9f%9a%a8-%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97-%e0%a4%9c%e0%a4%b3%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5-2/): हॅलो जनता न्यूज, जळगाव : जळगावमध्ये सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गंभीर आरोप समोर आले आहेत. उमेदवारांना किडनॅप करून जबरदस्तीने माघार घ्यायला लावले जात असल्याचा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी केला आहे. पैसे आणि सत्तेचा गैरवापर करून उमेदवारांवर दबाव टाकला जात असून, बिनविरोध निवडून आणण्याच्या स्पर्धेतूनच हे प्रकार घडत असल्याचा आरोप त्यांनी केला. जळगाव : संजय राऊत यांच्या आरोपाने खळबळ… संजय राऊत म्हणाले की, जळगावमध्ये लोकशाहीची गळचेपी सुरू असून, निवडणूक प्रक्रियेवर थेट गुंडगिरी आणि दबावाचे सावट आहे. काही ठिकाणी उमेदवारांना धमकावणे, अपहरणासारखे प्रकार घडवून आणणे आणि त्यानंतर माघार घेण्यासाठी भाग पाडणे, हे अत्यंत … - [🚨 ब्रेकिंग : एक निष्ठावंत शिवसैनिक ते नगरसेवक, संदीप राजे यांच्या राजकीय प्रवासावर विशेष लेख...](https://hellojanata.com/%f0%9f%9a%a8-%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%88%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%95/): हॅलो जनता न्यूज, पाचोरा – नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १२ चे नगरसेवक संदीप राजे पाटील यांचा आज वाढदिवस असून, या निमित्ताने शहरासह प्रभागात शिवसैनिक, कार्यकर्ते व नागरिकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसैनिक म्हणून समाजकारणात सक्रिय असलेल्या संदीप राजे पाटील यांनी पक्ष संघटनेत दिलेले योगदान आणि केलेले कार्य हे नेहमीच प्रेरणादायी ठरले आहे. सामान्य शिवसैनिक ते नगरसेवक असा प्रेरणादायी प्रवास एक सामान्य शिवसैनिक म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या संदीप राजे पाटील यांनी चिकाटी, निष्ठा आणि सातत्याच्या कार्यातून नगरसेवक पदापर्यंत मजल मारली आहे. आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या विकासात्मक कामांनी प्रेरित होऊन त्यांनी शिवसेनेत सक्रियपणे काम करण्यास सुरुवात … - [🚨 ब्रेकिंग : शिंदे सेनेचे नगरसेवक लखीचंद पाटील यांची भडगाव नगरपालिकेच्या गटनेतेपदी निवड....](https://hellojanata.com/%f0%9f%9a%a8%e0%a4%b2%e0%a4%96%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a4%82%e0%a4%a6/): हॅलो जनता न्यूज, भडगाव प्रतिनिधी – भडगाव नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली दणदणीत विजय मिळवत नगरपालिकेवर वर्चस्व सिद्ध केले आहे. या विजयामागे निवडणूक व्यवस्थापन, रणनीती आणि संघटन कौशल्य महत्त्वाची ठरली असून, त्यात लखीचंद पाटील यांनी बजावलेली भूमिका निर्णायक ठरली आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे नियोजन, उमेदवारांचे समन्वय, प्रचार यंत्रणेची आखणी आणि कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्याचे काम लखीचंद पाटील यांनी प्रभावीपणे पार पाडले. याचा थेट फायदा शिंदे सेनेला झाला असून नगराध्यक्ष रेखा मालचे यांच्यासह पक्षाचे मोठ्या संख्येने नगरसेवक मोठ्या मताधिक्याने निवडून आले असून भडगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय शिवसेनेने प्राप्त केला आहे. भडगाव शहर व तालुक्यात विविध सामाजिक … - [🚨 ब्रेकिंग : उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा जळगाव दौरा रद्द, निवडणूक धामधुमीत प्रशासनाला दिलासा](https://hellojanata.com/%f0%9f%9a%a8-%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97-%e0%a4%89%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%80/): हॅलो जनता न्यूज, जळगाव – ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा जळगाव जिल्ह्याचा नियोजित दौरा अखेर रद्द करण्यात आला आहे. दि. ४ ते ७ जानेवारी २०२६ या कालावधीत होणारा हा दौरा रद्द झाल्याची अधिकृत माहिती राज्य शासनाच्या राजशिष्टाचार विभागाने मंगळवारी रात्री जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्राद्वारे कळविली आहे. त्यामुळे निवडणूक व्यवस्थापनात गुंतलेल्या प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सध्या उमेदवारी छाननी, आचारसंहिता अंमलबजावणी, कायदा-सुव्यवस्था तसेच सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष केंद्रित करून आहे. अशा परिस्थितीत उपराष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे अतिरिक्त सुरक्षा, प्रोटोकॉल आणि नियोजनाची जबाबदारी प्रशासनावर येणार होती. त्यामुळे दौरा निश्चित झाल्यापासून प्रशासनाची कसरत वाढली होती. उपराष्ट्रपतींच्या दौऱ्यात … - [🚨 ब्रेकिंग : भडगावात पाचोऱ्यातील २० ते २५ वाळू माफियांविरुद्ध गुन्हा, कर्मचाऱ्यांवर दगडफेक करणे पडले महागात](https://hellojanata.com/%f0%9f%9a%a8-%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97-%e0%a4%ad%e0%a4%a1%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5-9/): हॅलो जनता न्यूज, भडगाव – तालुक्यातील गिरड परिसरातील गिरणा नदी पात्रातून सर्रास सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकाला व पोलिसांना मध्यरात्री हुज्जतबाजी, धमकी आणि दगडफेकीचा सामना करावा लागल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी पाचोरा येथील रितेश पाटील याच्यासह २० ते २५ वाळू माफियांविरुद्ध भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कारवाईदरम्यान सुमारे ३७ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गिरणा नदी पात्रात अवैधरित्या गौण खनिज उत्खनन व वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर महसूल सहाय्यक प्रशांत किसन सावकारे, मिलींद निकम, रामकृष्ण मनोरे तसेच भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने सोमवारी … - [🚨 जळगाव ब्रेकिंग : भाजपाचा आक्षेप, एका राजकीय पक्षाच्या सर्वच उमेदवारांच्या अर्जावर आक्षेप...](https://hellojanata.com/%f0%9f%9a%a8-%e0%a4%9c%e0%a4%b3%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5-2/): हॅलो जनता न्यूज, जळगाव प्रतिनिधी – जळगाव महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेत आज उमेदवारी अर्जांच्या छाननीदरम्यान एक मोठी आणि धक्कादायक घडामोड समोर आली आहे. एका प्रादेशिक पक्षाच्या सर्व उमेदवारांच्या अर्जांवर डिजिटल सही (Digital Signature) असल्याबाबत आक्षेप घेत भाजपने थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली असून, या प्रादेशिक पक्षांच्या उमेदवारांना अपक्ष ठरवण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. भाजपने दाखल केलेल्या अर्जात असा दावा करण्यात आला आहे की, निवडणूक नियमांनुसार उमेदवारी अर्जावर उमेदवाराची हस्ताक्षरातील मूळ सही अनिवार्य असून, डिजिटल सही ग्राह्य धरता येत नाही. त्यामुळे संबंधित प्रादेशिक पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज नियमबाह्य ठरत असून ते तत्काळ बाद करावेत, अशी ठाम भूमिका भाजपने … - [🚨ब्रेकिंग : जळगाव मनपा निवडणूक : महायुतीचा जागावाटपाचा फार्मूला अखेर निश्चित, आज सायंकाळी अधिकृत घोषणा...](https://hellojanata.com/%f0%9f%9a%a8%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97-%e0%a4%9c%e0%a4%b3%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5/): हॅलो जनता न्यूज, जळगाव – महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील भाजप, शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या निवडणुकीसाठी भाजप ५० जागा, शिंदेंची शिवसेना २१ जागा आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ४ जागा असा फार्मूला निश्चित करण्यात आला असून याबाबतची अधिकृत घोषणा आज सायंकाळी होणार असल्याची बातमी एका खाजगी वृत्तवाहिनीने दिली आहे. गेल्या दोन दिवसांपासून महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपावरून जोरदार चर्चा सुरू होत्या. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यात अनेक बैठकांचा फड रंगला होता. मात्र प्रत्येक बैठकीनंतरही जागावाटपावर एकमत होत नसल्याने तिढा कायम होता. … - [भडगाव शेत शिवारात रंगली शेतकऱ्यांची कार्यशाळा.](https://hellojanata.com/%e0%a4%ad%e0%a4%a1%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%a4-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%b6/): भडगाव प्रतिनिधी (यशकुमार पाटील) भडगाव : राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियानांतर्गत कृषी विभागाच्या वतीने भडगाव शिवारात मका पिकावरील शेतशाळा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या शेतशाळेत शेतकरी, महिला शेतकरी तसेच कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रत्यक्ष शेतात मार्गदर्शन मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. कृषी विभागामार्फत कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) अंतर्गत आयोजित या शेतशाळेत मका पिकाच्या विविध टप्प्यांवर आवश्यक काळजी, खत व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण तसेच उत्पादन वाढीसाठी अवलंबावयाच्या उपाययोजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. सहाय्यक कृषी अधिकारी काजल भाऊसाहेब ढोकळे (भडगाव) यांनी कार्यक्रमाचे आयोजन, सुयोग्य नियोजन सुत्रसंचलन केले. कृषी अधिकारी सुकदेव गिरी … - [🚨 जळगाव ब्रेकिंग : शासकीय विश्रामगृहात युतीची बैठक, ठाकरेंच्या सेनेची आचारसंहिता भंगची तक्रार...](https://hellojanata.com/%e0%a4%9c%e0%a4%b3%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5-10/): हॅलो जनता न्यूज, जळगाव – महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागा वाटपावरून राजकीय हालचालींना वेग आला असतानाच शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या कथित बैठकीवरून नवा वाद निर्माण झाला आहे. आज शासकीय विश्रामगृहात मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची जळगाव महापालिकेच्या जागा वाटपासंदर्भात बैठक झाल्याची माहिती समोर आली होती. जळगाव : कोणतीही बैठक झाली नाही – मंत्री गिरीश महाजन… मात्र या संदर्भात पत्रकारांनी मंत्री गिरीश महाजन यांना विचारणा केली असता त्यांनी या वृत्ताचा स्पष्ट इन्कार केला. “मला नाशिकला जायचे होते. पाच मिनिटे फ्रेश होण्यासाठी मी शासकीय विश्रामगृहात आलो होतो. आचारसंहितेत आम्ही कोणतीही बैठक घेतलेली नाही,” असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. जळगाव … - [🚨जळगाव ब्रेकिंग : युतीची बैठक अन् मंत्री गुलाबराव पाटील संतापात निघाले, नेमकं काय घडलं...](https://hellojanata.com/%f0%9f%9a%a8%e0%a4%9c%e0%a4%b3%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5/): हॅलो जनता न्यूज, जळगाव – आगामी जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागा वाटपाबाबत जळगाव शहरात शिवसेना–भाजपची एक महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत सविस्तर चर्चा झाली असली, तरी जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. बैठकीनंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील हे नाराज अवस्थेत बैठकीतून बाहेर पडल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. मात्र, महायुती भक्कम असून अंतिम निर्णयासाठी थोडा वेळ लागेल, असे स्पष्ट संकेत बैठकीनंतर देण्यात आले. जळगाव : महायुती भक्कम आहे, मंत्री गिरीश महाजन… बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, “महायुती मजबूत आहे आणि येत्या दिवसांत ते … - [🚨अमळनेर ब्रेकिंग : मंत्रिपदाच्या वल्गना करण्यापेक्षा स्वतःला सिद्ध करा - माजी आमदार शिरीष चौधरी](https://hellojanata.com/%f0%9f%9a%a8%e0%a4%85%e0%a4%ae%e0%a4%b3%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%b0/): हॅलो जनता न्यूज, अमळनेर – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या मंत्रिपदावर कुणाची वर्णी लागणार, यावर राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. विशेषतः उत्तर महाराष्ट्रातून अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल पाटील यांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते, अशा चर्चांना सध्या उधाण आले आहे. दरम्यान, या चर्चांवर शिवसेना (शिंदे गट) चे अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये आमदार अनिल पाटील एकही नगराध्यक्ष निवडून आणू शकले नाहीत, अशा परिस्थितीत त्यांना कोणत्या आधारावर मंत्रिपद दिले जाईल, असा सवाल सुरेश चौधरी यांनी उपस्थित केला आहे. अमळनेर : … - [आंचळगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.](https://hellojanata.com/%e0%a4%86%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%b3%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5/): हॅलो जनता न्यूज, भडगाव प्रतिनिधी :  प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपरखेड अंतर्गत आंचळगाव येथे आज मोफत आरोग्य तपासणी शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले. प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपरखेडचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतीक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपरखेडच्या वतीने स्वतंत्र आरोग्य पथक तयार करण्यात आले होते. शिबिरात गावातील नागरिकांची सखोल आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये रक्तदाब (बीपी), हिमोग्लोबिन (एचबी), लिपिड प्रोफाइल आदी तपासण्या करून गरजेनुसार औषधोपचार करण्यात आले. नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला. तसेच “अ‍ॅनिमिया मुक्त भारत” मोहिमेअंतर्गत रक्तक्षय (अ‍ॅनिमिया) आढळून आलेल्या नागरिकांना फॉलिक अ‍ॅसिडच्या गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले. महिलांमध्ये व … - [जळगाव मनपा : प्रभाग क्रमांक ७ मधून महेश वर्मा यांच्या उमेदवारीची जनतेतून मागणी...](https://hellojanata.com/%e0%a4%9c%e0%a4%b3%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%ae%e0%a4%a8%e0%a4%aa%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%82/): हॅलो जनता न्यूज, जळगाव – जळगाव महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ७ मधील महेश लक्ष्मीनारायण वर्मा हे एक सुशिक्षित, तडफदार आणि सर्वसामान्य जनतेशी थेट नाळ जोडून काम करणारे युवा नेतृत्व म्हणून ओळखले जात आहेत. सामाजिक, आर्थिक, वैद्यकीय तसेच पर्यावरणीय क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य नागरिकांमध्ये विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. कोरोना महामारीच्या भीषण काळात श्री. वर्मा यांनी दाखवलेली तत्परता आणि सामाजिक भान आजही अनेकांच्या स्मरणात आहे. लॉकडाऊनच्या काळात अडकलेल्या नागरिकांसाठी त्यांनी प्रशासनाशी समन्वय साधत तातडीची मदतकार्य राबवली. जळगाव येथून पश्चिम बंगालमधील निर्वासित मजुरांसाठी दोन विशेष रेल्वे सोडण्याच्या कामात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. कलेक्टर कार्यालयाच्या माध्यमातून तसेच आमदार राजू मामा यांच्या सहकार्याने ही प्रक्रिया … - [जळगाव मनपा निवडणूक : प्रभाग क्रमांक ४ मध्ये अश्फाक खाटीक यांना नागरिकांचा वाढता पाठिंबा](https://hellojanata.com/%e0%a4%9c%e0%a4%b3%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5-9/): हॅलो जनता न्यूज, जळगाव प्रतिनिधी :- जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक चारमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून भाजपचे उमेदवार अश्फाक मुनाफ खाटीक यांनी प्रचाराची आघाडी घेतली आहे. गेल्या काही वर्षांत त्यांनी राबवलेल्या सामाजिक, शैक्षणिक आणि विकासात्मक उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. याच कामांची दखल घेत मतदारांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. प्रभागातील “या” समस्यांचा अश्फाक खाटीक यांनी केला पाठपुरावा प्रभाग क्रमांक चारमधील पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छतेचे प्रश्न, आरोग्य सेवा तसेच शैक्षणिक सुविधांबाबत नागरिकांमध्ये दीर्घकाळापासून नाराजी होती. या समस्यांवर सातत्याने पाठपुरावा करत अश्फाक खाटीक यांनी वेळोवेळी प्रशासनाशी समन्वय साधून उपाययोजना करण्याचा … - [🚨 ब्रेकिंग : युती निश्चित पण महायुतीचे काय? मंत्री गिरीश महाजन यांच्या वक्तव्याने महायुती संदर्भात संभ्रम](https://hellojanata.com/%f0%9f%9a%a8%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%a4%e0%a5%80/): हॅलो जनता न्यूज, जळगाव – महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदेसेनेची युती पक्की आहे. मात्र राष्ट्रवादीसोबत अद्याप चर्चा झालेली नाही. त्यामुळे ‘महायुती’चे चित्र सध्यातरी अनिश्चित आहे. काहीही झाले तरी भाजप ५० पेक्षा कमी जागा लढणार नाही, अशी ठाम भूमिका मंत्री गिरीश महाजन यांनी मांडली. यावेळी त्यांनी तिकीट न मिळणाऱ्यांना ‘प्रमोशन’चे गाजर दाखवतानाच, बंडखोरांना आमच्याकडे औषध तयार आहे, असा इशाराही दिला. जागा वाटपाच्या गणितावर भाष्य करताना महाजन म्हणाले की, शिंदेसेनेशी प्राथमिक बोलणे झाले आहे. सुरुवातीला आम्ही त्यांना १५ जागांचा प्रस्ताव दिला होता, पण त्यांची मागणी २५ जागांची आहे. सध्या ही चर्चा २० जागांच्या आसपास येऊन थांबली असून, रविवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी … - [भडगाव तालुक्यातील राजकारणाचे चाणक्य – युवराज आबा पाटील](https://hellojanata.com/%e0%a4%ad%e0%a4%a1%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5-6/): हॅलो जनता न्यूज, (विशेष लेख) – भडगाव तालुक्याच्या राजकीय पटलावर गेल्या काही वर्षांत शांतपणे पण प्रभावीपणे आपला ठसा उमटवणारे नाव म्हणजे युवराज आबा पाटील. या निमित्ताने त्यांच्या राजकीय वाटचालीकडे आणि नुकत्याच पार पडलेल्या भडगाव नगरपरिषदेच्या ऐतिहासिक निवडणूक विजयाकडे मागे वळून पाहणे औचित्याचे ठरते. राजकारणात गाजावाजा न करता पडद्यामागून सूत्र हलवणे, योग्य वेळी योग्य निर्णय घेणे आणि सर्व घटकांना विश्वासात घेऊन समन्वय साधणे ही युवराज पाटील यांची खास ओळख आहे. याच राजकीय हुशारीचे उत्तम उदाहरण म्हणजे नुकतीच पार पडलेली भडगाव नगरपरिषदेची निवडणूक. निवडणूक जाहीर झाल्यापासून ते निकाल लागेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर युवराज पाटील यांनी बारकाईने परिस्थितीचा अभ्यास केला. उमेदवारांची निवड, प्रभागनिहाय गणित, … - [🚨 ब्रेकिंग : पाचोरा तालुक्यात बिबट्याची दहशत; ऊस तोडणीदरम्यान तीन पिल्ले आढळली..](https://hellojanata.com/%f0%9f%9a%a8-%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%be-8/): हॅलो जनता न्यूज, पाचोरा – गिरड येथील शेतकरी नंदू मोतीराम पाटील यांच्या शेत गट क्रमांक १४९ मध्ये चार एकर क्षेत्रावर ऊस लागवड करण्यात आला असून सध्या ऊस तोडणीचे काम सुरू आहे. मात्र दिनांक २६ डिसेंबर रोजी सकाळी सुमारे सात वाजेच्या सुमारास ऊस तोडणी करणाऱ्या मजुरांना शेतात बिबट्याची तीन पिल्ले आढळून आल्याने खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाचोरा : गेल्या आठवडे भरापासून शिवारात बिबट्याचा वावर.. गेल्या आठवड्यात गिरड येथील पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या दिसून आल्याचा व्हिडिओ समोर आला होता. तसेच अंतुर्ली भातखंडे परिसरात मागील आठवड्यात गायब झालेल्या वासरावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना घडली … - [🚨 ब्रेकिंग : सामाजिक कार्यकर्त्या कोमल वाढे प्रभाग क्र. ६ मधून जळगाव मनपा निवडणुकीच्या रिंगणात](https://hellojanata.com/%e0%a4%9c%e0%a4%b3%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5-8/): हॅलो जनता न्यूज, जळगाव – महापालिकेच्या आगामी निवडणुकीत खानदेश मिल्क कॉलनी, डॉ. सहस्रबुद्धे गल्ली, शाहूनगर येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्त्या कोमल प्रमोद वाढे या वार्ड क्रमांक ६ मधून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या तीन दशकांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या कोमल वाढे या महिलांच्या स्वावलंबनासाठी सातत्याने काम करत आहेत. कोमल वाढे या व्यवसायाने ब्युटीशियन असून त्यांना ३० वर्षांचा व्यावसायिक अनुभव आहे. या काळात त्यांनी केवळ स्वतःचा व्यवसाय उभारला नाही, तर असंख्य महिलांना स्वावलंबी होण्यासाठी मार्गदर्शन केले. बचत गटांची माहिती देऊन अनेक महिलांना बचत गट सुरू करण्यास प्रवृत्त केले. आज त्या महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहून कुटुंबाचा आधार बनल्या … - [🚨 ब्रेकिंग : पाचोरा शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत, पाच जणांना चावा तीन गंभीर...](https://hellojanata.com/%f0%9f%9a%a8-%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%be-7/): हॅलो जनता न्यूज, पाचोरा – शहरात भटक्या कुत्र्यांचा अक्षरशः कहर सुरू असून एका दिवसात पाच ते सहा नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे रवाना करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या घटनेत एका लहान मुलाचाही समावेश असून कुत्र्यांच्या टोळक्याने अचानक हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. पाचोरा शहरातील सिंधी कॉलनी परिसरात दहशत ही घटना प्रामुख्याने सिंधी कॉलनी व परिसरात घडली असून भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांवर अचानक हल्ले केले. सकाळी व सायंकाळच्या वेळी नागरिक, शाळकरी मुले, महिला व वृद्ध यांना बाहेर पडणेही धोकादायक ठरत आहे. … - [🚨 ब्रेकिंग : आमदार किशोर पाटील यांचा भडगावच्या विकासासाठी मास्टरस्ट्रोक, उपनगराध्यक्ष पदी राजेंद्र पाटील....](https://hellojanata.com/%e0%a4%ad%e0%a4%a1%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5-5/): हॅलो जनता न्यूज, भडगाव – नुकत्याच पार पडलेल्या भडगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये शिवसेना (शिंदे गट) ने घवघवीत यश संपादन करत भडगाव नगरपरिषदेवर आपली सत्ता प्रस्थापित केली आहे. आमदार किशोर पाटील यांच्या सक्षम नेतृत्वाखाली व प्रभावी मार्गदर्शनाखाली शिवसेनेचा भगवा भडगाव नगरपालिकेवर फडकला असून, शहराच्या राजकारणात शिवसेनेची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) च्या उमेदवार रेखा मालचे यांनी नगराध्यक्ष पदासाठी बाजी मारत लोकनियुक्त नगराध्यक्षपदी निवड मिळवली आहे. त्यांच्या विजयामुळे शिवसेना कार्यकर्ते व समर्थकांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, शहरात जल्लोषाचे दृश्य पाहायला मिळाले. भडगाव नगरपालिका : राजेंद्र महादू पाटील उपनगराध्यक्षपदी… दरम्यान, भडगावचे माजी नगराध्यक्ष … - [भडगावच्या राजकारणात 'रेखाताईं'चा नवा अध्याय ; हिंद लोक चळवळीच्या वतीने जाहीर सत्कार.](https://hellojanata.com/%e0%a4%ad%e0%a4%a1%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/): शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक प्रशासनाचा नगराध्यक्षांचा निर्धार; १५११ मतांनी मिळवला ऐतिहासिक विजय भडगाव (प्रतिनिधी)  भडगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये जनसामान्यांच्या थेट मतदानातून निवडून आलेल्या पहिल्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. रेखाताई प्रदीप मालचे यांचा ‘जय हिंद लोक चळवळ, भडगाव’ च्या वतीने नुकताच सन्मान करण्यात आला. १५११ मतांच्या दणदणीत विजयाने भडगावच्या राजकारणात महिला नेतृत्वाचे एक नवे पर्व सुरू झाले असून, शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही नवनियुक्त नगराध्यक्षांनी यावेळी दिली. या गौरव सोहळ्याला भडगावमधील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. रेखाताई मालचे यांनी मिळवलेला विजय हा सर्वसामान्यांच्या विश्वासाचे प्रतीक असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. महिला नेतृत्वाचा उदय थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याची … - [🚨 ब्रेकिंग: जळगाव महापालिका निवडणुकीत महायुतीत तिढा कायम, राष्ट्रवादीचा इतक्या जागांचा प्रस्ताव....](https://hellojanata.com/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%a4%e0%a5%80-2/): हॅलो जनता न्यूज, जळगाव – महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील प्रमुख पक्ष भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी युती निश्चित करत निवडणूक एकत्र लढण्याची घोषणा केली आहे. यासाठी जळगाव एमआयडीसी परिसरातील हॉटेल प्रेसीडेंट पार्क येथे दोन्ही पक्षांच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले असले, तरी जागावाटपाबाबत कोणताही अंतिम निर्णय झालेला नसल्याचे दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट केले आहे. महायुती : बैठकीला न बोलावल्याने नाराजी – संजय पवार दरम्यान, महायुतीतील तिसरा घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सोबत चर्चा सुरू असल्याचे भाजप-शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितले. मात्र समाधानकारक जागावाटप न झाल्यास स्वबळावर निवडणूक लढण्यावर राष्ट्रवादी अजित पवार गट … - [🚨 ब्रेकिंग : नवनिर्वाचित अपक्ष नगरसेवकाचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश, भडगावात खळबळ....](https://hellojanata.com/%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%a8%e0%a4%be/): हॅलो जनता न्यूज – भडगाव : नुकत्याच पार पडलेल्या भडगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये शिवसेना (शिंदे गट) ने घवघवीत यश संपादन करत भडगाव नगरपरिषदेवर आपली सत्ता प्रस्थापित केली आहे. आमदार किशोर पाटील यांच्या सक्षम नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली शिवसेनेचा भगवा भडगाव नगरपालिकेवर फडकला असून, शहराच्या राजकारणात शिवसेनेची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) च्या उमेदवार रेखा मालचे यांची लोकनियुक्त नगराध्यक्षपदी निवड झाली असून, त्यांच्या निवडीमुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जळगावात महायुती, काय म्हणाले मंगेश चव्हाण____ पहा व्हिडिओ👇 https://www.facebook.com/share/v/1CPvmLrKTT/ दरम्यान, निवडणुकीत प्रभाग क्रमांक ७-अ मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या फकीर नगमाबी अलीमशाह … - [🚨जळगाव ब्रेकिंग: भाजपा ५७ च्या खाली, सेना २५ नक्की मात्र राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे काय?](https://hellojanata.com/%e0%a4%9c%e0%a4%b3%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5-7/): हॅलो जनता न्यूज, जळगाव – मुंबई येथे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येताच. राज्यात भाजप, शिवसेनेतही खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर तातडीने दोन्ही पक्षांनी जळगाव एमआयडीसी परिसरातील हॉटेल प्रेसीडेंड पार्क येथे बैठक घेवून ‘युती निश्चीत केल्याचे जाहीर केले आहे. दोन्ही पक्षाची युती झालेली असली तरी जागा वाटप जाहीर झाले नसल्याचे दोन्ही पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांनी सांगितले. तिसरा पक्ष राष्ट्रवादी अजित पवार पक्षांशी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले असले तरी समाधानकारक जागा न मिळाल्यास स्वबळावर लढण्यावर राष्ट्रवादी अजित पवार पक्ष ठाम असल्याचे समोर आले आहे. जळगावात महायुतीच्या बैठकीत काय घडले? भाजप सेनेची युती जाहीर करण्यात आलेली आहे. या ठिकाणी जागा वाटपाची चर्चा झालेली … - [🚨 ब्रेकिंग : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून नवनिर्वाचित पाचोरा भडगाव नगराध्यक्षांचा सत्कार, दिला विकासाचा शब्द...](https://hellojanata.com/%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%be-19/): हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी – पाचोरा व भडगाव नगरपालिकांवर शिवसेनेचा भगवा फडकवल्यानंतर आज मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सदन येथे शिवसेनेच्या वतीने भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पाचोरा नगरपालिकेच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. सुनिताताई किशोर आप्पा पाटील तसेच भडगाव नगरपालिकेच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. रेखाताई प्रदीप मालचे यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी ‘विकासपुरुष’ म्हणून ओळखले जाणारे आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील, नवनिर्वाचित नगरसेवक श्री. लखीचंद पाटील, नगरसेविका सौ. समीक्षा पाटील, पिंटू मराठे, जहांगीर मालचे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. … - [शिष्यवृत्ती परीक्षेत आदर्श कन्या विद्यालयाचे घवघवीत यश](https://hellojanata.com/%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a5%83%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a5%87%e0%a4%a4-%e0%a4%86%e0%a4%a6%e0%a4%b0/): हॅलो जनता प्रतिनिधी : (यशकुमार पाटील) भडगाव : येथील महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श कन्या विद्यालयाच्या इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवी फेब्रुवारी 2025 च्या शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेत कु. खुशी दिनेश पाटील, कु. जान्हवी योगेश सोनवणे आणि कु. धनश्री अरुण शिरसाठ यांनी यश मिळवून शाळेची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. या यशस्वी विद्यार्थिनींचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे भडगाव तालुकाध्यक्ष निलेश महाले, पत्रकार अशुतोषकुमार पाटील, पत्रकार भरत चव्हाण यांच्या हस्ते विद्यार्थिनींना प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले. https://youtu.be/CTo7QcnHnQ0?si=YgbsVwxzCiXUDRGT या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक … - [🚨 ब्रेकिंग : पाचोरा एम. एम. महाविद्यालयाची विजयी हॅट्रिक, वादविवाद स्पर्धेत उल्लेखनीय यश...](https://hellojanata.com/%f0%9f%9a%a8-%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%be-6/): हॅलो जनता न्यूज, पाचोरा – दि. २० डिसेंबर २०२५ रोजी डॉ. जे. जी. पंडित माध्यमिक विद्यालय, लोहारा (ता. पाचोरा) येथे विद्यार्थ्यांसाठी “आजची स्त्री आत्मनिर्भर आहे / नाही” या विषयावर आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एम. एम. महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी अत्यंत प्रभावी आणि विचारप्रवर्तक सादरीकरण करत स्पर्धेतील तीनही प्रमुख पारितोषिकांवर आपले नाव कोरले आणि विजयी हॅट्रिक साधली. या स्पर्धेत तृतीय वर्ष कला शाखेची विद्यार्थिनी कु. गायत्री श्रीकृष्ण क्षिरसागर हिने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. तिच्या मुद्देसूद मांडणीने, प्रभावी भाषाशैलीने आणि विषयाची सखोल समज दाखवत परीक्षकांची विशेष दाद मिळवली. त्याचप्रमाणे तृतीय वर्ष कला शाखेचीच विद्यार्थिनी कु. चेतना रणदीप हिरे हिने … - [Exclusive : पाचोरा बस अपघात प्रकरण.. आम्हाला खिडकीतून बाहेर काढले...](https://hellojanata.com/%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%be-18/): हॅलो जनता न्यूज, पाचोरा : आगारातून निघालेली पाचोरा ते वडगाव कडे या बसला एका भरधाव ट्रॅक्टरने कट मारल्यामुळे प्रवाशांनी भरलेली बस रस्त्याच्या कडेला घसरून उलटल्याची भीषण दुर्घटना घडली. या बसमध्ये विद्यार्थी आणि कामानिमित्त जाणारे प्रवासी मोठ्या संख्येने होते. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व प्रवासी सुखरूप बचावले आहेत. सोमवार २२ रोजी सायंकाळी ५.३० वाजता ही घटना घडली. दरम्यान या बसमध्ये ५० प्रवासी असल्याचे समजते पाचोरा आगारातून बस क्रमांक एम.एच. १४ बी.टी. २६११ ही बस प्रवाशी व विद्यार्थी घेवुन पाचोरा ते वडगाव कडेच्या दिशेने जात होती. मोंढाळे ते निंभोरी गावा दरम्यान निंभोरी गावच्या माजी सरपंच मीनाक्षी विनायक दिवटे यांच्या … - [अखिल भारतीय साहित्य संमेलनात कवी राम जाधव यांच्या कवितेची निवड..](https://hellojanata.com/%e0%a4%85%e0%a4%96%e0%a4%bf%e0%a4%b2-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%ae%e0%a5%87/): हॅल्लो जनता (यशकुमार पाटील) भडगाव : पिंपरखेड येथील माध्यमिक आदिवासी आश्रमशाळेतील माध्यमिक शिक्षक कवी राम सखाराम जाधव यांची सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आम्ही लोक आदिवासी या कवितेची कविकट्टा या व्यासपीठवर निवड झाली असून दि. ३ जानेवारी २०२६ ला सत्र क्र.११ मध्ये दुपारी १२ ते ०१ या वेळेत कविताचे सादरीकरण होणार आहे. कवी राम जाधव सर हे आदिवासी बोलीभाषा व बंजारा बोलीभाषेचे अभ्यासक आहेत.आदिवासी बालकांमध्ये राहून त्यांनी पारंपरिक, मौखिक, लोकगीते जमवून त्यांनी त्या गीतांचा मराठी या प्रमाण बोलीभाषेत काव्यात्मक अनुवाद केला आहे. आदिवासी बोलीभाषेतील गीतांच्या माध्यमातून त्यांनी आदिवासी विद्यार्थींना चार ते पाच वेळा आकाशवाणी जळगांव … - [🚨 पाचोरा ब्रेकिंग : ७५ प्रवासी घेऊन जाणारी एसटी महामंडळाची बस उलटली...](https://hellojanata.com/%f0%9f%9a%a8-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%be-4/): हॅलो जनता न्यूज, पाचोरा – पाचोरा बसस्थानकावरून कडे वडगाव मार्गावर भीषण अपघात घडला असून, सुमारे ७५ प्रवाशांना घेऊन जाणारी पाचोरा बस डेपोची एस.टी. बस अचानक पलटी झाली. या अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा येथून कडे वडगावकडे जाणारी एस.टी. बस प्रवासात असताना समोरून अचानक वाहन आल्याने बस चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली. अपघाताचा जोर इतका होता की बसमधील प्रवासी एकमेकांवर आदळले आणि अनेकांना गंभीर दुखापत झाली. या बसमध्ये शाळेत जाणारे अनेक शाळकरी विद्यार्थीही प्रवास करत होते, ही बाब समोर आल्याने पालकांमध्ये मोठी भीतीचे … - [भडगाव नगरपरिषद निवडणूक निकाल, शिवसेनेचा दणदणीत विजय - निकालाचे संपूर्ण विश्लेषण...](https://hellojanata.com/%e0%a4%ad%e0%a4%a1%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5-4/): हॅलो जनता न्यूज, (यश पाटील)-भडगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या निकालाने शहराच्या राजकारणात मोठा बदल घडवून आणला असून शिवसेना (शिंदे गट) ने या निवडणुकीत वर्चस्व सिद्ध केले आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार रेखाताई प्रदीप मालचे यांनी १२ हजार ९५५ मतांचे आघाडीचे मताधिक्य मिळवत दणदणीत विजय संपादन केला आहे. रेखाताई मालचे यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार सुशीलाबाई शांताराम पाटील यांचा १ हजार ५११ मतांनी पराभव केला. रेखाताई मालचे यांना एकूण १२,९५५ मते, तर पाटील यांना ११,४४४ मते मिळाली. या विजयामुळे भडगाव नगरपरिषदेत पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकला असून सेनेचे नेतृत्व अधिक भक्कम झाले आहे. नगरसेवक निवडणुकीतही शिवसेनेने बहुसंख्य जागांवर … - [🚨 ब्रेकिंग : कोकाटेंच्या जागी कुणाची वर्णी? काय म्हणाले माजी मंत्री अनिल पाटील..](https://hellojanata.com/%e0%a4%85%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b2-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%b2/): हॅलो जनता न्यूज, जळगाव – राज्याचे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या मंत्रीपदावर कुणाची वर्णी लागणार, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे प्रवक्ते तथा अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांना मंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना, माजी मंत्री अनिल पाटील यांना मंत्रीपद मिळाल्यास पक्षाला मोठा राजकीय फायदा होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. विशेषतः धुळे, जळगाव आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांमध्ये पक्षसंघटन अधिक मजबूत होऊन राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढेल, असे मत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मांडले आहे. … - [🚨 ब्रेकिंग : पाचोरा नगरपालिका निवडणुकीत "या" दोन प्रभागात आज मतदान, उद्याच्या निकालाकडे राज्याचे लक्ष](https://hellojanata.com/%f0%9f%9a%a8-%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b2/): हॅलो जनता न्यूज, पाचोरा प्रतिनिधी – पाचोरा नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत आज दोन प्रभागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत असून शहराचे राजकीय तापमान पुन्हा एकदा चढले आहे. प्रभाग क्रमांक ११ अ आणि १२ ब या दोन जागांसाठी आज मतदान होत असून त्यासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. दि. २ डिसेंबर रोजी पाचोरा नगरपालिकेच्या २६ नगरसेवक पदांसह १ नगराध्यक्ष पदासाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. ही प्रक्रिया एकूणच सुरळीत पार पडली होती. न्यायालयीन प्रक्रियेमुळे प्रभाग क्रमांक ११ अ आणि १२ ब मधील उमेदवारांची मतदान प्रक्रिया त्या दिवशी होऊ शकली नव्हती. त्यामुळे आज स्वतंत्रपणे या दोन प्रभागांसाठी मतदान घेण्यात येत आहे. आजच्या मतदानासाठी … - [🚨 ब्रेकिंग : नगरपरिषद/नगरपंचायत निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय..](https://hellojanata.com/%f0%9f%9a%a8-%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97-%e0%a4%a8%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a4%a6-%e0%a4%a8%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a4%aa/): हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी – राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्या आदेशानुसार जळगाव जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये व कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशानुसार दिनांक २० डिसेंबर २०२५ (शनिवार) व २१ डिसेंबर २०२५ (रविवार) रोजी संबंधित नगरपरिषद व नगरपंचायत हद्दीतील सर्व आठवडी बाजार पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मतदानाच्या दिवशी बाजार सुरू असल्यास गर्दी निर्माण होऊन शांतता भंग होण्याची शक्यता लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मुंबई पोलीस अधिनियम १८६२ चे कलम ५ (अ) व (ब) अन्वये प्राप्त … - [प्रतिभाताई पाटील यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त व स्व. दादा गोगामेडी यांच्या पुण्यस्मरणार्थ जळगावात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन](https://hellojanata.com/%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%a8/): हॅलो जनता न्यूज, जळगाव : देशाच्या प्रथम महिला राष्ट्रपती व खान्देशच्या कन्या आदरणीय श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त तसेच श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुप्रिमो स्व. दादा सुखदेवसिंह गोगामेडी यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.हे रक्तदान शिबिर शुक्रवार, दि. १९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता हिंदूसूर्य महाराणा प्रताप स्मारक चौक, प्रभात चौक, जळगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन महामंडलेश्वर श्री स्वामी जनार्दन हरी जी महाराज (फैजपूर) यांच्या शुभहस्ते होणार असून कार्यक्रमास  डॉ. के. बी. पाटील, उदयसिंह पाटील (जळगाव) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या भव्य … - [🚨 ब्रेकिंग : ग. स. सोसायटीची भरती प्रक्रिया एजन्सी मार्फत करावी - आमदार चंद्रकांत पाटील](https://hellojanata.com/%f0%9f%9a%a8%e0%a4%86%e0%a4%ae%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b0/): हॅलो जनता न्यूज, जळगाव – जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी, म्हणजेच ग. स. सोसायटीची प्रस्तावित नोकरभरती आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या भरती प्रक्रियेत अनियमितता आणि भ्रष्टाचाराची भीती व्यक्त करत आमदार चंद्रकांत पाटील यांनी थेट जिल्हा उपनिबंधकांना निवेदनाद्वारे दोन महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. आमदार पाटील यांनी दिलेल्या निवेदनात संस्थेतील सभासद संख्येतील मोठी तफावतीचे कारण दिले आहे. संस्थेतील अंदाजे ९ ते १० हजार सेवानिवृत्त सभासदांचे सदस्यत्व कमी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे, आजची सदस्य संख्या पाहता सध्या नोकरभरती करणे योग्य नाही. ही नोकरभरती प्रक्रिया पूर्णपणे रद्द करावी किंवा भरती प्रक्रिया अपरिहार्य असल्यास ती निष्पक्षपातीपणे आणि भ्रष्टाचारमुक्त होण्यासाठी नामांकित एजन्सीमार्फत राबवावी, … - [🚨 ब्रेकिंग : धरणगाव येथील पर्यटकांचा उत्तर प्रदेशात अपघात, एका प्रवाशाचा मृत्यू...](https://hellojanata.com/%f0%9f%9a%a8-%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97-%e0%a4%a7%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5/): हॅलो जनता न्यूज, जळगाव – अयोध्येला फिरण्यासाठी निघालेल्या धरणगाव तालुक्यातील कल्याने खुर्द येथील यात्रेकरूंवर आज सकाळी भीषण संकट कोसळले. काशीहून अयोध्याकडे खाजगी वाहनाने जात असताना सुलतानपूरजवळ झालेल्या अपघातात एका महिलेला जागीच प्राण गमवावे लागले, तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे. धरणगावातून अयोध्येकडे निघाला होता ग्रुप कल्याने खुर्द येथील तब्बल 30 महिला आणि 5 पुरुष अशा 35 जणांच्या ग्रुपने जळगावहून रेल्वेने काशी येथे प्रवास केला. तेथून अयोध्याकडे पुढील दर्शनासाठी खाजगी वाहनाने जात असताना अचानक सुलतानपूर परिसरात वाहनाचा नियंत्रण सुटून अपघात झाला. धरणगाव येथील एका महिलेचा जागीच मृत्यू – अनेक जखमी या भीषण अपघातात एका महिलेला जागीच प्राण … - [🚨 ब्रेकिंग : महापालिका निवडणुकीचा बिगुल डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात](https://hellojanata.com/%f0%9f%9a%a8-%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b5/): हॅलो जनता न्यूज, मुंबई : राज्यातील महापालिकांची निवडणूक डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी सर्व महापलिका आयुक्तांची ऑनलाइन बैठक घेतली. त्यात निवडणुकीसाठीची आमची तयारी असल्याचे बहुतेक आयुक्तांनी सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे व सचिव सुरेश काकाणी यांनी या बैठकीत मतदार याद्या अंतिमरित्या प्रसिद्ध करण्याबाबत विचारणा केली. आयोगाने या याद्या १० डिसेंबरला प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, त्यासाठी आणखी दोन-तीन दिवस लागू शकतात असे. काही आयुक्तांनी सांगितले. तसा अवधी देण्याची तयारी आयोगाने दर्शविली. आता ८ डिसेंबरला आयोग पुन्हा बैठक घेऊन पूर्वतयारीचा आढावा घेईल. त्यानंतर डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात. महापालिका निवडणूक जाहीर होऊ … - [🚨 ब्रेकिंग : भाजपाच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार साधना चौधरी यांनी बजावला मतदानाचा हक्क...](https://hellojanata.com/%f0%9f%9a%a8-%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%95/): हॅलो जनता न्यूज, चोपडा │ चोपडा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया आज शांततेत पार पडत असून शहरातील अनेक मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांची उत्स्फूर्त गर्दी पाहायला मिळत आहे. नागरिकांमध्ये मतदानाविषयी मोठा उत्साह दिसून येत आहे. भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार साधना चौधरी यांनी आज आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्रावर पोहोचताच नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना साधना चौधरी यांनी सर्वप्रथम चोपडा शहरातील मतदारांना आवाहन केले की, “लोकशाही बळकट होण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणे अत्यंत आवश्यक आहे. आपला एक मत शहराच्या विकासाचा मार्ग निश्चित करू शकतो, त्यामुळे सर्वांनी मतदान करावे.” यावेळी त्या म्हणाल्या की, “चोपड्याची जनता सुज्ञ आहे. 100% … - [🔴चोपडा ब्रेकिंग : प्रभाग क्र ९ मध्ये जनतेच ठरलं राज्यात देवंद्र चोपड्यात नरेंद्र](https://hellojanata.com/%f0%9f%94%b4%e0%a4%9a%e0%a5%8b%e0%a4%aa%e0%a4%a1%e0%a4%be/): हॅलो जनता न्यूज, चोपडा – नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचा प्रचार दिवसेंदिवस जोम धरत असून प्रभाग क्रमांक 9 मध्ये अधिकृत उमेदवार नरेंद्र पाटील यांना मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद हा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. घराघरात संपर्क, सभांमधील गर्दी आणि नागरिकांचा वाढता विश्वास या माध्यमातून भाजपच्या प्रचारात वेग आला आहे. भाजप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार साधना चौधरी यांची संपूर्ण मुलाखत____👇 https://www.facebook.com/share/v/16SkMF6JXh/ प्रभाग 9 चे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी चोपड्याच्या नागरिकांसमोर आपल्या विकासाच्या व्हिजनची स्पष्ट मांडणी केली. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश झपाट्याने प्रगती करत आहे, तर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुन्हा ‘नंबर वन’ राज्य बनत असल्याचे त्यांनी … - [🚨भडगाव ब्रेकिंग : आमदार किशोर पाटील यांचा नगरपालिका निवडणुकीआधी भाजपला मोठा धक्का..](https://hellojanata.com/%e0%a4%86%e0%a4%ae%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b0-4/): हॅलो जनता न्यूज, भडगाव | नगरपालिका निवडणूक रंगल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा धक्का बसला आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी शहराध्यक्ष निलेश महाजन यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश केला. या घडामोडीमुळे भडगावातील राजकीय वातावरणात अचानक खळबळ उडाली आहे. आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास नव्या प्रवेशकर्त्यांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या विकासकामांवर आणि नेतृत्वक्षमतेवर ठाम विश्वास व्यक्त केला. अनेक वर्षांपासून भडगाव तालुक्यात झालेल्या विकासकार्यात आमदार पाटील यांची निर्णायक भूमिका असल्याचे दाखवत त्यांनी शिवसेनेची पताका हातात घेतल्याचे सांगितले. निलेश महाजन यांच्यासोबत मोठा गट शिवसेनेत भाजप युवा मोर्चाचे माजी शहराध्यक्ष निलेश साहेबराव महाजन यांच्यासोबत खालील … - [🚨 चोपडा ब्रेकिंग : भाजपची भव्य रॅली, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची उपस्थिती; शहरभर उत्साहाची लाट](https://hellojanata.com/%f0%9f%9a%a8-%e0%a4%9a%e0%a5%8b%e0%a4%aa%e0%a4%a1%e0%a4%be-%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%aa%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%ad/): हॅलो जनता न्यूज, चोपडा – नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज चोपडा शहरात भाजपतर्फे अभूतपूर्व असा शक्तीप्रदर्शनाचा महापूर पाहायला मिळाला. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत शहरातील महत्त्वाच्या भागातून भव्य रॅली काढण्यात आली. नागरिकांचा उस्फूर्त सहभाग आणि उत्साही प्रतिसाद यामुळे संपूर्ण शहरात निवडणुकीचे वातावरण तापले. चोपडा शहरातील प्रमुख भागातून रॅलीची धडाकेबाज वाटचाल रॅलीची सुरुवात शिवाजी महाराज चौकातून करण्यात आली. त्यानंतर ती गोल मंदिर, गुजराती गल्ली, चिंच चौक, ठाणे दरवाजा, गांधी चौक, शिंदे वाडा तसेच अरुण नगर या महत्त्वाच्या परिसरातून निघाली. सर्व भागात कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी, ढोल-ताशांचा गजर, घोषणाबाजी आणि तिरंग्यांच्या लाटांमुळे शहरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले. महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिक अशा सर्वच … - [🚨 चोपडा ब्रेकिंग : साधना ताई चौधरी यांच्या पाठीशी हा देवाभाऊ खंबीरपणे उभा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...](https://hellojanata.com/%f0%9f%9a%a8-%e0%a4%9a%e0%a5%8b%e0%a4%aa%e0%a4%a1%e0%a4%be-%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a7%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%a4%e0%a4%be/): हॅलो जनता न्यूज, भुसावळ – नगर परिषद नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून आज भुसावळ शहरात जळगाव जिल्ह्यातील चोपडा, भुसावळ, जळगाव सह इतर नगराध्यक्ष पदाचे भाजपा उमेदवार व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ विजय संकल्प सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमचे काम जनतेने पाहिले आहे. देश आणि महाराष्ट्र बदलत आहे, त्याप्रमाणे आपले शहर देखील बदलले पाहिजे. साधनाताई या निवडून आल्यानंतर या चोपडा शहराचा विकास करण्याकरिता प्राधान्याने भूमिका घेतील याची खात्री आहे आणि त्यांच्या पाठीशी त्यांचा देवाभाऊ खंबीरपणे उभा आहे. चोपडा नगरपालिका निवडणूक – प्रभाग क्र ३ … - [🚨चोपडा ब्रेकिंग : म्हणून काँग्रेस सोबत युती केली, आमदार चंद्रकांत सोनवणे याचा खुलासा...](https://hellojanata.com/%f0%9f%9a%a8%e0%a4%9a%e0%a5%8b%e0%a4%aa%e0%a4%a1%e0%a4%be/): हॅलो जनता न्यूज, चोपडा – शहरात शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेस यांच्यात झालेल्या स्थानिक युतीबाबत आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी खुलासे केले आहेत. एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी या निर्णयामागील कारणे स्पष्ट केली. सोनवणे म्हणाले की, “चोपडा शहरात काँग्रेसला मानणारा एक ठराविक वर्ग आहे आणि त्याचा फायदा आमच्या पक्षाला होऊ शकतो. म्हणूनच आम्ही स्थानिक स्तरावर काँग्रेससोबत हातमिळवणी केली आहे.” त्यांनी सांगितले की जसा महायुतीतील इतर मित्रपक्ष आपला राजकीय फायदा पाहतात, तसाच मीही माझ्या पक्षाचा लाभ कसा होईल हे पाहणे गरजेचे आहे. चोपडा : ही युती फक्त मतांच्या राजकारणासाठी नाही? युतीबाबत बोलताना सोनवणे यांनी मात्र स्पष्ट केले की ही हातमिळवणी फक्त मतांच्या … - [🚨 ब्रेकिंग : चोपडा शहरात भाजपाचा प्रचाराचा झंझावात, प्रभाग क्र. १३ मध्ये नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद...](https://hellojanata.com/%f0%9f%9a%a8-%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97-%e0%a4%9a%e0%a5%8b%e0%a4%aa%e0%a4%a1%e0%a4%be-3/): हॅलो जनता न्यूज, चोपडा – शहरात नगरपरिषदेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असताना प्रभाग क्रमांक १३ मधील भाजपाच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. साधना नितीन चौधरी यांच्या जनसंपर्क दौऱ्यास नागरिकांचा अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. या भेटीदरम्यान परिसरातील महिलांनी पारंपरिक पद्धतीने औक्षण करून साधना चौधरी यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी नागरिकांशी संवाद साधनांना साधना चौधरी म्हणाल्या, “तुमचा आशीर्वाद हीच आमची खरी ताकद आहे. चोपड्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी, सुरक्षिततेसाठी आणि सततच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तुमचे एकमताने मिळालेले पाठबळच शहराचा विकास वेगाने पुढे नेईल.” दौऱ्यात प्रभागातील नागरिकांनीही नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. साधना नितीन चौधरी यांना पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्धार व्यक्त केला. “चोपड्याच्या विकासाचा वेग … - [🚨पाचोरा ब्रेकिंग : अटलगव्हाण गावातील विहिरीत काम करताना इलेक्ट्रिक मोटरीचा शॉक लागून मजुराचा मृत्यू](https://hellojanata.com/%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%be-17/): हॅलो जनता न्यूज, पाचोरा – तालुक्यातील पिंपळगाव पोलिस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या अटलगव्हाण गावात शनिवारी दुपारी एक धक्कादायक अपघात घडला. विहिरीत क्रेन च्या सहाय्याने काम करत असताना इलेक्ट्रिक मोटरचा तीव्र शॉक लागून संजय मोझे (वय अंदाजे ५०) या मजुराचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर गंभीर अवस्थेत संजय मोझे यांना तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीदरम्यान त्यांना मृत घोषित केले. अचानक झालेल्या या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पाचोरा : सेफ्टी उपायांचा अभाव ठरला जीवघेणा संजय मोझे हे विहिरीतील क्रेन च्या सहाय्याने काम पाहत असताना आवश्यक सुरक्षा साधने न वापरल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक … - [🚨 ब्रेकिंग : भडगाव नगरपालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट, अशा होणार लढती...](https://hellojanata.com/%f0%9f%9a%a8-%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97-%e0%a4%ad%e0%a4%a1%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5-8/): हॅलो जनता न्यूज, भडगाव – भडगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये नगराध्यक्ष पदाकरिता यंदा त्रिपक्षीय लढत पाहायला मिळणार असून, यासाठी दाखल झालेल्या उमेदवारांची माघार प्रक्रिया पूर्ण झाली आहे. नगराध्यक्ष पदासाठी ३ उमेदवार अंतिम रिंगणात कायम राहिले आहेत. तसेच नगरसेवक पदाकरिता २४ जागांसाठी तब्बल ६८ उमेदवारांचे रिंगण तयार झाले आहे. भडगाव : नगराध्यक्ष पदाकरिता त्रिपक्षीय मुकाबला (अनुसूचित जमाती महिला राखीव) करिता पाटील सुशिला शांताराम (भाजपा), मालचे रेखा प्रदीप (शिवसेना), तडवी सपना निजाम (राकाॅपा)  यापूर्वी नगराध्यक्ष तसेच विविध प्रभागातील मोठ्या संख्येने उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. मात्र अनेक उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर अंतिम आकडा स्पष्ट झाला आहे. शिवसेना शिंदे गट नगराध्यक्ष पदाकरिता … - [🚨 ब्रेकिंग : भल्या पहाटे पाचोरा शहरात पोलिसांचे धडाकेबाज कोम्बिंग ऑपरेशन](https://hellojanata.com/%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%be-16/): हॅलो जनता न्यूज, पाचोरा –  शहरात आज पहाटे गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर धडाकेबाज कोम्बिंग ऑपरेशन राबवले. पहाटे ४.०० ते ६.३० या वेळेत उपविभागीय पोलिस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राहुल पवार आणि पोलीस स्टेशनचे ३ अधिकारी आणि २२ कर्मचारी अशा पथकाने शहरातील संशयित परिसर, गुन्हेगारांची ठिकाणे आणि विविध वस्त्यांमध्ये ही मोहीम हाती घेतली. पाचोरा पोलिस : गुन्हेगारीविरोधात कडक पावले नगरपालिका निवडणूक या शांततेत पार पडाव्या. पाचोरा शहरात कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहिले यासाठी पोलिसांनी हे कोंबिग ऑपरेशन राबवले आहे . पाचोरा पोलिसांनी राबविलेल्या ऑपरेशनदरम्यान एकूण २३ संशयितांना ताब्यात घेऊन पोलीस स्थानकात आणण्यात आले. त्यांच्याविरोधात प्रतिबंधात्मक … - [🚨 ब्रेकिंग : शाळा सोडून प्रचारात फिरणाऱ्या 'त्या' शिक्षकांवर कारवाई होणार, जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर](https://hellojanata.com/%e0%a4%9c%e0%a4%b3%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%95/): हॅलो जनता न्यूज, जळगाव – जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकांचे वारे सुरू असताना शिक्षण क्षेत्रात गंभीर आणि चिंताजनक बाब समोर आली आहे. काही संस्थाचालकांच्या प्रचारासाठी शाळांना कुलूप लावून शिक्षक प्रचारात रमल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून, पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. शाळेत परीक्षा सुरू असताना शिक्षक गायब सध्या जिल्ह्यातील अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये परीक्षा सुरू आहेत. काही ठिकाणी येत्या काही दिवसांत परीक्षा होणार आहेत. अशा संवेदनशील काळात शिक्षकांनी शाळेऐवजी राजकीय प्रचाराची वाट धरल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर मोठा परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. काही शाळांमध्ये शिक्षक गैरहजर असल्याने शाळा बंद असल्याचेही प्रकार उघड झाले आहेत. शाळा चालवणाऱ्या संस्थाचालकांनी स्वतःच्या किंवा … - [🚨 ब्रेकिंग : मंत्री महाजनांनी खडसेंना डीचवले, कोण ओळखतो त्या खडसेला?](https://hellojanata.com/%f0%9f%9a%a8-%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97-%e0%a4%96%e0%a4%a1%e0%a4%b8%e0%a5%87/): हॅलो जनता न्यूज, जळगाव – जळगावमध्ये नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने चांगलेच राजकारण तापले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी या निवडणुकांवरून आपले कट्टर राजकीय विरोधत एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधत सध्याच्या घडीला त्यांना कुणीही ओळखत नसल्याचा दावा केला आहे. कोण ओळखतो त्या खडसेला? ते सध्या कोणत्या पक्षात आहेच कळत नाही, असे ते म्हणालेत. राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींसाठी येत्या २ डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होऊ निकाल जाहीर होणार आहे. या पार्स्वभूमीवर गिरीश महाजन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांच्यात राजकीय कलगीतुरा … - [🚨 ब्रेकिंग : चोपडा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची भाजपची उमेदवारी जाहीर](https://hellojanata.com/%f0%9f%9a%a8-%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97-%e0%a4%9a%e0%a5%8b%e0%a4%aa%e0%a4%a1%e0%a4%be-2/): हॅलो जनता न्यूज, चोपडा – आगामी चोपडा नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाने साधना नितीन चौधरी यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे. भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा व परवानगी घेऊन ही घोषणा केली. यावेळी महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे राज्य उपाध्यक्ष रोहित निकम, माजी उपनगराध्यक्ष व ज्येष्ठ नेता जीवन चौधरी यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. चोपडा नगरपालिका : उच्चशिक्षित उमेदवार – भविष्यातील नेतृत्वाचे आशास्थान साधना चौधरी या उच्चशिक्षित असून संगणक अभियांत्रिकी क्षेत्रात त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. नवीन तंत्रज्ञान, डिजिटल प्रशासन, स्मार्ट सिटी संकल्पना याबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन चोपड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास भाजपच्या … ## Pages - [भडगाव तहसीलसमोर ग्रामस्थांचे लाक्षणिक उपोषण; १५ व्या वित्त आयोगातील कामांची चौकशीची मागणी.](https://hellojanata.com/%e0%a4%ad%e0%a4%a1%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%a4%e0%a4%b9%e0%a4%b8%e0%a5%80%e0%a4%b2%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b0-%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5/): भडगाव : तालुक्यातील वडगाव नालबंदी येथील ग्रामस्थांनी विविध संघटनांच्या पाठिंब्याने भडगाव तहसील कार्यालयाच्या आवारात एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करत २०२१ ते २०२५ या कालावधीत ग्रामपंचायत मार्फत १५ व्या वित्त आयोगातून झालेल्या कामांची सखोल चौकशी करण्याची ठाम मागणी केली. ग्रामस्थांच्या मते, संबंधित कालावधीत ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात आलेल्या विविध कामांमध्ये अनियमितता झाल्याचा संशय आहे. बेकायदेशीर शिपाई भरती, हौद दुरुस्ती, भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकाम, भूमिगत गटारी बांधणी, शाळा दुरुस्ती व शौचालय कामे, अंगणवाडी डिजिटल करणे व साहित्य खरेदी, घनकचरा दूत नियुक्ती तसेच आय.डी.बी.आय. बँकेच्या खात्यातील एस.आर. फंडातून खरेदी केलेल्या साहित्याची चौकशी करावी, अशी प्रमुख मागणी उपोषणकर्त्यांनी केली. विविध संघटनांचा जाहीर पाठिंबा या आंदोलनाला भारत … [comment]: # (Generated by Hostinger Tools Plugin)